आजची पवित्र(पाक)-कृती :- "अंबाडीचे शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा"
साहित्य:-
एक चहाचे पातेले, एक गाळणी, पुरेसे पाणी,एक पेला(ग्लास/गिल्लास वगैरे),एक लायटर किंवा आगपेटी(काड्या असलेली), गॅस शेगडी, गॅस सिलिंडर(त्यात गॅस भरलेली पाहिजेच), नाहीतर पेटलेली चूल किंवा कोळशाची शेगडीसुद्धा चालेल, साखर, लिंबू आणि सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे अंबाडीची लालेलाल बोंडं!
कृती:-
१. बागेतून अंबाडीची बोंडं खुडून घ्यावीत. योग्य बोंडं निवडणे महत्वाचे आहे. अंगठ्याने देठ चटकन खुडले गेले पाहिजे. फार पक्व नको किंवा फार कच्चे नको. बोंड्याच्या पाकळ्यांमध्ये पुरेसे रस पाहिजे.
२. मूठ-दोन मूठ बोंडं खुडून घ्यावीत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर पाकळ्या वेगळ्या, हिरवी गाठ(हिच्यात बिया असतात)वेगळी करा. सध्या तरी आपल्या कामाच्या नाहीत. ताटातच राहू द्या.
३. आता सव्वा पेला पाणी पातेल्यात ओता. त्यात ह्या पाकळ्या घाला.लायटर लावून गॅस पेटवा. पहिल्या प्रयत्नात पेटणार नाही. पुन्हा प्रयत्न करा. पेटणार नाहीच!
४. मग सिलिंडरचे रेग्युलेटर(जे आपण रात्री झोपताना बंद केले होते) ते सुरू करा. आता पुन्हा प्रयत्न करा, शेगडी पेटेल. द्रव्याला उकळी येऊन द्या.
५. दोन मिनिटे चांगले उकळले की शेगडी बंद करा आणि पातेले खाली उतरवा. द्रव्य गाळणीने पेल्यात गाळून घ्या. त्यात एका पेल्यात अर्धा कागदी लिंबू आणि दोन चमचे साखर या प्रमाणात मिसळा.
शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा तयार आहे!
हिवाळ्यात चहासारखे गरमागरम प्या(मी हिवाळ्यात केले होते). सध्या उन्हाळा आहे तर त्याला गार होऊ द्या आणि नंतर बर्फाचे दोन-तीन खडे फेका, हिंदी जाहिरातींमध्ये दाखवतात तसे. आता हे अत्यंत चविष्ट असे अंबाडीचे आंबटगोड शरबत शांतपणे ढोसा!! किरपा बरसेगी!
- (परम कृपाळु)स्वामी संकेतानंद
वाचने
16662
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वाह! मस्तच.
नवीन पा कृ
वाह!!
आता सव्वा पेला पाणी पातेल्यात
@शरबत शांतपणे ढोसा!! किरपा
लायटर लावून गॅस पेटवा.
मस्त. आताच्या आता ढोसावंसं
In reply to मस्त. आताच्या आता ढोसावंसं by पुंबा
एखाद्या शेतकर्याला विचारून
स्वाम्या....
In reply to स्वाम्या.... by सविता००१
शेतकर्यांकडे!
लोह
In reply to लोह by मंजूताई
तुमच्याकडे म्हणजे कुठे?
In reply to तुमच्याकडे म्हणजे कुठे? by नूतन सावंत
नागपूर
करून बघणेत येईल..
कागदी लिंबू कुठे मिळेल?
In reply to कागदी लिंबू कुठे मिळेल? by टवाळ कार्टा
बर्फाचे दोन-तीन खडे कुठे
In reply to बर्फाचे दोन-तीन खडे कुठे by टवाळ कार्टा
कागदी लिंबू बाजारात मिळेल.
मरुन जा बे तु!!
In reply to मरुन जा बे तु!! by प्रीत-मोहर
कधीचाच मेलोय मी
पहिल्यांदच बघितले अंबाडीचे फळ
Wow!
स्वाम्या, पहिली अबांडीची
In reply to स्वाम्या, पहिली अबांडीची by पिंगू
+१
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
कुंडीत लावता येईल की! मंडईत
मस्त
स्वामी,ती अंबाडीची बोन्डे
In reply to स्वामी,ती अंबाडीची बोन्डे by नूतन सावंत
परवडत नाय. खी:खी:खी:
सध्या उन्हाळा आहे तर त्याला
In reply to सध्या उन्हाळा आहे तर त्याला by त्रिवेणी
त्यांना पुसायला लावून
मस्त रंग
वोंस्सम
मस्त लागतंय सरबत / सूप!