प्रत्येक घरात बनवल्या जाणार्या खास पदार्थांची एक खास अशी कृती असते आणि तो पदार्थ तसाच बनला तरच तो घरच्या सगळ्यांना आवडतो. माझं घरही याला अपवाद नाहीच. आता पुरणपोळी हा काही मुद्दाम लिहिण्याचा प्रकार नव्हे. कारण प्रत्येक घरी ती बनतच असते. त्यामुळे इथून तिथून सर्वसाधारण सारखीच पाककृती असणार. तरीही विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते. तीच कृती तुमच्याकरता मी इथे देतेय. जरूर करून पहा...
साहित्यः
पुरणासाठी: २५० ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम साखर, १२५ ग्रॅम गूळ, चिमूटभर हळद, अर्ध जायफळ आणि १ इंच सुंठ बारीक किसणीने किसून.
वरच्या पारीसाठी- पाउण वाटी मैदा. (कणिक घेऊ शकत नाही कारण ती मैद्याइतकी ताणली जात नाही.) २ टेबलस्पून तेल, मीठ चिमूटभर आणि पाणी.
पोळी लाटण्यासाठी: तांदूळ पिठी
पोळीवर लावायला आणि वरून घ्यायला- भरपूर साजूक तूप. हयगय चालतच नाही ;)
कृती: पुरणपोळी करण्याच्या आदल्या रात्री हरभरा डाळ धुवून पाण्यात भिजत घालावी. दुसर्या दिवशी ती ६ वाट्या पाण्यात हळद घालून कुकरमध्ये अगदी मऊ शिजवून घ्यावी आणि कुकरची वाफ गेली की चाळणीत ही डाळ उपसून ठेवावी.
मैदा - तेल, मीठ आणि पाणी घालून खूप तिंबून अगदी सैल भिजवून ठेवावा.(अर्धा तास तरी)
उपसलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात साखर, गूळ घालून शिजत ठेवावे. हे मिश्रण सतत हलवायला लागते नाहीतर करपण्याची शक्यता असते. पुरणातला कालथा/ उलथने छान उभे राहिले की झालं पुरण. मग त्यात सुंठ पूड आणि जायफळ पूड घालून ते तावडतोब पुरण यंत्रातून काढावं. थंड करून घ्यावं.
आता..
पुरीची लाटी घेतो त्यापेक्षाही थोडी छोटी लाटी घेऊन (फोटो क्र.००१) तिच्यात मोठ्या चेंडूएवढं पुरण भरावं.(फोटो क्र. ००२) सराव नसतो तेव्हा हे खूप अशक्य वाटतं. (फोटो क्र.००३) (स्वानुभव बोल्लाच मधे:) )
तांदळाच्या पिठीवर ही पोळी (फोटो क्र. ००४)खूप अलगद लाटावी आणि गरम तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी.
ही पोळी तिच्यावर मजबूत तूप घेउन, दूध, कटाची आमटी याबरोबर फस्त करावी. खरंतर नैवेद्य वगैरे नसेल तर मस्त कांदाभजी आणि ही पुरणपोळी इतकाच मेनू करून स्वर्गसुख मिळवावं.;:)
वाचने
12137
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरणपोळी कमी पुरणपराठा जास्त
हं
In reply to पुरणपोळी कमी पुरणपराठा जास्त by प्रसाद लेले
खुप छान पुरणपोळी...
छान!
मला नाही आवडली
हेमंत८२
In reply to मला नाही आवडली by हेमंत८२
आमच्याकडे पुरणपोळ्यांची पारी
सूड
In reply to आमच्याकडे पुरणपोळ्यांची पारी by सूड
पुढच्या कट्ट्याला बनवून घेऊन
In reply to सूड by सविता००१
वा
In reply to पुढच्या कट्ट्याला बनवून घेऊन by सूड
ऑ
हो
In reply to ऑ by इरसाल
पुरणाचा कट न काढता पुरण
तरीही विकत मिळतात तशा अगदी
छान कृृति , मी पण अशीच पण
हो
In reply to छान कृृति , मी पण अशीच पण by palambar
हळद रंंग येण्यासाठी, थोडी
हळद मीपण घालते
मस्त फोटो आणि कृती
ले म्हन्जे ले भरि
होय, पण गूळ/साखरेला पाणी
In reply to ले म्हन्जे ले भरि by इज्या