✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इमान...भाग ५

च
चिनार यांनी
गुरुवार, 05/18/2017 - 09:55  ·  लेख
लेख
आधीच्या चार भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 http://www.misalpav.com/node/39789 http://www.misalpav.com/node/39798 गब्ब्यानं पाच-दहा मिनिट टाईमपास केला. आतमध्ये जाची त्याची काही हिम्मत होयेना. त्याची बायको म्हनली, "आव चाला की आतमंदी" "हाव..जाऊ ना" गब्ब्यानं तिकीट अन आधार कार्ड शोधाले बॅग उघडली. पाच मिनिट झामल झूमल केल्यावर त्याले पाकीट सापडलं. गब्ब्या गेटपाशी गेला अन त्या पोलिसाच्या थोबाडाकडे पायत उभा राह्यला. "काय पाहिजे?" "ते....इमान...तिकीट...." "आतमधे जाच हाय का?" "हाव" "काढ मंग तिकीट." गब्ब्यानं तिकीट दाखवलं. आधार कार्डावरचा फोटो काही नीट दिसेना. "तूच हाय का या फोटोमध्ये?" "हाव..मीच आहो ना तो." "अन सात वाजताच्या फ्लाईटले आत्तापासून कायले आला? तीन वाजले आत्ता कुठं. जाय सहा वाजता ये." "साहेब आता कुठं जाऊ उन्हाचं. जाऊ द्या ना आतमध्ये. म्या बसतो तिकडं कोपऱ्यात जाऊन. कोणाला त्रास न्हाय देत." "बरं... काय हाय त्या बॅगेत? ठेव त्या पट्ट्यावर सारं सामान." "कपडे हाय साहेब." सामान चेक झाल्यावर पोलिसानं त्याईले आतमध्ये सोडलं. आतला झगमगाट पाहून गब्ब्या लयच इम्प्रेश झाला. "अगागागा...काय ते लायटिंग..अन काय त्या चोपड्या फरश्या...अन सगळं चकाचक...अन थंडी पाय ना कशी वाजू लागली..फुल्ल येशी लावेल हाय वाट्टे. याले म्हन्ते लेका एरपोर्ट...नाहीतं आपल्या गावचा स्टॅन्ड बघा च्यामायबीन. नुसता कल्ला असते तिथं..इथं पाय काही आवाज नाही बिलकुल..." थोडावेळ तं गब्ब्या तसाच बसून राह्यला. त्येच्या बायकोला पन काही सुचेना. तिले वेगळेच प्रश्न पडले व्हते, "एवढं चकाचक ठेवाले कोन्या गाईच्या शेनानं सारावते काय माहित बाप्पा?" "अन एवढ्या लायटीचं बिल किती येत आसन?" "अन त्या पोट्ट्या पाय कश्या झपझप चालू राहिल्या..याच हाय का ऐरहोष्टेश?" "अन येवढी थंडी हाय इथं. गोधडी आनाले पाहिजे व्हती.इमानात देतीन का गोधडी?" बराच वेळ बसल्यावर गब्ब्याले बबन्याचं बोलनं आठवलं "हे पाय गब्ब्या..तिथं जाऊन बसून नको राहू झामल्यासारखा..काउंटरवर जाशीनं. तिथं फायनल तिकीट मिळते. अन शीट नंबर लिहेल असते त्येच्यावर.." गब्ब्या उठला अन काउंटर शोधाले जाऊ लागला. पन वीसेक तरी काउंटर होते समोर. कुठं जायचं त्याले कळेना. त्यातल्या त्यात जिथं एक बरी पोट्टी बसेल होती तिथं गेला गब्ब्या. अन भैताडासारखा त्या पोरीच्या तोंडाकडे पायत उभा राह्यला. "येस सर..डू यू वॉन्ट बोर्डिंग पासेस?" "तिकीट...शीट नंबर...." "ओह..प्लिज गिव्ह इट टू मी." गब्ब्यानं तिकीट दिलं. तिनं तिकीट पाहून तोंड वाकडं केलं. "सर धिस इज फॉर इंडिगो...अँड धिस इज गो-एयर काउंटर." "यस यस..एयर तिकीट." "नो सर..गो टू दॅट काउंटर प्लीज.", तिनं तिकीट वापस केलं. गब्ब्याले काही कळेना. तो एअर इंडिया,किंगफिशर,जेट एअरवेज या सगळ्या काउंटरवर फिरून इंडिगोच्या काउंटरवर पोहोचला. त्याले बोर्डिंग पासेस मिळाले एकदाचे. "सर डू यू वॉन्ट टू गिव्ह एनी बॅगेज?" "काय म्हणलं?" "बॅगेज सर?" "हाव हायेत ना बॅगा..थामा आनतो.", गब्ब्यानं गपागप बॅगा आणून पटकल्या त्या पट्ट्यावर. "थँक यू सर." "मॅडम, रिशीट भेटते का सामानाची? तसा भरोसा हाय म्हना तुमच्यावर." "व्हॉट?" "रिशीट म्हणलं रिशीट!! नसनं तं राहू द्या." गब्ब्या जागेवर आला. बायकोनं विचारलं, "येवढा वेळ कायले लागला तुमाले?" "तिकीट आणायला गेल्तो ना." "येवढा वेळ?" "शिष्टीम नाही यायची बराबर..हा म्हन्ते तिकडं जाय..थो म्हन्ते तिकडं जाय. त्याईलेचं माहिती न्हाय कुठं जायचं ते....शिष्टीम नाही बराबर." गब्ब्या थोडावेळ शांत बसला. अन कसलीतरी अनाउन्समेंट झाली. गब्ब्याले एकदम आठवलं. "अर्रर्र...ते बाई म्हनाली होती अनाउन्समेंट झाली का तिकडं जासानं म्हनून. भुललो म्या." गब्ब्या धावतच तिकडं गेला. ती अनाउन्समेंट दुसऱ्याच फ्लाईटची व्हती. तो सिक्योरिटीवाला गब्ब्याले सांगू सांगू थकला. पन जेंव्हा जेंव्हा अनाउन्समेंट व्हायची तेंव्हा गब्ब्या तिकडं पळायचा.शेवटी एकदाची गब्ब्याच्या इमानाची अनाउन्समेंट झाली. गब्ब्या सगळं लचांड घेऊन सिक्योरिटी चेक इन साठी गेला. बायकांची लाईन वेगळी होती म्हनून बायकोला तिकडं पाठवलं. तो सिक्योरिटीवाला गब्ब्याले मशीन लाऊन चेक करत होता. आता गब्ब्यांनं चूप बसावं की नाही, पन नाही ना..गब्ब्या त्याले म्हन्ते, "लय बोअर काम हाय राजेहो तुमचं नाही?" "क्या हुआ?" "बोअर होत असानं म्हटलं.निस्ती मशीन फिरवाची दिवसभर. अन मशीन हाय म्हटल्यावर कोनाची हिम्मत हाय बंदूक आनाची?? बाकी एखांद्याकडे बंदूक-गिन्दूक सापडल्यावर मजा असंनं तुमची?" त्या सिक्योरिटीवाल्याले काही समजलं नाही हे गब्ब्याचं नशीब. गब्ब्याले आता इमानात बसाची घाई झाली होती. हॉलच्या दरोज्यातून इमानं दिसत होते. गब्ब्याच्या इमानाची वेळ झाली. गब्ब्या फ्यामिलीले घेऊन लायनीत उभा ऱ्हायला. इमानाजवळ जायले बसची व्यवस्था होती. पन गब्ब्याले 'कायले येवढा खर्च करते?' हे कळत नव्हतं. बसमधून उतरून गब्ब्यानं इमानाकडे बघितलं. "बाब्बो...येवढं मोठं इमान च्यामायले!! पाय ना...मायला माया हाईट एवढे तं चाकं हायेत त्याचे..पंखा पाय ना तो. आपले दहा-बारा टेबल फॅन मावतीन त्याच्यात." एवढं मोठं इमान अन तो आवाज ऐकून राम्या रडायला लागला. गब्ब्याची बायको म्हनाली, "आवं मी काय म्हन्ते..पोरगं घाबरीन अजून..जायचं का इथून वापस? कायले बसा लागते इमानात?" "म्याट झाली काय तू? चाल गुपचाप." "आवं कायले जायचं आतमध्ये? आतून तं फुल्ल येष्टी सारखंच दिसून रायलं हे." "म्याट आहे तू. तुया बापानं पाह्यलं होतं का इमान कधी?" झालं!! आता गब्ब्याच्या बायकोचा पारा चढला. "हाव..अन तुमी तं जसे इमानातचं पैदा झालते. अन चार-पाच इमानं बांधून ठेवेल हाय आपल्या गोठ्यात मामंजींनं. माया आप्पांले कायले नाव ठेवता?? मगापासून पाहून ऱ्हायली मी..त्या ऐरहोष्टेशकडे डोळे फाडू फाडू पाहू ऱ्हायले. म्या येवढी तयार झाली तुमच्यासाठी..मले एका शब्दानं बोलले नाही. जास्त बोलानं आत्ता वापस जाईन मी इथून." सगळे लोक गब्ब्याकडे पाहू लागले. "आवं तू चूप बस ना माय..चुकलं मायं." गब्ब्यांन राम्याला उचललं अन तो इमानाची शिडी चढू लागला. वरती पोहोचल्यावर ऐरहोष्टेश गब्ब्याकडे पाहून हासली. तिनं गब्ब्याचे बोर्डिंग पासेस चेक केले अन गब्ब्याले आत जायला सांगितलं. आपल्याले इमानात घेतलं ह्याच्यावर गब्ब्याचा विश्वासच बसेना. गब्ब्या तिले म्हनला, "एक मिनिट थांबसान का मॅडम?" "व्हॉट?" गब्ब्या दरोज्याच्या बाहेर आला अन मोठ्यांन बोंबलला,
"बबन्या...सायच्या इमानात घेतलं बे मले !!"

Book traversal links for इमान...भाग ५

  • ‹ इमान...भाग ४
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12697 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

कहर कहर...

संजय पाटिल
गुरुवार, 05/18/2017 - 10:13 नवीन
कहर कहर... क्रमशः र्‍हायलं काय?
  • Log in or register to post comments

=))

पैसा
गुरुवार, 05/18/2017 - 10:32 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहाहा

अद्द्या
गुरुवार, 05/18/2017 - 10:41 नवीन
हाहाहाहाहाहा शेवटपर्यंत विश्वास नव्हता या बेण्याला घेतील विमानात ते .. चढला बाबा एकदाचा =)) लैच भारी
  • Log in or register to post comments

मजा येतेय वाचायला........

गौतमी
गुरुवार, 05/18/2017 - 11:48 नवीन
मजा येतेय वाचायला........ पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

खूप खूप आवडतेय ही कथा.

पद्मावति
गुरुवार, 05/18/2017 - 13:36 नवीन
खूप खूप आवडतेय ही कथा. मागच्या भागात कोणीतरी प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे वर्‍हाड निघालं..च्या तोडीची ही कथा आहे. याचे अभीवाचन करा. मस्तं वाटेल ऐकायला.
  • Log in or register to post comments

मस्त

मित्रहो
गुरुवार, 05/18/2017 - 13:50 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

चला! हुश्श!

एस
गुरुवार, 05/18/2017 - 13:59 नवीन
चला! हुश्श! ;-)
  • Log in or register to post comments

धत्तड धत्तड !!!! घेतला एकदाचा विमानात

जगप्रवासी
गुरुवार, 05/18/2017 - 14:20 नवीन
आता विमानात काय दिवे लावतोय काय माहित
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

चिनार
गुरुवार, 05/18/2017 - 14:39 नवीन
धन्यवाद !! हि कथा इथेच थांबवावी की पुढे न्यावी याबद्दल साशंक होतो.. आता पुढचा भाग लिहावा असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

बे...लिही...लय वाढवता यील...

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/18/2017 - 17:14 नवीन
बे...लिही...लय वाढवता यील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

हि कथा

आनंदयात्री
गुरुवार, 05/18/2017 - 21:03 नवीन
हि कथा इथे संपली हे योग्य वाटले. अर्थात गब्ब्या या पात्राला धरून लेखमालेचा सिझन २ आणाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

LolLolLolLol

पंतश्री
गुरुवार, 05/18/2017 - 15:28 नवीन
हसुन हसुन मेलोच मी LolLolLolLol
  • Log in or register to post comments

येक नंबर..

चिगो
गुरुवार, 05/18/2017 - 16:48 नवीन
हिथंसानच कायले थांबले जी, भाऊ? अजुन लिवा नं.. बम मजा येऊन रायली ना वाचाले..
  • Log in or register to post comments

मजा

आनंदयात्री
गुरुवार, 05/18/2017 - 21:01 नवीन
शेवटचा भाग वाचायला पण खूप मजा आली. कथेत शेवटी गब्ब्याची विमानवारी एवढी छान सुरु झालेली दाखवून त्याच्या विमानप्रवासाच्या आकांक्षेला उत्तम न्याय दिला आहे. पाचही भाग वाचतांना स्वतःला गब्ब्यात शोधात होतो!! =)) तुमच्या लेखणीतून हि हलकी फुलकी कथा अतिशय उत्तम उतरली आहे. उमेश कुलकर्णीसारखा माणूस अतिशय सुंदर चित्रपट बनवेल यावर. किंवा पुरुषोत्तम बेर्डेन्ना तर 'निशाणी डावा अंगठा" समान अजून एक चित्रपट बनावट येईल. अर्थात भारत गणेशपुरेने गब्ब्याचा रोल करायला हवा.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे मनापासून आभार!

चिनार
Fri, 05/19/2017 - 09:43 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार! या कथेत सिनेमॅटिक पोटेन्शिअल आहे का याबद्दल साशंक आहे. अर्थात उमेश कुलकर्णी सारखा माणूस फक्त बैल पकडण्यावर सिनेमा बनवू शकतो तर काहीही शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

एक्दम भन्नाट लिहीली आहे कथा.

सतिश गावडे
गुरुवार, 05/18/2017 - 21:11 नवीन
एक्दम भन्नाट लिहीली आहे कथा. फुल्टु धमाल आहेत पाचही भाग. ही कथा अजून पुढे वाढवू नये असे वाटते. त्याऐवजी पार्ट २ लिहा. कारण ही कथा एकदम मस्त क्लायमॅक्सला संपली आहे.
  • Log in or register to post comments

मलाही असेच वाटते की हा शेवट असावा

इडली डोसा
गुरुवार, 05/18/2017 - 22:21 नवीन
दुसर्‍या विषयावर गब्ब्याला घेऊन लिहा. हा शेवट इथे परफे़क्ट वाटतोय. मस्त झाली पुर्ण मालिका.
  • Log in or register to post comments

मस्त लिवलंय.

इरसाल कार्टं
Fri, 05/19/2017 - 10:16 नवीन
सिझन 2 येउद्या.
  • Log in or register to post comments

हि कथा नका वाढवू .. पण हीच

अद्द्या
Fri, 05/19/2017 - 11:23 नवीन
हि कथा नका वाढवू .. पण हीच पात्रे घेऊन अजून भरपूर कथा घेऊ शकता .. वेगवेगळ्या विषयावर .. मजा येईल वाचायला
  • Log in or register to post comments

सगळे भाग सलग वाचले. लय मजा

अॅस्ट्रोनाट विनय
Fri, 05/19/2017 - 12:45 नवीन
सगळे भाग सलग वाचले. लय मजा आली. अकोला बाळापूरची भाषा वाचून जुने दिवस आठवले. कथा तर जबरदस्त आहेच. इंगळे काकांच्या गुल्लेर सदरासारखंच जमलंय. कथा योग्य ठिकाणी संपली आहे, वाढवू नये असं वाटतं. गब्ब्याला घेऊन वेगळ्या कथा लिहता येतील. येउद्या
  • Log in or register to post comments

मस्त!!

विनिता००२
Fri, 05/19/2017 - 14:05 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

हानतिज्यय्ला, गेलं म्हण की हे

अभ्या..
Fri, 05/19/2017 - 18:40 नवीन
हानतिज्यय्ला, गेलं म्हण की हे ध्यान इमानात. मला वाटले कुठं कुर्ला स्ट्याण्डावर पोहोचते की काय? =)) येंउंदे भावा. मिपाकरांचा दावा है . गब्ब्या एकदम छावा है.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

चिनार
Fri, 05/19/2017 - 23:19 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हाहाहा, मजा आली ! कथा इथेच

स्रुजा
Fri, 05/19/2017 - 23:45 नवीन
हाहाहा, मजा आली ! कथा इथेच संपवा असं माझंही मत :)
  • Log in or register to post comments

झक्कास!!!

दशानन
Mon, 05/22/2017 - 11:53 नवीन
झक्कास!!!
  • Log in or register to post comments

झकास खुसखुशीत कथा ! वऱ्हाडी

सस्नेह
Tue, 05/23/2017 - 15:20 नवीन
झकास खुसखुशीत कथा ! वऱ्हाडी बोलीने मजा येऊ ऱ्हायली :)
  • Log in or register to post comments

बेश्ट एकदम !!!

मनराव
Wed, 05/24/2017 - 19:00 नवीन
बेश्ट एकदम !!!
  • Log in or register to post comments

इमान आवडलं बरं का

amit१२३
Sat, 05/27/2017 - 14:05 नवीन
पाचही भाग एकदम मस्त झालेत ..इमान आवडलं बरं का
  • Log in or register to post comments

मजा आली ...

अभिजीत अवलिया
Sun, 06/11/2017 - 11:35 नवीन
मजा आली ...
  • Log in or register to post comments

हा हा हा कहर बाबा.... एकदम

शित्रेउमेश
गुरुवार, 06/25/2020 - 13:58 नवीन
हा हा हा कहर बाबा.... एकदम झ्याक....
  • Log in or register to post comments

मागे वाचलं तेव्हा पण आवडलं

वीणा३
गुरुवार, 06/25/2020 - 21:50 नवीन
मागे वाचलं तेव्हा पण आवडलं होतं, नक्की लिहा पुढे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा