साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा, १ टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ, १/४ जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार पाणी.
फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती: सगळ्यात आधी कुकर पाणी घालून गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा. कुकरच्या एका भांड्याला थोडसं तेल लावून घ्या. इनो सोडून सगळे पदार्थ एका मोठ्या बोल मध्ये एकत्र करून पाणी घालून भज्यांच्या पिठाइतपत भिजवून घ्या. चव घेउन आंबट वाटलं तर किंचित साखर घाला. (जर वाटलं तरच)
आता सगळी एनर्जी एकवटून भराभर काम सुरु करायचं बरं का. या पिठात इनो घालून खूप फेटायच. २ मिनिटात हे मिश्रण अगदी हलकं होतं. आता हे मिश्रण ताबडतोब तेल लावलेल्या भांड्यात ओता. अर्ध पातेलं भरेल इतपतच घाला. कारण ढोकळा फुगून ते पूर्ण भरेलच;०:)
हे भांडं ताबडतोब कुकरमध्ये ठेवा. याला उशीर झाला तर ढोकळ्याच्या पिठाचा मूड जातो आणि तो म्हणतो आता नाही फुगणार मी ;) कुकरची शिट्टी न लावता १० मिनिटे वाफवा आणि भांडं बाहेर काढून ढोकळा गार करत ठेवा.
आता एका कढल्यात नेहमीप्रमाणे फोडणी करा. फक्त त्यात हळद घालायची नाहीच्च.. गॅस बंद करून त्यात साखरेचं पाणी घाला. हे मिश्रण ताबडतोब ढोकळ्यावर ओता आणि १० मिनिटेढोकळा झाकून ठेवा.
नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडा आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून तळलेल्या मिरच्यांबरोबर खायला द्या.
ही रेसिपी आपण माझ्या https://savitadeshpande.blogspot.com या ब्लॉग वरही वाचू शकता.
वाचने
10702
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास!
मायक्रोवेव्ह मध्ये प्रयोग
In reply to झकास! by पैसा
मावे
In reply to मायक्रोवेव्ह मध्ये प्रयोग by तुषार काळभोर
वा
तै, ते वॉटरमार्क मध्येच नका
dhanyavad ho
In reply to तै, ते वॉटरमार्क मध्येच नका by सतिश गावडे
दिसतोय छान पण मला डाळ
मस्त!
मस्त आहे रेसिपी. सुंदर दिसतोय
ढोकळा मस्तच दिसतोय.
वा मस्त झालाय
मुळात ढोकळा हा प्रकाराच
आहा..
In reply to मुळात ढोकळा हा प्रकाराच by दिपक.कुवेत
लै झ्याक!
वाह ऑल टाईम फेवरेट
सही दिसतोय ढोकला