सुरळीच्या वड्या.
शाल्मली आणी रामची आई यांच्या मसालेभात आणि जिलेबी बरोबरच पानाच्या डाव्या बाजुची शोभा वाढवायला कश्या वाटतील...
साहित्य :
डाळीचे पीठ १ वाटी
ताक १ वाटी
पाणी १ वाटी
मीठ चविनुसार
तिखट चविनुसार
मैदा १ चमचा
सारणा साठी साहित्य :
ओल खोबर १ वाटी
कोथिंबिर आवडीप्रमाणे
मीठ चविनुसार
लिंबाचा रस १ चमचा
साखर चविनुसार
आणि मोहरी, हिंग्,हळद घालुन केलेली फोडणी (फोडणी पहिल्यांदा करुन गार होऊ द्यावी. )
कृती :
प्रथम ओल खोबर ,कोथिंबिर,मीठ,साखर, लिंबाचा रस एकत्र करुन व्यवस्थित मिसळुन ठेवावे.
नंतर एका पातेल्यात डाळीचे पीठ ,मैदा ,ताक, पाणी ,तिखट,मीठ घालुन मिश्रण हाताने एकत्र करावे.
(मिश्रणात गाठी राहु देऊ नयेत. )
तयार मिश्रण मंद आचेवर शिजत ठेवावे.
पिठ भांड्यापासुन सुटु लागले की त्यावर झाकण ठेऊन १-१ मिनीटाने २ वाफा काढाव्यात
तयार मिश्रण ताटाला दोन्ही बाजुने पातळ पसरुन घ्यावे.
त्यावर तयार सारण, आणी गार झालेली फोडणी व्यवस्थित घालावी.
त्यावर सुरीने उभ्या चीरा पाडुन गोल गुंडाळ्या कराव्यात.
टिपः
झाकण ठेऊन वाफ काढताना पीठ खालुन करपण्याची भीती असेल तर शिजत आलेले मिश्रण कुकर च्या भांड्यात काढून कुकर मध्ये शिट्टी न लावता ३ मिनीटे
वाफवावे.
वाचने
11233
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आज काय
वा वा वा!
जबरी
ओहोहो!
पागल व्हायची वेळ आली आहे....
मस्त फोटो.
In reply to मस्त फोटो. by प्राजु
टिप्स छान आहेत
शाकाहारी चंगळ
समिधा
In reply to समिधा by वल्लरी
मुगाच्या डाळीच्या
आता अजून काय येणार
एक सुंदर पदार्थ
छान
In reply to छान by जागु
तुटु नयेत म्हणुन
मस्तच.
In reply to मस्तच. by शितल
हेहेहे..
In reply to हेहेहे.. by प्राजु
हा हा हा
In reply to हा हा हा by शितल
केल्या होत्या मीच..
का ग
वा वा एकामागे एक धमाकेदार पदार्थांची रांगच!!
असेच
धन्यवाद
लै भारि
छान
पाकृ. आवडली