ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.
साहित्यः
दहा रायवळ आंबे थोडे पिकलेले, एक वाटी मोहोरी, 300ग्रॅम गूळ, दोन चमचे मीठ, दोन चमचे मेथी पावडर, दोन चमचे हिंग, चार चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तेल, थोडी हळद
कृती:
थोडे पिकायला लागलेले आंबे स्वच्छ धुवावेत. पाण्यात घालून दहा मिनिटे उकडावेत. पाण्यातून काढून गार करायला ठेवावेत. 300 ग्रॅम गूळ एका पातेल्यात घ्यावा, त्यात पाऊण ली पाणी घालून पाक करावा. एक वाटी मोहोरी बारीक करून घ्यावी. अर्धी वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद, थोडे तिखट घालून फोडणी करावी, गार करायला ठेवावी. गुळाचा पाक गार करावा. त्यात मेथी पावडर, मोहोरी पावडर, मीठ, तिखट नीट घुसळून घ्यावे. गार झालेली फोडणी मिसळावी. आंब्याची साल देठाकडून सोडवून घ्यावी. काचेच्या बरणीत आंबे ठेवावेत, त्यावर तयार मिश्रण घालावे. हे लोणचं छान मुरलं की खायला घेताना आंबा सोलून खारात कुस्करून खायला घ्यावा. मुरलेला आंबा छान लागतो.

वाचने
11009
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! मस्तच.
अरेरे
कधी येतोयस ते सांग
In reply to अरेरे by दिपक.कुवेत
aahaa
लै वरील खाल्ल्यालं नाय ह्ये
काही म्हणा पण कोकणातले लोकच
थँक्यू पिरा
ग्रेट पाकृ व फोटू.
मस्त!
वा मस्त. ह्याला मेथांबाही
हो?
In reply to वा मस्त. ह्याला मेथांबाही by जागु
वर्षभर टिकतो का हा?
हो टिकतो
In reply to वर्षभर टिकतो का हा? by सूड
खूप छान
आमच्याकडे पण उकडांब्याचे झाड आहे.
जीभ चाळवलीस खरी, पण डायरेक्ट
अनन्या फारच मस्त वाटल पाककृती
तोंपासु.. मस्त मस्त मस्त
फोटो