आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला.
साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप.
कृती: आंब्याचा रस काढून घ्या. तो मिक्सरला फिरवू नका. मधेच एखादा तुकडा छान वाटतो. दही, साखर, तूप आणि आमरस एकत्र करून फेटून घ्या. त्यात रवा मिसळा , आणि दोन तास तसेच ठेवा. दोन तासांनी फ्रायपॅनला तूप लावा. तयार मिश्रणात अर्धा चमचा सोडा, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळून घ्या. फ्रायपॅनमध्ये मिश्रण ओता. आणि सारखे करून २० मिनिटे मंद गॅसवर झाकणासहित ठेवा. वीस मिनिटांनी सुरीचे टोक घालून बघा, मिश्रण चिकटत नसेल तर केक झाला. गॅस बन्द करा. केक थोडा गार झाला की उलटा टाका ताटात! आवडीप्रमाणे कापा, मनसोक्त खा. आंब्याचा स्वाद काय भारी येतो, आणि रंग तुम्हीच सांगा!!
वाचने
15101
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त,मस्त.रच्याकने,ते जास्त
ते इकडे आलं तर मिळतील
In reply to मस्त,मस्त.रच्याकने,ते जास्त by नूतन सावंत
मस्त!
.. ..
भारी
मी काहीही लिहिणार नाहिये आता.
एकच नंबर.
अतिमस्त..
हा हा हा
In reply to अतिमस्त.. by गवि
हो, मागच्या वीकांती
In reply to हा हा हा by अनन्न्या
केक मस्तच अनन्या.
In reply to अतिमस्त.. by गवि
अनेक दुर्दैवी गृहिणींचा हा केक बिघडतो आणि चक्क शिरा बनतो. आंबा फ्लेवर शिरा. आणि शेजारच्या पोरासोरांना खावा लागतो.गुड प्रॉब्लेम टू हॅव :)जबरी
जबराट रंग दिसतोय केकचा.
सुरेख !! वाह, मजा आली.
सुंदर!
काय सुंदर रंग आलाय. ते
काय रंग! वा!
सुरेख दिसतोय केक.
हा आज मी करुन पाह्यला. फक्त
फोटो नाही दिसत
In reply to हा आज मी करुन पाह्यला. फक्त by सूड
मला दिसतोय. इमेज पण शेअर्ड
In reply to फोटो नाही दिसत by अनन्न्या
माझाही गणेशा झालाय. सेटिंग्ज
In reply to मला दिसतोय. इमेज पण शेअर्ड by सूड
भारी झाला आहे केक.
मीही करून बघितला . छान झाला
आमच्याकडेही झाला आज आंबा रवा
वा! मस्तच हो कंजूस काका.
In reply to आमच्याकडेही झाला आज आंबा रवा by कंजूस
भारीच!!
In reply to आमच्याकडेही झाला आज आंबा रवा by कंजूस
अगदी आकर्षक रंग... मस्त..
In reply to आमच्याकडेही झाला आज आंबा रवा by कंजूस
वा मस्त झालाय
In reply to आमच्याकडेही झाला आज आंबा रवा by कंजूस
मस्त. पुढच्या आठवड्यात करतेच