मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची फटाफट झणझणीत मिसळ

सविता००१ · · पाककृती
कृती: आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली. आता कट करायचं ठरवलं :) कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं. मी मिसळ नुसतीच तिखटजाळ करण्यापेक्षा ती सणसणीत होईल पण घशात येणार नाही अशी करते. हे परतल्यावर त्यात चिमूट्भर साखर घालून पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि यातही थोडी आमचूर पावडर घातली. तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं ;) हवी तेवढीच दाट होते याने तर्री. मग नेहमीप्रमाणे बाउल मध्ये आधी उसळ, मग तर्री, मग फरसाण घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सजवली. एक लिंबाची फोड आणि गव्हाचा पाव याबरोबर फन्ना पाडण्यास दिली घरच्यांना.  झाली सुद्धा मिसळ. हाकानाका :) . .

वाचने 24286 वाचनखूण प्रतिक्रिया 39

अभ्या.. Mon, 05/01/2017 - 17:49
स वि ता ता ई जब्बरदस्त आयडीया फरसाणाची. नेक्स्टटैम जेंव्हा मिसळ करशिल तेंव्हा आठवणीने काचेच्या भांड्यात न ठेवता दुसर्‍या (पोर्सलीन, स्टील वगैरे) मध्ये ठेवून हाय रेझोलुशन फोटो काढशील? आपल्या मिपावर मिपाकरानेच बनवलेली मिसळीचा फोटो असावा अशी फार इच्छा आहे.

In reply to by अभ्या..

सविता००१ Mon, 05/01/2017 - 20:04
सौताताई च म्हण. अरे मला हे माहित नव्हत. छान स्टील च्या भांड्यात असलेली मिसळ मी काचेच्या बाऊल मधे काढ्ली• अाता नक्की

विशुमित Mon, 05/01/2017 - 18:08
एक महिन्या पासून झारखंड मध्ये आहे कामानिम्मित. पडवळ खाऊन वैतागलो आहे. तुमची पाककृती पाहून तोंडाला पाणी सुटले. कधी परत घरी जातोय असे झाले आहे. फरसाण ची आयड्या आवडली...

पैसा Tue, 05/02/2017 - 09:16
मस्त दिसतेय! खाऊन मग सांगेन कशी झाली ती! =))

एस Tue, 05/02/2017 - 20:13
बास! खूप झालं! आता स्वयंपाकगृहावर स्वारी याच पाककृतीने केली जाईल. धन्यू. (ता. क. - टीव्र निषेढ. जीभ खवळली आहे. कधी एकदा करतो आणि खातो असं झालं आहे!)

In reply to by कंजूस

सविता००१ Wed, 05/03/2017 - 06:23
हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•

In reply to by सविता००१

रुस्तम Wed, 05/03/2017 - 12:04
हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•

गवि गुरुवार, 05/04/2017 - 15:08
तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं
करुन पाहिल्याशिवाय मत देववत नाही पण घट्टपणासाठी फरसाण .... मनात कल्पना करुन उगीच खटकतंय. नुसती पापडी किंवा गाठी वापरुन कदाचित जास्त बरं वाटेल. ओव्हरऑल, अ गुड रेसिपी. ता.क. कोंकणातल्या फरसाणाची सर मुंबईपुण्याच्या आणि देशावरच्या फरसाणांना नाही. खासकरुन मिसळीला योग्य फरसानाबाबत. कोंकणवासीयांकडून / कोंकणप्रेमीयांकडून अनुमोदने स्वीकारली जातील. कोंकणातल्या छोट्यामोठ्या बसस्टँडांवर आणि खाडीच्या फेरीसाठी वाट पाहताना तिथे असलेल्या टपरीत मिसळ खाल्लीय का कोणी? तर मी म्हणतो ते लगेच पटेल.

In reply to by गवि

सविता००१ गुरुवार, 05/04/2017 - 16:18
फरसाण फिरवून लावलं म्हणाले त्यात पापडी आणि गाठीच होती हो.अगदी डाळमूठ वगैरे नाही. इथे पुण्यात सुद्धा एक साधं फरसाण मिळतं आणि एक मिसळीकरता. साधं फरसाण म्हणजे अगदीच बोअर असतं. (वैयक्तिक मत) त्यात फक्त सपक पापडी, तेवढीच सपक जाड शेव असते. मिसळीच्या फरसाणात मस्त सगळी भरताड असते. आणि खमंग. तेच वापरलं आहे मी. (मिसळीत. मिक्सरला लावताना नाही). तुम्ही पहा एकदा करून. कोंकणातल्या फरसाणाबद्दल काही म्हणके काही माहीती नाही मला. तुम्हीच द्या ती इथे.

एस Fri, 05/05/2017 - 18:02
तुम्ही यात सगळ्या पदार्थांचे प्रमाण न दिल्याने थोडा पिरॅब्लेम झालाय माझा. आता माझ्या हिशेबाने बनवण्याचा प्रयत्न करतो. आय ब्लेम यू, सविताताई! :-P

In reply to by एस

सविता००१ Fri, 05/05/2017 - 19:25
अर्र..एकडाव माफी. मी फक्त उसळीच प्रमाण नाही दिल मी. मी एक पावशेर मटकी कुकर मध्ये वाफवून घेतली. आणी फोडणी मध्ये ती घालून मग एक छोता चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातल होत. आणि उसळ सरसरीत होइल एवढ पाणी.

गणामास्तर गुरुवार, 07/20/2017 - 14:52
ठीकठाक रेसिपी आणि फोटो. मिसळ हा पदार्थ असा आहे की त्याचा फोटो पाहूनचं तोंडाला पाणी सुटले पाहिजे, तसे काही झाले नाही. मिसळमध्ये रस्सा आणि तर्री (वाटीतली सेपरेट तर्री मला तर्रीसारखी दिसत नाहीये) दिसतंच नाहीये आणि वरून पेरलेला टोमॅटो खटकला.