ह्या धाग्या बद्दल धन्यवाद.
काही सुचलेले खाली देत आहे.
१. एक मराठी पुस्तक स्वतः साठी विकत घ्यावे. जमले तर अजुन एक घेउन कोणाला तरी "मराठी दिना निमित्त ' असे लिहुन भेट द्यावे.
२. आपल्या मित्रा पैकी जो मराठी असुन ही मराठी बोलत नसेल त्याला मराठी दिनाची आठवण करुन "आज तरी मराठी बोल ' असा आग्रह धरावा. बोलताना तक्रारीचा सुर नसावा. दिनाचे निमित्त करुन पटवण्याचा प्रयत्न करावा.
३.स्वतः बोलताना , अमराठी शब्दांचा वापर होणार नाही हे पहावे.
४.वाचण्याची इच्छा असलेल्या पण अजुन पर्यंत वाचु न शकलेल्या मराठी पुस्तकांची यादी करुन पुढच्या मराठी दिना पर्यंत वाचण्याचा संकल्प सोडावा
अजुन सुचल्यास नंतर टाकेन
आपले सदस्य नाम बदलुन मराठीत लिहावे हे हे हे
माननीय मिपा-सभासद प.रा., आपणांस 'देवनागरी'त लिहावे असे तर म्हणायचे नाही आहे ना?
आमी तर बा त्या दिवशी विज्ञान दिनाची (२८ फेब्रुवारी) तैय्यारी करनार! आमच्या जी.एम.आर.टी.त तेव्हा मोठ्ठं प्रदर्शन आसतं आन तिकडे जाऊन मला मराठीत भाशान द्याचं हाय. तुमालापन २८ फेब किंवा १ मार्चला येळ असंल तर जरूर या आमच्या ग्रम्टला!!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
प्रतिक्रिया
ह्या
हे हे हे
आपले सदस्य
नक्कीच येऊ
चांगली
अशा