अगदी ऐन वेळी ठरवून सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहाच्या वेळी हे अप्पे करता येतात. जितके पटकन होतात, तेवढ्याच लवकर संपतातही :)
साहित्यः
१ वाटी रवा,
३/४ वाटी दही किंवा १ वाटी ताक,
खायचा सोडा,
पाणी,
मीठ,
तेल,
मोहरी,
कढीपाला,
१-२ टे. स्पून बारीक चिरलेल्या भाज्या (ऐच्छिक)
कृती:
१. फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात मोहरी घाला, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भाज्या घालून २-३ मिनिटे परतून घ्या. मी कांदा आणि ढब्बू मिरची १-१ टे.स्पून घेतली.
२. एका भांड्यात रवा आणि दही/ ताक एकत्र करुन घ्या. साधारण इडलीच्या पिठासारखे होईल अश्या अंदाजाने पाणी घाला.
३. त्यात फोडणी, परतलेल्या भाज्या घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आवडत असेल तर बारीक चिरून हिरवी मिरची घाला (मी घातली नाही).
४. ३/४ टीस्पून सोडा घालून मिश्रण एकत्र करुन घ्या आणि पंधरा मिनिटे झाकून ठेवा.
५. हवी असेल तर तोपर्यंत कोथिंबीर-पुदिन्याची चटणी करुन घ्या.
६. अप्पेपात्र मध्यम आचेवर ठेवा. १-२ थेंब तेल घालून वर केलेल्या मिश्रण अप्पे-पात्रात घाला.
७. झाकण ठेवून ३-४ मिनिटे झाल्यावर सर्व अप्पे उलटून पुन्हा १-२ मिनिटे होऊ द्या.
८. गरम-गरम अप्पे चटणी, केचपबरोबर खायला द्या. मिरची नसल्यामुळे मुलांनीही आवडीने खाल्ले.
(यात पालक, गाजर अश्या भाज्याही घालता येतील.)
वाचने
10100
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा मस्त
पाकृ व फोटू मस्त! लगेच करते व
क्या बात है
मस्त!
धन्यवाद... सोप्प्या पा. क्रु
मस्तच.
फार सुंदर
झकास आणि पौष्टिक पाककृती.
आत्ताच हे आप्पे करून पाहिले.
अरे वा.
In reply to आत्ताच हे आप्पे करून पाहिले. by रेवती
खूप छान पाकृ
आवडता पदार्थ
मस्त रेसिपी.
पाकृ आवडली. नक्की करणार !
फोटो खासच आलाय
ओह..
In reply to फोटो खासच आलाय by दिपक.कुवेत