फॉर्मॅलीटी
बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले. गपांच्या नादात जेवणाची वेळ कधी आली कळा लेच नाही, काही मोजके पदार्थ सोडून सगळे माझ्या नावडीचे पदार्थ होते, परंतु आपल्या संस्कारा नुसार फॉर्मलिटी पाळण्यासाठी मला सगळे खावेच लागणार म्हणून मी नावडता पदार्थ सर्वात आधी संपवायचं ठरवला आणि तो पदार्थ संपल्यावर फॉर्मलिटी म्हणून म्हटले चांगला झालाय असे म्हणायचा अवकाश,तर क्षणाचाही बिलम्ब न करता माझे ताट त्या नावडत्या पदार्थने लगेच भरून टाकण्यात आले.
हा किस्सा सांगायचा उद्देश म्हणजे आपण लहान पणा पासून समोरच्या माणसाला दुखवायचेच नाही या उद्देशाने काही फॉर्मलिटी पाळत असतो, पण त्या खरंच गरजेच्या असतात का ओ? आता बघा ना मगाशी सांगितल्या प्रमाणे मी जर जेवणा आधी संगितले असते की हा पदार्थ मला आवडत नाही तर ते दुखावले गेले असते मान्य आहे. पण समोरच्याला नाही आवडणार ह्या विचाराने आपण संकोच करतो आणि स्पष्ट बोलणे टाळतो हीच प्रक्रिया लहानपणा पासून ते जीवनभर अव्ह्याहत पणे चालू असते,जो फॉर्मलिटी पाळतो तो संस्कारी आणि जो नाही पाळत तो mannerless असे सरळ वर्गीकरण करतो आपण.
आता बघा ना जर बायको ने नवऱ्याला विचारले की आज माजा मेकअप कसा झालाय किंवा ह्या साडीत मी कशी दिसते तर नवऱ्याने हि नसंकोचता चांगले तर चांगले आणि नाही तर नाही informaly सांगितले पाहिजे असे मला वाटते.
सध्या तर मी साध्या फॉर्मलिटी मोडण्यापासून सुरवात केलीये जसे की एखादा पदार्थ आवडत नसेल तर नकोच म्हणणे किंवा चहा नकोच असेल तर नाहीच म्हणणे.
एकेकेदा असे वाटते की आपण उगाचच फॉर्मलिटी मध्ये गुंतून जातो आणि freely बोलण्याचे विषय राहूनच जातात किंवा बोलल्याच जात नाहीत.
माझे तर असे मत आहे की तोडून टाका फॉर्मलिटी व्हा जरा informal आणि बघा त्या जगण्यात पण एक वेगळीच मजा आहे.
सध्या तरी इथेच थांबतो हा माझा मिपा वरचा पहिलाच लेख आहे.ह्या विषयावरील आणखी काही किस्से असतील तर नक्कीच share करेन.
आपला अभिप्राय नक्की कळवा आवडला असेल तर हो नाही तर नाही b informal.
-आपलाच informal मित्र समो
याद्या
7285
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
हा हा हा.. छान.!
भिडस्तपणा दाखवलात तर असेच
आधी कुठेतरी वाचल्यासारखं
मला देखील असे वाटत आहे. नेमकं
In reply to आधी कुठेतरी वाचल्यासारखं by एस
निसोंनी डुआयडी काढला की काय?
मी नावडता पदार्थ सर्वात आधी
अवांतर:
जर एखादा पदार्थ खायचा नसेल तर
In reply to अवांतर: by अत्रे
मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे
आदरातिथ्य या नावाखाली जी काही
In reply to मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे by प्रकाश घाटपांडे
हो. हे मी सुद्धा अनुभवले आहे.
In reply to मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे by प्रकाश घाटपांडे
या खाण्याच्या आग्रहावर एक
सासरवाडीचा आग्रह... बाबूओ ...
काढा काढा धागा काढा..तेव्हढंच
In reply to सासरवाडीचा आग्रह... बाबूओ ... by विशुमित
्मग त्यांना सांगायच की
In reply to सासरवाडीचा आग्रह... बाबूओ ... by विशुमित
सासुरवाडीच्या लोकांच्या
In reply to ्मग त्यांना सांगायच की by प्रकाश घाटपांडे
दुसरी आयडिया करा. ते
In reply to सासुरवाडीच्या लोकांच्या by विशुमित
मि तर सासुरवाडि ला जेवायचेच
आयला, लोकांच्या जीवनात कशाचेही आणि काहीही प्रश्न असतात !
मुद्दा क्रमांक १, २, आणि ३
एक उलटी सुचुवेशन आहे.
विमी,
In reply to एक उलटी सुचुवेशन आहे. by विशुमित
बॅड लक ला गुड लक मध्ये
In reply to विमी, by संजय क्षीरसागर
पदार्थ संपला असेल तर बॅड लक
In reply to बॅड लक ला गुड लक मध्ये by विशुमित
बिंधास्त अम्का पदर्थ शिल्ल्क
हाहा समो, आता जेवणाची आमंत्रण