पेरणी...झाडांची!
होय, पेरणीबद्दलच बोलतोय मी. पण झाडांच्या.
कसंय ना, आता पावसाळा आला म्हणजे सगळेजण झाडे लावा झाडे लावा म्हणत बोंबलातील. मोठेमोठे बॅनरही लागतील ज्यात नेते मंडळी झाडांपेक्षा मोठी भासतील. पण दरवर्षी 'लावलेल्या' या झाडांचे पुढे काय होते? बऱ्याचदा वृक्षारोपण करायला म्हणून जी झाडे वाटली जातात त्यात आपल्या आसपास वाढणारी(म्हणजे ज्यांची आपण काळजी घेतो आणि वाढवतो) अशी झाडे वाटली किंवा लावली जातात. हि झाडे शाळा परिसर/ गावाच्या परिसरात लावली तरीही त्यांची काळजी घेतलीच जाईल याची शाश्वती नसते आणि ती सुकून/मरून जातात. आणि पुन्हा पुढल्या वर्षी येरे माझ्या मागल्या म्हणत जुन्याच झाडांच्या जागी नवी झाडे लावली जातात सुकून जाण्यासाठी.
या समस्येवर मी तीन चार वर्षे विचार करतोय पण काय करावे हे कळत नव्हते, अडचण एकच होती कि पावसाळा संपल्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी? त्यातही इकडे ग्रामीण भागात आणखी समस्या असतात, शेळ्या, बकऱ्या आणि गुरं या रोपांना खाऊन टाकतात, कधी शेतांच्या बांधांवर लागलेल्या आगीत हि रोपं सुकून जातात तर कधी वणव्यांनी. आपण घराभोवती लावतो ती नेहमीची झाडे इथे कुचकामी ठरतात हे कळून चुकले होते. आणखी एक समस्या होती ती वहातुकीची. पिशवीत रुजवलेली रोपं जास्त दूरवर नेणे शक्य होत नाही पावसाळ्यात. जर तुम्हाला ती डोंगर पायथ्याशी किंवा माळरानावर लावायची असतील, किंवा आपल्या जिव्हाळ्याच्या गड किल्यांवर तर लावायची असतील ते खूपच कठीण होते. याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज होती आणि या वर्षी फक्त विचार न करता काहीतरी कृती करायचे ठरवलेच. अपयश आले तरी बेहत्तर पण प्रयत्न करायचेच असे ठरवले आणि सगळ्यात आधी खालील मुद्यांचा विचार केला:
१) झाडे लावायची कशी? खासकरून दुर्गम भागात.
२) कुठल्या प्रकारची झाडे निवडायची?
३) जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करावे?
स्वात:च शोधून काढलेली उत्तरे:
१) झाडे लावायची नाहीतच, ती पेरायची.
झाडांची रोपे रुजवणे म्हणजे वीची मर्यादा आडवी येते, ती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावायला हवीत. जेणेकरून किमान दिवाळीपर्यंत जमिनीतला ओलावा मिळून ती जास्तीत जास्त वाढतील आणि तग धरू शकतील. पण पावसाळ्यात रानवाटा तेवढ्या चांगल्या स्थितीत राहात नाहीत आणि प्रतिव्यक्ती जास्त झाडे नेणेही शक्य नाही. म्हणून झाडे लावायची नाहीत, पेरायची. जेणेकरून प्रतिमानशी जास्त झाडे नेता येतील. म्हणजे आपण झाडांच्या बियांना फक्त पसरण्यास मदत करायची, बाकी ती त्यांच्या नैसर्गिक इच्छाशक्तीवर वाढतील. याचा आणखी एक फायदा, वर्षभरात कधीही ट्रेकला गेलो तरी हि पेरणी करता येईल, बिया पावसाळ्यात रुजतील.
२) निवडायची झाडे अशी हवीत:
रानोमाळी जगू शकतील अशी रानटी.
कमी पाण्यावरही जगातील अशी.
शक्यतो मूळची भारतीय असलेली.
वेगाने वाढणारी.
बियांच्या स्वरूपात रुजवता येणारी.
आणि मग भराभर मागच्या दोन तीन वर्षातील जाणीवपूर्वक केलेली निरीक्षणे नोंद केली, झटक्यात एक छोटीशी यादी तयारही झाली.
ती यादी पुढीलप्रमाणे:
१)कडुनिंब:
थंड सावलीची अनुभूती देणारे हे झाड मी सौराष्ट्राच्या रखरखीत उन्हात बाभळीच्या जोडीला पाहिलेय मागच्या दोन वर्षांत जामनगर-द्वारकेला दिलेल्या वारंवार भेटींमध्ये. जामनगर सोडले तर ओसाड जमिनींवर मला निवडुंग, बाभळी आणि नंतर कडुनिम्बच जास्त दिसले. माझ्या धावण्याच्या सरावादरम्यानही टेकडीवर कित्येक कडुनिंबाची खोडे दिसली, वारंवार तोडली जाऊनही हार ना मानणारी. त्यामुळे याला पहिले स्थान.
२) करंज:
दाट पानांनी जवळजवळ वर्षभर हा रुक्ष हिरवागार असतो. कुठल्याही देखभालीची गरज अर्थातच नाही, याच्या बियाही सहज मिळतात रानात. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेलाही, त्यामुळे हाही आला यादीमध्ये.
३) बहावा:
दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवणारं हे अजून एक झाड. मला भावतं ते याच्या सोनेरी फुलांमुळे. एप्रिल मे महिन्याच्या गर्मीत पिवळ्या धमक फुलांची झुंबरं लेऊन हा वृक्ष असा डोलत असतो कि ऊन्हानेही गुडघे टेकवत. याच्या शेंगाही मोठ्याप्रमाणावर मिळतील म्हणून मी याच्या पेरणीचा विचार मागच्या वर्षीच पक्का केला. मी आणि बायकोने मागच्याच वर्षी वज्रेश्वरी मंदिराच्या वरच्या टेकडीवर याच्या भरपूर बिया पेरल्याही होत्या.
४)गुलमोहर
अवाढव्य आकार आणि कमीत कमी निगराणी ची गरज. याचेही स्थान आढळच. आणि याच्या बहराचा महिमा तो काय वर्णावा.
५)उंबर, वड, पिंपळ
डेरेदार आणि आपल्या खोडाच्या ढोलीमध्ये अनेक पक्षांना आसरा देणारे हे वृक्ष कुठेही उगवतात. मेख एवढीच कि बिया म्हणून यांची अख्खी फळेच गोळा करावी लागणार.
६) चिंच
नाव घेताच आठवतो तो डेरेदार वृक्ष आणि बालपण. याच्याबद्दल काही लिहायची गरज नाहीच म्हणा. महत्वाचं म्हणजे चिंचोके दुकानातही सहज मिळून जातील.
७) आपटा
दसऱ्याच्या दिवशी याच्या पानांचे महत्व आपल्याला माहित आहेच. हाही रानोमाळी सहज वाढतो. पण याच्या बिया नवरात्रीनंतर मिळतील.
आता मी ज्यांना स्थानिक नावांनी ओळखतो ते वृक्ष.
८) शिंद
मुळात हा खजूराचाच प्रकार, पण कमी गर असलेली आणि काहीशी तुरट लागणारी फळे येतात. पण कुठेही वाढतो म्हणून याला यादीत स्थान, पण काहीसं दुय्यम.
9)शेलटु
याला प्रमाण भाषेत काय म्हणतात माहित नाही पण पसरट गोलाकार पाने, खेळायच्या गोट्यांच्या आकाराची, आत अत्यंत चिकट द्रव्य असणारी काहीशी गोड फळे असतात याची. वाढेल कुठेही.
१०) हुंब
या फळाची फक्त दोन झाडे आतापर्यं मी पहिली आहेत, तीही मावशीच्या गावी. बऱ्याचदा सरळसोट वाढतो आणि बऱ्यापैकी गोड आणि फळाच्या आतमध्ये लाल द्रव असतो . याच्या दुर्मिळ बिया मिळवण्याचे काम खास मावसभावाला द्यावे लागेल.
११) बिबोटी
म्हणजेच बिबवे, हेही रानात जोमाने वाढतात, बिया(बिबवे) मिळणे तेवढं मुश्किल झालंय हल्ली.
या यादीमध्ये खास दोन फळझाडे आहेतच, आपल्या सगळ्यांच्या आवडीची: करवंदं आणि जांभळं, यांच्या बिया तर जमवल्याही मित्राने.
मीही आज सायकलिंग करताना आडवाटेला जात रस्त्यालगत असलेले उंबर, करंज, बहावा हेरून ठेवले आजच. एक दोन दिवसात पिशवी घेऊन भरून आणीन.
जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करता येईल या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे, वर्षभर आपण प्रवास, ट्रेक करतोच. हल्ली मी सायकलनेही रानवाटांना फिरायला लागलोय. कुठेही जाताना प्रत्येक झाडाच्या थोड्या थोड्या इया घेऊन जायच्या, वाटलं तिथे पेरायचा. निवडलेली सगळीच झाडे रानात वाढतील अशीच आहेत. जेवढी जगली-वाढली तेवढी वाढली, आपले प्रयत्न का सोडा. आणि महत्वाचे म्हणजे जांभळं, करवंदे तर आपण घरी खातो तेव्हा त्यांच्या बिया जपणे सहज शक्य आहे. या झाडांपासून फक्त फळेच नाही तर सावली, फुलांतील मध, लाकडं आणि काहीच नाही तरी किमान शुद्ध हवा तरी मिळेलच. त्यात पुन्हा विशेष काळजीची हमी ना घेता केलेल्या वृक्षारोपणाच्या मानाने हि झाडे जगण्याची शक्यताही जवळ जवळ तेवढीच असेल असे मला तरी वाटते. याउलट बिया कमी जागेत आणि कमी वजनात जास्त प्रमाणात पसरवता येतील.
पारंपरिक पद्धतीने झाडांच्या बियांना पसरवणारे पक्षी प्राणी आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आले त्यामुळे आपल्या स्वात:साठी तरी ही जबाबदारी आपल्याला उचलावी लागणारच ना?
बऱ्याचदा ट्रेकिंग करताना उघडे बोडके भकास डोंगर बघताना काळजात चर्रर्र होते, अपराधीपणा वाटतो तो थोडातरी कमी होईल.
आता तुम्हाला आधीच असलेल्या माहितीची उजळणी करण्याचे कारण हे की तुम्हाला माहित असलेल्या इतर झाडांचा या यादीत समावेश व्हावा तसेच कोणाच्या मनात इतर काही आयड्याच्या कल्पना असतील तर त्याही कळाव्यात. आपल्यापैकी कोणी असा प्रकल्प राबवला असेल तर अनुभवांचे स्वागतच आहे आणि सूचनांचेही.
याद्या
23352
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
झाडांच्या बिया अशाच न फेकता
एस जी ..
In reply to झाडांच्या बिया अशाच न फेकता by एस
मला बहाव्याच्या बिया हव्या
पत्ता द्या
In reply to मला बहाव्याच्या बिया हव्या by यशोधरा
सुरेख लेख... माझ्या मते थोडे
पिंपळ ही प्रथम पसंती
In reply to सुरेख लेख... माझ्या मते थोडे by सागर
कोणतेही झाड २४ तास ऑक्सिजन
In reply to पिंपळ ही प्रथम पसंती by सागर
सुरेख लेख... माझ्या मते थोडे
पुढे काय ते बोला पटकन
In reply to सुरेख लेख... माझ्या मते थोडे by सागर
पुढे काय ते बोला पटकन
In reply to सुरेख लेख... माझ्या मते थोडे by सागर
माहितीपूर्ण.
कैऱ्या लागलेलं आंब्याचं झाड
In reply to माहितीपूर्ण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वड पिंपळ या झाडांच्या बिया
उत्तम उपक्रम आहे हा ! थेंबे
छान उपक्रम.
हेच होते
In reply to छान उपक्रम. by मार्मिक गोडसे
चांगला उपक्रम आहे..महत्व
"५)उंबर, वड, पिंपळ
हेच म्हणतो मी
In reply to "५)उंबर, वड, पिंपळ by अरिंजय
फार उत्तम माहितीपूर्ण आणि
उत्तम उपक्रम
झाडांचे?
In reply to उत्तम उपक्रम by mayu4u
छान उपक्रम..
नोंद करणेत आलेली आहे.
In reply to छान उपक्रम.. by विशुमित
काजूसुद्धा
In reply to छान उपक्रम.. by विशुमित
याचीही नोंद करतो
In reply to काजूसुद्धा by पैसा
काजूचे मुरटे (फळं) खायला
In reply to काजूसुद्धा by पैसा
मस्त!
In reply to काजूचे मुरटे (फळं) खायला by कंजूस
आवडीचा विषय म्हणून लगेच धागा
धन्यवाद,
In reply to आवडीचा विषय म्हणून लगेच धागा by जागु
आंब्याचे बाठे, सिताफळ, जांभुळ
आंबा फणस जांभूळ काजू इ
_/\_
In reply to आंबा फणस जांभूळ काजू इ by सुबोध खरे
अतिशय स्तुत्य उपक्रम..
उपयुक्त माहिती.
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम.. by सानझरी
थोडी दुरूस्ती-
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम.. by सानझरी
बापरे,
In reply to थोडी दुरूस्ती- by सानझरी
हे लिहीण्याचा उद्देश इतकाच कि
In reply to बापरे, by इरसाल कार्टं
आपला अभ्यास दिसतोय ह्या विषयात
In reply to हे लिहीण्याचा उद्देश इतकाच कि by सानझरी
+11111
In reply to आपला अभ्यास दिसतोय ह्या विषयात by अत्रन्गि पाउस
याबद्दल सविस्तर लिहेन मी.. तो
In reply to +11111 by इरसाल कार्टं
हि घ्या यादी
In reply to याबद्दल सविस्तर लिहेन मी.. तो by सानझरी
चिंच, सावर, गुलमोहर - या बिया
In reply to हि घ्या यादी by इरसाल कार्टं
धन्यवाद.
In reply to चिंच, सावर, गुलमोहर - या बिया by सानझरी
सुबाभूळ - सुबाभुळाच्या
In reply to धन्यवाद. by इरसाल कार्टं
तुम्ही मागच्या वर्षी टेकडीवर
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम.. by सानझरी
या बियांना हट्टी म्हणतात.
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम.. by सानझरी
उत्तम धागा
आम्ही गेली काही वर्षे
चिंच तर आहेच,
हापिसच्या दारात ओळीने सात आठ
भारी धागा आहे ....
आणखी एक म्हणजे
In reply to भारी धागा आहे .... by प्रसाद गोडबोले
सुंदर उपक्रम ..
शुभेच्छा.
In reply to सुंदर उपक्रम .. by अद्द्या
नांदुरकीचे झाडसुद्धा वडासारखे
छान धागा.. उत्तम उपक्रम.
आमच्या गावात (सातारा, खिंडीतला गणपती परिसर)
स्तुत्य उपक्रम
In reply to आमच्या गावात (सातारा, खिंडीतला गणपती परिसर) by इडली डोसा
मिपाकारांतर्फे...
वा.. फारच उपयुक्त.
In reply to मिपाकारांतर्फे... by इरसाल कार्टं
वा खूप उपयुक्त माहिती, अजुन
भटकी भिंगरी
माहितीपूर्ण.
डोन्गरी आवळ्याच झाड पण चान्गल
बहाव्याने केलेली निराशा...