आज एक मस्त आणि झटपट होणारा प्रकार केलाय.सगळ्यांनाच आवडलाय खूप. मग तो इथे द्यायलाच हवा ना? तर घ्या आता ;)
वाढणी-३-४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१ वाटी अख्खे मसूर, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/४ वाटी सुके खोबरे किसून, १ टीस्पून तीळ, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर , १/२ टीस्पून गरम मसाला, १.५ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, सजावटीकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.
कृती:
अख्खे मसूर ५-६ वेळा स्वच्छ धुवून कुकरमधून ४ शिट्ट्या काढून मउ शिजवून घ्यावेत. मसूर चा गाळही होता कामा नये आणि ते कच्चटही रहाता कामा नयेत.
एका पातेल्यात तीळ खमंग भाजून घ्यावेत. त्यातच सुके खोबरेही भाजून घावे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
तीळ, खोबरे, आलं लसूण पेस्ट आणि चिरलेल्या कांद्यातला थोडासा कांदा मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.
नेहमीसारखी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद याची फोडणी करून वाटलेले मिश्रण घालून जरासे परता. त्यात उरलेला कांदा घालून सोनेरी रंग येइतो परता. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परत थोडेसे परता. तिखट, धने-जिरे पावडर घाला, शिजवलेले मसूर घाला.गोडा मसाला, गरम मसाला, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. ही उसळ अगदी कोरडी नसली तरी फार घट्टही नसते. वाढताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी/ मौसूत पोळ्या, कांदा, लिंबाची फोड याबरोवर द्या.
झालंसुद्धा..
वाचने
17245
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओहो...क्लास्स!
अक्का मसूर
यावरून मला खूपच मार पडला आहे
In reply to अक्का मसूर by अभ्या..
मस्तच.. मला फार आवडतो.. कधी
वाहव्वा रे वाहव्वा!
छान.
अख्ख्या मसूरची पातळ भाजी घरी
या पदार्थाची अनेक हॉटेलं
अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या
अख्खा मसूर स्पेशल
In reply to अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या by दुर्गविहारी
तुम्ही हि कराडचे
In reply to अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या by दुर्गविहारी
माझ्या माहितीप्रमाणे आख्खा
In reply to अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या by दुर्गविहारी
शिवराज ढाबा
In reply to अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या by दुर्गविहारी
मस्त ग...एकदा करून बघतो..
मस्तच..
पुणे - कोल्हापूर मार्गावर
आज एक मस्त आणि झटपट होणारा
हो
In reply to आज एक मस्त आणि झटपट होणारा by एकविरा
मसूर आधी शिजवून न घेता थोडं
ही काय पद्धत आहे? म्हणजे
In reply to मसूर आधी शिजवून न घेता थोडं by सूड
नक्की रे
In reply to मसूर आधी शिजवून न घेता थोडं by सूड
पण मग तेव्हा मसूर आधी भिजत
In reply to नक्की रे by सविता००१
धन्यवाद!
In reply to पण मग तेव्हा मसूर आधी भिजत by सूड
जुन्या आठवणी
धाब्यावर आलेली माणसं
सोपी आणि छान पाकृ
मस्त!! कराडची आठवण आली..
मसूर,राजमा फक्त थंड हवेतच
हो.
मस्त दिसतेय