अध्यात्मिक आणि संतसाहित्यातील नाममुद्रा
बर्याच संत आणि अध्यातिम्क साहित्यात जसे कि अभंग आरत्या इत्यादी मध्ये संत कवि आपल्या स्वतःच्या अथवा आपल्या गुरुच्या इत्यादी नावांचा उल्लेख विशीष्ट पद्धतीने करुन ठेवतात त्यास नाममुद्रा असे म्हणतात. जसे समर्थ रामदासांच्या काव्यात 'दास रामाचा', संत एकनाथांच्या काव्यात 'एका जनार्दनी' , 'नामा म्हणे', तुका म्हणे अशा नाममुद्रा दिसतात.
'रामीरामदास' हे वस्तुतः संत रामदासांचे थोरले बंधु असावेत तर नामदेवांच्या साहित्यात नामाम्हणे सोबत इतर संतांच्या तत्दृष्य मुद्रा दिसतात कि जी बहुधा इतर संतांच्या साहित्याची सरमिसळ असावी जसे की 'विषुदास नामा' हे १६ व्या शतकात होऊन गेलेले कवि असावेत. 'विषुदास नामा' यांच्या लेखनाची ओळख करुन देणारा स्वतंत्र धागा लेखही लिहिण्याची इच्छा आहे.
काही मुद्रा एकसारख्या वाटल्या तरी वेगळ्याच संतांच्या असू शकतात आणि हे बर्याचदा माहित नसल्यामुळे एका संतांचे साहित्य दुसर्या संताच्या नावावर नोंदवले जाण्याचे आणि प्रक्षिप्त साहित्य जोडले जाऊन गोंधळाची परिस्थिती बर्याचदा निर्माण होताना दिसते. यात कुठेतरी वाचल्याचे आठवते की नव्या आरत्या अभंग इत्यादी नवोन्मेषीत मुले अथवा तरुणांकडून रचल्या जात असताना पुरेशी सिद्धी(कि प्रसिद्धी ?) प्राप्त होई पर्यंत स्वरचीत आरत्या अभंगात स्वतःची नाममुद्रा गुंफण्याची परवानगी घरातील थोरामोठ्यांकडून मिळत नसे. त्यामुळेही विवीध कारणांनी इतर नाममुद्रा वापरुन रचना केल्या जात कि ज्यामुळे गोंधळात भर पडू शकते.
असा गोंधळ दुर करण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांकडून अलिकडे संशोधनही होत आले असावे तथापी अशा नाममुद्रांबद्दल स्वतंत्र ज्ञानकोशीय लेख अथवा कोशीय यादी अशी पहाण्यात आलेली नाही.
या धागाचर्चेच्या माध्यमातून संतांचे नाव आणि नाममुद्रांचे संकलन करणे आणि कोणती नाममुद्रा कोणत्या संताची याबद्दलचे समज-गैरसमज यांची चर्चा व्हावी असा उद्देश आहे. ह्या निमीत्ताने सहसा कमी परिचीत असलेल्या संतांची संक्षीप्त ओळख माहिती असलेल्यांनी करुन देण्यास हरकत नसावी.
* ह्या धागाचर्चेतील माहितीपूर्ण प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरला जाण्याची शक्यताही असू शकते म्हणून आपले ह्या धागाचर्चेतील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
याद्या
5098
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
छान धागा
+१
In reply to छान धागा by दीपक११७७
'रामीरामदास' हे वस्तुतः संत
त्यांच्या भावाचे नाव गंगाधर
In reply to 'रामीरामदास' हे वस्तुतः संत by आदूबाळ
मला वाटते विकासपिडीयातील लेखन
In reply to त्यांच्या भावाचे नाव गंगाधर by खेडूत
मराठी विश्वकोशातील संदर्भ
In reply to मला वाटते विकासपिडीयातील लेखन by माहितगार
रामी रामदास म्हणजे स्वतः
In reply to 'रामीरामदास' हे वस्तुतः संत by आदूबाळ
कौस्तुभ कस्तुरे यांचा एक
In reply to 'रामीरामदास' हे वस्तुतः संत by आदूबाळ
रामीरामदास अजून एक संदर्भ
In reply to कौस्तुभ कस्तुरे यांचा एक by माहितगार
एक कोडे
चांगला धागा
प्रतिसादासाठी धन्यवाद.
In reply to चांगला धागा by पैसा
ओके
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद. by माहितगार
या लिखाणावर २५ एप्रिल १५२६
In reply to ओके by पैसा
विष्णुदास नामा गोव्यात
In reply to ओके by पैसा
लेख चांगला आहे.
अजून काही प्रश्न