✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तकदिनानिमित्त विडंबन- (बघ माझी आठवण येते का?)

स — स्वामी संकेतानंद, Sun, 04/23/2017 - 21:25
सौमित्र आणि शेक्सपिअर दोघांची क्षमा मागून :- रात्री दिव्याखाली ’मॅकबेथ’ हाती घेऊन पहा बघ माझी आठवण येते का? पाने चाळ, पाचव्या ऍक्टचा पहा पाचवा प्रसंग मॅकबेथची सॉलिलॉकि वाचून टाक बघ माझी आठवण येते का? डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द ऑक्सफ़र्डमध्ये बघ डोके आपटून घे, वैतागून जा नाहीच कळलं काही तर बंद कर ते,’सॉनेट्स’ घे त्या डोक्यावरून जातीलच,शब्दांची जुळवाजुळव करून अर्थ लावून पहा भंडावून जाशील तू, बघ माझी आठवण येते का? मग सुरू हो, शेक्सपिअरची सगळे साहित्य चाळून घे चाळत रहा पुस्तके संपेपर्यंत, काही कळणार नाहीच, शेवटी रडून घे कपाट बंद करू नकोस, दिवा मालवू नकोस, पुन्हा तेच मॅकबेथ हाती घे आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल, त्याच्या हातातला फोन घे, टाय तो स्वतःच फेकेल, तो विचारेल तुझ्या रडण्याचं कारण, तू म्हण ’अमृता’ छळतेय मग कॉफ़ी कर, त्यालाही दे, तो तुला ’हॅरी पॉटर’ देईल, ते तू बाजूला सार सार्त्रचे ’नो एक्झिट’ वाचायला घे, बघ माझी आठवण येते का? मग मध्यरात्र उलटेल,तो बिनबॅगवर पसरेल, म्हणेल मला ’वपु’ आवडतात, पण तूही तसंच म्हण विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल तो ’तप्तपदी’मोठ्याने वाचू लागेल, तू त्याच्या ’कलेक्शन’कडे पहा बघ माझी आठवण येते का? यानंतर जड डोळ्यांनी ’फ़ाउन्टनहेड’ वाचायला विसरू नकोस यानंतर ग़ालिबच्या गझला नुसत्या आठवण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली ’पुशि’ घे, जागे राहण्याचा प्रयत्न कर येत्या पुस्तकदिनी एक क्षण तरी, बघ माझी आठवण येते का? - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
3726 वाचन

💬 प्रतिसाद (5)

मस्त!

पैसा
Sun, 04/23/2017 - 22:32 नवीन
लै आवडले!
  • Log in or register to post comments

आईशप्पथ! खतरा लिहिलंय! आणि हे

एस
Sun, 04/23/2017 - 23:08 नवीन
आईशप्पथ! खतरा लिहिलंय! आणि हे सगळं तुम्ही स्वतः वाचलं असेल तर एक _/\_
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Tue, 04/25/2017 - 15:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
Tue, 04/25/2017 - 15:43 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

मस्त :)

विनिता००२
Wed, 04/26/2017 - 10:00 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा