Skip to main content

ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष

लेखक राघवेंद्र यांनी सोमवार, 24/04/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे. दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत. ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल
महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 78-848-128-12
दक्षिण 79-859-137-11
पूर्व 45-516-104-8
एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल
महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 8867
दक्षिण 8399
पूर्व 4796
निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे. मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.

वाचने 19784
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

१० फेब्रुवारी २०१५ रोजी केजरीवाल आणि आआप समर्थकांना जितका असुरी आनंद झाला होता त्याच्या चौपट असुरी आनंद मला होत आहे.
डिट्टो फिलिंग

डिसेँबर 2013, फेब्रुआरी 2015, आणि आत्ता यात भाजपाचा व्होट शेअर साधारण सेम राहिला आहे. 34-35% आसपास. कॉम्ग्रेसला जी मतँ 2013 मध्ये गेलेली ती 2015मध्ये आपकडे गेली आणि 2015मध्ये आपला 54% मतं होती. सो २०१३ ही तीन लोकांमधली लढत होती. २०१५मध्ये काँग्रेस अगदीच निग्लिजिबल होती त्यामुळे २०१५ दोन लोकांची लढत होती. आता कॉंग्रेसची जुनी मतं त्यांच्याकडे परत येत आहेत आणि ही परत थ्री कॉर्नर्ड निवड्णूक झाली. सो भाजपाचा भरघोस फायदा झाला.

In reply to by अनुप ढेरे

हे विश्लेषण पटले. भाजपा आणि काँग्रेस, दोघांचेही माध्यममार्गी मतदार फुटलेले. केजरीवालांच्या नालायकपणामुळे ते परत भाजप, काँग्रेसकडे परतले. आता हेच कायम राहील असे वाटते. केजरीवाल आणि आप हा फिनॉमेना संपलेला आहे. :(

एन.डी.टी.व्ही हिंदीवर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज धक्कादायक माहिती देत आहेत. १. आआपचा पराभव ई.व्ही.एम मुळेच झाला. २. भाजपामधील सेफॉलॉजिस्ट (महेश रंगराजन यांच्याकडे रोख दिसत आहे) आणि सगळे लोक आधी ठरवतात की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात मते दाखवायची म्हणजे आपले कामही होईल आणि आकडे संशयास्पदही वाटणार नाहीत. ३. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला हरवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काँग्रेसला जिंकवा. पंजाबमध्ये चौकाचौकात उभे राहून लोक अकाली दलाला शिव्या घालत होते. त्यामुळे अकाली-भाजप युतीला जिंकलेले दाखवले असते तर 'विद्रोह' झाला असता. त्यामुळे तसे करणे शक्य नव्हते म्हणून काँग्रेसला जिंकायचा सोपा मार्ग अवलंबला गेला. याचाच अर्थ आपण मतदान करायला जातो आणि मशीनवरील कोणते बटन दाबतो त्यावर काहीही अवलंबून नसते. सगळे काही आधीच फिक्स्ड झालेले असते. मॉलमध्ये लहान मुलांच्या गाड्या असतात. ती लहान मुले आपणच गाडी चालवत आहोत असे समजत स्टिअरींग काय फिरवतात, ब्रेक काय दाबतात काही विचारू नका. पण प्रत्यक्ष ती मुले त्या गाड्या चालवतच नसतात. त्या गाड्या चालवत असतात मागे रिमोट कंट्रोल घेऊन फिरणारे लोक. सौरभ भारद्वाजांच्या मते मतदानाचे स्वरूप असेच दिसते. हे अत्यंत धक्कादायक आहे.

दिल्ली MCD निवडणुका मतदान : "लेहर" च्या बाजूने आणि "लहरी"च्या विरोधात ;)


अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये तीनही महापालिकांमध्ये भाजपचा विजय झाला. तीनही महापालिकात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. आआप व काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या आआप दुसर्‍या क्रमांकावर आहे. २६ महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेत आआपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला फक्त ३ जागा होत्या तर काँग्रेसला भोपळा मिळाला होता. मागील २ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी अशी होती. २०१३ विधानसभा निवडणुक - भाजप ३४%, आआप २९%, काँग्रेस २५% २०१५ विधानसभा निवडणुक - भाजप ३२%, आआप ५४%, काँग्रेस ९% याचा अर्थ असा की दोन्ही निवडणुकीत भाजपची मते जवळपास कायम राहिली होती. परंतु २०१५ मध्ये आआपने काँग्रेसची तब्बल १६% मते मिळविली. त्याच बरोबरीने बसपची ४% मते देखील आआपकडे गेली होती. त्यामुळे आआपने तब्बल ५४% वर उडी घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या पराभवासाठी आपली मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळविली होती. आजच्या निवडणुकीत अशी टक्केवारी आहे. भाजप ३९%, आआप २६%, काँग्रेस २१% म्हणजे आआपला आपली २०१३ मध्ये मिळालेली मते सुद्धा टिकविता आली नाहीत. २०१५ च्या तुलनेत काँग्रेसने आपली बरीचशी मते आआपकडून परत मिळविली आहेत. भाजपने आपल्या मतात घसघशीत ७% मतांची वाढ केली. आजच्या निकालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. फेब्रुवारी २०१५ मधील आआपची प्रचंड लाट ओसरू लागल्याचे ७ महिन्यांतच स्पष्ट झाले होते. सप्टेंबर २०१५ मधील दिल्ली विद्यापीठाच्या वार्षिक निवडणुकीत आआपच्या विद्यार्थी संघटनेने पहिल्यांदाच सहभाग घेतला. ती निवडणुक चौरंगी होती. अभाविप (भाजप), एनएसयूआय (काँग्रेस), एसएफआय (डावे पक्ष) आणि एआयएसए (आआप) या ४ विद्यार्थी संघटनांमध्ये लढत होती. त्या निवडणुकीत प्रचारासाठी आआपने दिल्ली विद्यापीठात एक रॉक शो आयोजित केला होता ज्याचे उद्घाटन केजरीवाल व सिसोदियांनी केले होते. उद्घाटन समारंभात केजरीवाल व सिसोदियांनी आआपच्या विद्यार्थी संघटनेला मते द्यायचे आवाहन केले होते. त्यावेळी आआपने जाहीर केले होते की त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार आआपला ४४% विद्यार्थी मत देणार आहेत. प्रत्यक्षात मतदान होऊन निकाल लागल्यावर असे दिसले की चारही जागा अभाविपने जिंकल्या व आआपचे उमेदवार तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अवघ्या ७ महिन्यांच्या अवधीत आआपची लाट ओसरायला लागल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर एप्रिल २०१७ मध्ये दिल्लीतील एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आआपचा दारूण पराभव झाला. ती जागा २०१५ मध्ये आआपने जिंकली होती. परंतु पोटनिवडणुकीत आआपच्या उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळून उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. म्हणजे २६ महिन्यांनंतर आआपची प्रचंड लाट पूर्ण ओसरली आहे हे दिसून आले. या महापालिका निवडणुकीमुळे आआपची लाट पूर्ण ओसरलेली असून ओहोटी सुरू झाली आहे हे स्पष्ट झाले आहे. हे होणारच होते. केजरीवाल व आआपच्या नेत्यांचे मागील २६ महिन्यांपासून सुरू असलेले माकडचाळे, भ्रष्टाचार, ढोंगीपणा, अकार्यक्षमता, वशिलेबाजी इ. मुळे मतदार आआपला धडा शिकविणार हे स्पष्ट होते. केजरीवालांनी निवडणुक प्रचारात अजून खालची पातळी गाठली. भाजपला मते दिल्यास दिल्लीत डेंगू, मलेरियाची साथ येईल, भाजपचे कार्यकर्ते ट्रान्सफॉर्मरमधील तेल चोरत आहेत कारण त्यामुळे वीजटंचाई निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे, भाजप महापालिकेत विजयी झाल्यास ते वीज व पाण्याचे दर वाढवतील (वीज व पाण्याचे दर वाढविण्याचा/कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. तो अधिकार महापालिकेला नाही.) असा अत्यंत खालच्या स्तराचा व खोटारडा प्रचार ते करत राहिले. आपण काय करणार यापेक्षा भाजप किती नालायक हाच नकारात्मक प्रचार त्यांच्या मुळावर आला. केजरीवाल आणि त्यांची टोळी यातून धडा शिकेल अशी अजिबात शक्यता नाही. किंबहुना त्यांनी या पराभवातून धडा शिकून वर्तन सुधारावे असे मला अजिबात वाटत नाही. कारण जोपर्यंत केजरीवाल, राहुल, उद्धव इ. मंडळी मोदींविरूद्ध नकारात्मक प्रचार करीत आहेत तोपर्यंत मोदींना अजिबात मते मिळविण्याची चिंता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जोपर्यंत केजरीवाल, राहुल, उद्धव इ. मंडळी मोदींविरूद्ध नकारात्मक प्रचार करीत आहेत तोपर्यंत मोदींना अजिबात मते मिळविण्याची चिंता नाही.
--- सहमत !

स्वराज पार्टी, विजेंद्र यांची त्यात ल्यात्यात सेन्सबल बोलत आहे सकाळ पासून, अजून होप ठेवावी का? बाकी आप चा दन्गा पाहून काय बोलावे हेच कळत नाही आहे, मूर्खांच्या यादीत मी नव्हतो हे सुख की कधी अपेक्षा होत्या त्याच्या कडून याचे दुःख करू :(

कालच्या दिल्ली महापालिका निवडणुकांसंबंधी रोचक माहिती १. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही सगळ्यांनी माकपच्या उमेदवारांना मते दिलेली दिसत नाहीत. त्यातल्याही अनेकांची मते आआपला गेली असावीत :) २. ९० मतदारसंघात काँग्रेसचे, ४० मतदारसंघात आम आदमी पक्षाचे तर ५ मतदारसंघांमध्ये भाजपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ३. नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडने दिल्ली महापालिका निवडणुक लढवली. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मुळचे बिहारचे मतदार आहेत. त्यांची मते मिळतील अशी अपेक्षा असावी. पण जदयुला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत :)

In reply to by गॅरी ट्रुमन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही सगळ्यांनी माकपच्या उमेदवारांना मते दिलेली दिसत नाहीत. त्यातल्याही अनेकांची मते आआपला गेली असावीत :)
नाही. साधारण ९००० मतं आहेत कम्युनिस्ट पार्ट्यांना. पण तेव्हाच, 'नोटा'ला ६०००० आहेत बहुधा.

In reply to by गॅरी ट्रुमन

मनोज तिवारी ला दिल्ली ची जबाबदारी देण्यामागे हे सुध्दा एक कारण होत. पुर्वांचली आणि बिहारी मते भाजपा कडे वळवणे. भोजपुरी सुपर स्टार रहिन बा.

१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. म्हणजेच सहा उमेदवारांना त्यांच्या बायकांनी पण मते दिलेली नाहीत. ))))----

हा धागा प्रामुख्याने निवडणुकसंदर्भात तरिही एक ताजी नॉन राजकीय घटना सांगतो... बाहुबली २ नावाचा भयाण चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. एका शब्दात चित्रपटाचं वर्णन करायचं तर "डोकेदुखी" हे एकच विशेषण वापरता येईल. अत्यंत सुमार कथानक, सुमार संगीत, बाहुबली १ पेक्षा एक इंच देखील अभिनयाची उंची न वाढवलेले कलाकार, तंत्रज्ञानाच्या वापरातुन युद्धदृष्यांना थ्रीलर बनवण्याऐवजी थिल्लर बनवणारे स्पेशल इफेक्ट्स, पांढर्‍या रंगात अधिकचा चुना मिसळुन घडवलेली नायकाची प्रतिमा... बरच काहि आहे. अजीबात बघु नका. सर्वात जास्त राग आला त्या सो कॉल्ड सस्पेन्सचा... कटप्पाने बाहुबली को क्यु मारा. च्यायला त्याच्या...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इथे केजरींचच समीक्षण व्हायची वेळ आलि आहे. तसं बघितलं तर केजरीसाहेब अगदी चपखल उदाहरण आहे बाहुबलीचे. बाहुबली१ आणि २ मधे नेमका केजरीवाल २०१५ आणि २०१७ असाच फरक आहे. आता तुम्हाला नेमकी कल्पना येईल किती भयंकर चित्रपट आहे हा.

#BawanaByPoll बवाना निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि सहाव्या फेरीनंतर काँग्रेस - सुरेंद्र कुमार - १३१८२ भाजप - वेद प्रकाश -९७४५ आआप - राम चंद्रा - ९४९९ भाजप आणि आआप या दोंघाना ही धोक्याची सुचना आहे.