मँगो पुडींग
पुडींगः १)आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून चौकोनी फोडी करून घ्याव्या. फोडींमध्ये चार चमचे साखर घालावी. कढईत घेऊन पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की उतरून गार करावे.
२) अर्धा लि. दुधातील अर्धी वाटी बाजूला ठेवून बाकीचे गरम करावे. चार चमचे साखर घालावी. अर्धी वाटी गार दुधात दोन चमचे कस्टर्ड पावडर मिसळून घ्यावी. गरम करायला ठेवलेल्या दुधात पावडरचे दूध मिसळावे. सतत ढवळत रहावे. मिश्रण दाट झाले की गार कारावे. लागल्यास साखर वाढवावी.
३) आंब्याच्या कोयींचा रस काढून त्यात चार चमचे साखर घालून मिक्सरला फिरवावा.
४) रायवळ आंब्याचा रस काढून त्यात दोन चमचे साखर, पाव वाटी पाणी घालून ज्यूस करावा. तयार ज्यूस वापरू शकता.
५) काचेचा गोल बाऊल घ्या. तळाला केकचा थर द्या. त्यावर दोन तीन चमचे ज्यूस शिंपडा. त्यावर आंब्याच्या फोडी पसरा. तयार कस्टर्ड मध्ये ३ नं स्टेपला काढलेला रस मिसळून घ्या. आता हे कस्टर्ड आंब्याच्या फोडींवर पसरा. फ्रीजरला गारेगार करा, आणि खा.
वाचने
7202
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा वा
In reply to वा वा by सविता००१
थँक्यू गं!
वॉव मस्त आहे रेसिपी. तोपासु.
मस्त!
फोटू आवडले, रेसिपीही.
लग्न वाढदिवसाच्या भरभरून
In reply to लग्न वाढदिवसाच्या भरभरून by मनिमौ
नक्की
धन्यवाद सर्वांचे
मस्त मस्त
वॉव कसली क्यूट दिसतेय डिश ,ते
मस्त..