बाहेर भरपूर हिमवर्षाव चाललाय. थंडीने गारठून गेलेय सारं. अश्या वेळी गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर तिखट थीलापिया कालवण आणी पापलेट फ्रायची मजाच काहि और आहे..
या आजच्या बेताचे काही फोटो.
थीलापिया करी -
थीलापियाचे ( नसल्यास रावस किंवा सुरमई पण चालेल ) तुकडे हळद, मीठ, लाल मिरची पावडर लावून १०-१५ मिनीटे ठेवावे.
२ इंच आलं, १ गड्डा लसुण, १ छोटी जुडी कोथिंबिर, १/४ ताजा खवणलेला नारळ, ३-४ हिरव्या मिरच्या असे वाटण वाटून घ्यावे.
एका भांड्यात थीलापियाचे तुकडे, वाटण, थोडासा मालवणी मसला असे सगळे एकत्र करून घ्यावे. बोराएवढी चिंच कोळून घ्यावी.
चिंचेचे पाणी थीलापियात टाकावे. १० मिनीटे शीजवून एक दणदणीत उकळी आणावी.
वाफाळत्या भातावर सर्व करून सोबत कच्चा कांदा आवर्जून घ्यावा.
पापलेट फ्राय -
पापलेटच्या तुकड्यांना आल - लसुण - हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, लाल मिरची पावडर लावून १०-१५ मिनिटे ठेवावे.
तुकडे रवा किंवा तांदळाच्या पिठित घोळवून घ्यावे. तव्यावर गरम तेलात श्यालो फ्राय करून घ्यावेत.
फिशकरी - भाताबरोबर ताव मारावा.. वाढत्या वजनाचा मुळीच विचार करू नये. जेवण झाल्यावर ताणून देणे अगदी जरूरी..
| From Drop Box |
| From Drop Box |
| From Drop Box |
वाचने
5891
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम यम यमी . . .
घ्या ..
In reply to यम यम यमी . . . by सुक्या
सह्ही फोटो..
तात्या,लवक
In reply to सह्ही फोटो.. by प्राजु
सह्ही
नाहि बा!
In reply to सह्ही by संदीप चित्रे
उत्तम
आहा.......
तुच ये इथे पार्सल होऊन..
In reply to आहा....... by गणपा
शब्द
तात्या..
In reply to शब्द by विसोबा खेचर
व्वा व्वा
थीलापिया हा गोड्या पाण्यातला मासा आहे..
In reply to व्वा व्वा by खादाड