✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाबाची चप्पल

म
मूखदूर्बळ यांनी
Sat, 04/15/2017 - 11:26  ·  लेख
लेख
बाबाची चप्पल फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच. परीक्षेला जाताना त्याची चप्पल घालून गेलो की खुप छान वाटायच. अगदी पेपर सोप्पा जायचा. पाय मोठा झाल्यावर मग ती चप्पल पायाला येइनाशी झाली. तरीही कोम्बून पाय त्यात भरायचो. मग पुढे शिक्षण झाल्यावर नोकरी निमीत्त बाहेर गावी गेल्यावर चपलेचा सन्बध तुटला. अगदीच तुटल्या तुटल्या सारख झाल. बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्‍या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली. पुढे चपलेने मला धीर दिला. बाबाची वाचनाची आवड मी लिखाणातून भागवली. चालण्याची आवड मैलोनमैल प्रवास करून भागवली. बडबडण्याची आवड बडबडून भागवली. खाण्याची आवड खाद्य पदार्थान्चे दुकान सुरू करून भागवली. परोपकाराची आवड अनेकाना मदत करून भागवली. आता खर्‍या अर्थाने चप्पल माझ्या पायाला यायला लागली होती. अनेकदा मी बाबाची चप्पल पायात घालून बाहेर जातो. घरचे ओरडतात पण मी ऐकत नाही. त्याना माझे आणि चपलेचे नाते त्याना माहीत नाही त्याला ते तरी काय करणार? कधी कधी मी कुण्या स्नेह्याकडे जातो. चप्पल त्याच्या घराबाहेर काढतो. स्नेही मग विनोद करतात. म्हणतात. तुझ काय बर आहे. तुझी चप्पल कधीच चोरीली जाणार नाही (मनात: इतकी जुनी पुराणी चप्पल कोण नेणार?) सर्व जण हसतात मी सर्वात मोठ्याने हसतो आणि हळुच म्हणतो ही चप्पल माझ्या बाबाची आहे आणि " In real sense, I stepped into my father's shoes" केदार साखरदान्डे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
व्यक्तिचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7661 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

....

पैसा
Sat, 04/15/2017 - 12:02 नवीन
......
  • Log in or register to post comments

हृद्य मनोगत !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/15/2017 - 12:20 नवीन
हृद्य मनोगत !
  • Log in or register to post comments

.......

आनन्दा
Sat, 04/15/2017 - 13:38 नवीन
.......
  • Log in or register to post comments

फारच हृद्य लिहिले आहे!

एस
Sun, 04/16/2017 - 08:45 नवीन
फारच हृद्य लिहिले आहे!
  • Log in or register to post comments

फारच हृद्य लिहिले आहे!...

संजय पाटिल
Sun, 04/16/2017 - 15:47 नवीन
फारच हृद्य लिहिले आहे!...
होय...
  • Log in or register to post comments

फारच हृद्य लिहिले आहे! +1

जव्हेरगंज
Sun, 04/16/2017 - 16:06 नवीन
फारच हृद्य लिहिले आहे! +1
  • Log in or register to post comments

छान !

संजय क्षीरसागर
Sun, 04/16/2017 - 18:31 नवीन
मस्त लिहीलंय .
  • Log in or register to post comments

वाचताना नकळत डोळे ओलसर झाले..

उपेक्षित
Sun, 04/16/2017 - 20:20 नवीन
वाचताना नकळत डोळे ओलसर झाले... बाकी काय बोलू ?
  • Log in or register to post comments

+१

अनुप ढेरे
गुरुवार, 04/20/2017 - 11:01 नवीन
हेच बोलतो. खूप हृद्य लिहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

+१

ट्रेड मार्क
गुरुवार, 04/20/2017 - 19:08 नवीन
.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

.................. सुन्नं....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/16/2017 - 21:41 नवीन
.................. सुन्नं........................
  • Log in or register to post comments

फार सुरेख लिहीलंय.

किसन शिंदे
Sun, 04/16/2017 - 22:53 नवीन
फार सुरेख लिहीलंय.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलय.

रेवती
Mon, 04/17/2017 - 04:08 नवीन
सुरेख लिहिलय.
  • Log in or register to post comments

मनस्पर्शी लिखाण.

प्रमोद देर्देकर
Mon, 04/17/2017 - 06:11 नवीन
मनस्पर्शी लिखाण.
  • Log in or register to post comments

छान...

योगी९००
Mon, 04/17/2017 - 09:57 नवीन
फार छान प्रकारे लिहीलेयं...वाचताना मला माझ्या वडीलांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

+१

रायबा तानाजी मालुसरे
गुरुवार, 04/20/2017 - 14:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

स्पीचलेस

प्रसन्न३००१
Mon, 04/17/2017 - 11:06 नवीन
स्पीचलेस
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

मूखदूर्बळ
Tue, 04/18/2017 - 10:45 नवीन
धन्यवाद :) मनातले अश्रु शब्दावाटे उमटले इतकेच :(
  • Log in or register to post comments

मनातील बोललात

खटपट्या
Tue, 04/18/2017 - 11:36 नवीन
मनातील बोललात
  • Log in or register to post comments

फार छान लिहीलयं

अनय सोलापूरकर
Wed, 04/26/2017 - 16:17 नवीन
बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्‍या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली. >> माझा स्वानुभव . :(
  • Log in or register to post comments

_/\_

अजया
Wed, 04/26/2017 - 18:13 नवीन
ह्रदयस्पर्शी लिखाण.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूखदूर्बळ
Mon, 05/01/2017 - 09:10 नवीन
धन्यवाद _/\_ लेख लिहीताना डोळ्या समोर माझे बाबा येत होते :( जीते पणी मी त्यान्चे व्यवस्थीत करू शकलो नाही ही सल मनाला कायम टोचत राहील :(
  • Log in or register to post comments

जाम टोचलं :(

रातराणी
Mon, 05/01/2017 - 10:05 नवीन
जाम टोचलं :(
  • Log in or register to post comments

हृद्गत पोचले.

बांवरे
Tue, 05/02/2017 - 06:45 नवीन
हृद्गत पोचले. झाडांशी निजलो आपण ...
  • Log in or register to post comments

सुरेख

मी-सौरभ
गुरुवार, 05/04/2017 - 18:39 नवीन
हृदयस्पर्शी ....
  • Log in or register to post comments

बापाबद्दल बाप लेखन.

अभ्या..
गुरुवार, 05/04/2017 - 18:53 नवीन
बापाबद्दल बाप लेखन. बाबांची चप्पल हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. फूटवेअर भारीतले ब्रँडेड पाहिजेत ही सवय मला वडीलांनी लावली पण स्वतः त्यांचा चॉइस एकच. बाटाची ज्युबिली टी पट्टा. पण ते स्वतःसाठी नवीन चप्पल लवकर विकत घेत नाहीत. ती सवय मला लवकर लागो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय

पाटीलभाऊ
Fri, 05/05/2017 - 18:01 नवीन
मस्त लिहिलंय
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

जयंत कुलकर्णी
Sat, 05/06/2017 - 03:10 नवीन
छान लिहिले आहे. माझीही एक आठवण... इयत्ता तिसरी. किंवा चौथी. पाचवी निश्चित नाही कारण मी पाचवीत शाळा बदलली होती. शाळा सरस्वती मंदीर. मधली सुट्टी झाली आणि मी शाळेच्या पटांगणात आलो. धक्काबुक्कीतून मी दरवाजाकडे चाललो होतो. दरवाजात पांढऱ्या शुभ्र कपड्यात, शर्टाच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या, चकचकीत बुट घातलेला एक स्मार्ट माणूस पटांगणातील एका मुलाच्या पायातील बुटाची सुटलेली नाडी बांधत होता. उभट चेहरा, थोडे कुरळे केस व टिपिकल फौजी हेअरकट. त्याचा मातीत टेकलेला एक गुडघा त्याची पँट मळवत होता...... माझ्या वडिलांचे मला आठवणारे हे पहिले अंधुकसे रुप...... फादर्स डेच्या निमित्त एक आलेली आठवण.. सगळ्यात जुनी आठवण कुठली असेल म्हणून आठविण्याचा प्रयत्न केला असता ही आठवण पुसटशी आठवली..
  • Log in or register to post comments

नि:शब्द !

जेनी...
Sat, 07/01/2017 - 16:18 नवीन
नि:शब्द !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा