Skip to main content

भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळे

लेखक विकास यांनी बुधवार, 03/12/2008 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत जे आत्ता अतिरेकी हल्ले झाले, तसेच गेल्या दशकापासून जे अनेक अतिरेकी हल्ले मुंबईत आणि भारतातील इतर शहरात झाले त्यासंदर्भात आपण येथे बर्‍याच चर्चा करत आहोत. त्याचे मूळ शोधताना हे जणू काही १९९२ सालानंतर अचानक चालू झाले असा सूर लागतो. आता त्यासंबंधात मी मला माझ्या काही माहीतीवर आधारीत जे काही माहीत आहे ते येथे लिहीत आहे. त्यात तथ्य आहे अथवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्‍याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती. आधीच्या चर्चेत दाउद ने जे मुंबईत १९९३ साली बाँब उडवण्याचे कारस्थान रचले तें बाबरी मशिदीच्या विरोधात होते असा सूर आला आहे. त्या संदर्भात विचार केल्यास काय जाणवते? सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून. या संबंधात फक्त इतकेच म्हणले जाते, "असे समजण्यात येते की ही स्फोट मालीका बाबरी मशिदीमुळे झाली" अर्थात तसे झाले असे क्षणभर धरले तरी त्याचे समर्थन करायचा प्रश्न येत नाही. नाही तर तसे काय रामजन्मभूमीचा ४०० वर्षाचा हट्ट (आणि स्वातंत्र्यानंतर जा-ये करत गेलेला हट्ट) हा अचानक इतका मोठा होण्यास शहाबानो प्रकरण आहे ज्यात अयोग्य घटनादुरूस्ती करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून एका अर्थाने स्त्रीच्या आणि मानवी हक्कांवर गदा आणली असे येईल. पण मी असल्या कुठल्याच समर्थनात पडू इच्छित नाही. दुसरा भाग म्हणजे, दाउद हा ना धार्मिक मुसलमान आहे ना धर्मांध मुसलमान आहे. तो फक्त माफिया आणि स्मग्लर होता आणि आहे. जुगार, वेश्याव्यवसाय आणि ड्र्ग्ज ह्यावर त्याने साम्राज्य तयार केले. या तिन्ही गोष्टींना इस्लाम मधे बंदी असल्याचे माहीत असेलच. त्याचे आणि मुंबई पोलीसांचे युद्ध हे अनेक वर्षे चालले होते. त्याने या काळात अनेकांना मारले होते पण शेवटी पोलीसांना यश येऊ लागले. तेंव्हा दाउद १९८६ साली म्हणजे मुंबई बाँबस्फोट मालीकेच्या आधी जवळपास ७ वर्षे दुबईला जाऊन बसला. अर्थात त्याचे साम्राज्य तो रिमोट कंट्रोलने चालवत होताच. या काळात पण अनेक एन्काउंटर होऊन त्याचे डावे-उजवे सहकारी मेले होते. दाउद स्वतः कधी काळी स्थानीक होता आणि त्याची टोळी ही स्थानीकच होती. त्यामुळे मुंबई पोलीसांना आणि पर्यायाने भारताला धडा शिकवण्यासाठी त्याने अतिरेकी कारवाया चालू केल्या कारण तो पूर्ण "कॉर्नर" झाला होता. कदाचीत त्याला असेही वाटले असेल की पाकीस्तान सरखे भारतात वरकरणी सरकार आणि आतून निर्नायकी होईल. सुदैवाने आपल्याकडे लोकशाही रुजली आहे त्यामुळे तसे झाले नाही आणि या माफियाकिंगला कायमचा अज्ञातवास नशिबी आला. आजता गायत दाउदने कधिही धर्माच्या नावाने काही केल्याचे ऐकलेले नाही, त्यामुळे त्याच्याकड सामन्य मुसलमान जसे एक वेळ बीन लेडन कडे त्यांच्या मसीहासारखे बघत असतील तसे बघत असणे संभवत नाही. आता हे होण्या आधी ८०च्या दशकाच्या शेवटाला (व्हि पी सिंग पंतप्रधान झाल्यापासून) काश्मिर प्रश्नावरून पाकीस्तानने अतिरेकी तयार करणे हे जोरात मनावर घेतले. त्याचे परीणाम आधी काय झाले याचा विचार केल्यास काय दिसते? तर ३ ते ४ लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली. त्याच काळात अनेक अत्याचार झाले ज्याचे वर्णन मी येथे करत नाही तसेच हिंदूंच्या म्हणून ज्या काही वास्तू असतील त्यांना भग्न केले गेले. अर्थात त्याकडे आपण (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वचजण) दुर्लक्ष करत होतो. कारण जळत असली तरी ते आपले नव्हते अशी भावना आणि आलटूनपालटून जी कुठली टोपी आहे त्याप्रमाणे एकदा नेहरूंनी तयार केलेला आंतर्राष्ट्रीय काश्मिरी मुद्दा आणि आता तो पाळला पाहीजे म्हणणारे, दुसरीकडे तेथील मुसलमानांच दोषी ठेवणे तिसरीकडे राजकारण्यांना नावे ठेवणे आणि आपण काय करणार असे म्हणत पण एकंदरीत दुर्लक्ष करणारे सर्व इतर सामान्य भारतीय...पण यात फार कमी विचारांनी दहशतवाद म्हणून लक्ष दिले. सरकारने तर पूर्णपणे दुर्ल़क्ष केले. पण असा हा काश्मिरमधील दहशतवाद वाढायचे कारण तरी काय होते? बाबरी मशिद? ती तर तेंव्हा उभीच होती... मग त्या भागातील हिंदू-मुसलमान? पण ते देखील स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतरदेखील तेथे बहुतांशी गुण्यागोविंदाने रहात होतेच की. मग असे काय होत होते? कडवे हिंदू चिथावत होते? ... विचार करा परत, की हे कधी चालू झाले त्याचा - ज्याला अपसर्ज असा शब्द आहे तो प्रकार चालू झाला तो ८०च्या दशकात. त्याच वेळेस पाकीस्तानच्या दुसर्‍या बा़जूस म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूस काय होत होते? अमेरिकेने रसद पुरवून बिन लादेन आणि त्याचे सहकारी तयार केले होते - मुजाहीदीन हा त्याकाळात प्रकर्षाने प्रचलीत झालेला शब्द आहे. हे सर्व अफगाणिस्तानात बाहेरून लढायला आलेले होते. त्यांचे युद्ध रशिया विरुद्ध अफगाणिस्तानात चालू होते. बघता बघता ते वरचढ होऊ लागले. मला लहान होतो तरी देखील चांगलेच आठवते आहे की त्या काळात अफगाण पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष - त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण इंदीरा गांधी मुळे भारतात बर्‍याचदा दिसायचा आणि अर्थातच सोव्हीएट पपेट होता, त्याला या मुजाहीदीनने सरळ पकडून फासाला लटकावले. आश्चर्य म्हणजे हे त्या वेळीस दुरदर्शनवर त्याचे लटकणारे पाय दाखवले होते (कदाचीत प्रणव रॉयच्या "द वर्ल्ड धिस वीक" मधे असेल). तर अशा या वरचढ झालेल्या मुजाहीदीनपुढे आधीच इतरत्र आणि घरात डळमळीत झालेल्या सोव्हीएट राज्यास रहाणे हे "कॉस्ट बेनिफीट"चा विचार करता अवघड वाटू लागले आणि ते सोडून गेले. अमेरीकेचा अफगाण स्ट्रॅटेजीत विजय झाला. तो काळ होता १९८७ चा रेगनचा... त्याच काळात अमेरिकेत "ग्रेटेस्ट रिसेशन ऑफ १९९०ज " चालू झाले होते. तेंव्हा माकडीने स्वत:ला वाचवायच्या भानगडीत या मुजाहीदीनच्या पिल्लाला ढकलून दिले. त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला. आता हे निव्वळ युद्धावर जगणारे मुजाहीदीन आणि त्यांच्याकडची शस्त्रे ही पाकीस्तान काबीज करायला लागली. बीन लेडन मात्र तो पर्यंत नेता होऊ लागला होता... अर्थात त्याला इष्टापत्ती समजत तत्कालीन हुकूमशहा झिया उल हक यांनी त्यांना "काश्मिरीच्या लढ्यासाठी"पाठवले. पुढचा इतिहास आणि त्यातील परीणाम वर सांगितल्याप्रमाणे आहेत. काश्मिरवर हल्ले सुरू झाले, पंडीत निर्वासीत झाले वगैरे वगैरे...चीन मधे पण यातून काही प्रकरणे झाल्याचे या संदर्भात आठवते, पण चीन काही कुणाचे ऐकणार नाही आणि आपले कम्युनिस्ट त्यांकडे दुर्ल़क्ष करणार हे ठरलेलेच असते. पण राक्षसी भूक आणि महत्वाकांक्षा थांबवल्याशिवाय थांबत नसते आणि त्याला जसे राक्षसाला हाताळायचे असते तसेच हाताळावे लागते हा युगानुयुगे जगभर चालत आलेला नियम आहे. त्याला हे मुजाहीदीन तरी कसे अपवाद असणार? पण दुर्दैवाने अनेक कारणाने आपण त्याला महत्व दिले नाही आणि डोळ्यावर कातडे ओढून बसलो. आज हा राक्षस आपल्याला जे दार होते तेथून आत येऊन घरात आला आहे... याचेच अजून एक उदाहरण पहा. शिवसेना-भाजपाचे जेंव्हा राज्य होते तेंव्हा बाळासाहेब ठाकरे हे बांग्लादेशींच्या घुसखोरीवरून त्यांच्या पद्धतीत ओरडत होते. अर्थातच प्रचंड बोंबाबोंब झाली. त्यात आघाडीवर अर्थातच बंगाली कम्युनिस्ट पण इतर स्वतःला सेक्युलर समजणारे आणि काँग्रेस होतेच. पण गेल्या काही वर्षात विलासराव कितीवेळा तेच म्हणालेत अथवा ते पहा. आता बंगाली कम्युनिस्टपण तेच म्हणत आहेत. पण त्यावेळेस दुरक्ष केल्याने आजपण आसाम मधे बाँबस्फोट होत आहेत आणि मुंबई सकट अनेक शहरे ही या नवीन दहशतवादी गुन्हेगारीच्या सावलीत आहेत. पण हे सर्व का झाले? कारण सवंग राजकारण आणि सेक्युलॅरीझमचा जप करत धार्मिकतेच्या चष्म्यातून गुन्हे आणि गुन्हेगार हे दानव आहेत का मानव ते ठरवणार... म्हणजे हिंदू असतील तर "हिंदू" असे म्हणत त्यांना राक्षस म्हणणार आणि "मुसलमान" असतील तर मात्र "त्यांना तसे म्हणायचे नाही" असे म्हणत त्यांना अडाणीच ठेवणार. थोडक्यात आधीपण इतरत्र म्हणलेले आहेच पण पुनरुच्चार करत मला काय वाटते ते सांगतो, " आजच्या दहशतवादाचे आणि दहशवाद्यांचे मूळ हे जसे आंतर्राष्ट्रीय सीमेच्या सभोवताल होत असलेल्या भूराजकीय घटनांशी जोडलेले आहे, तसेच त्याचा वेळीस अंदाज न घेता योग्य निर्णय न घेण्याच्या कमकुवत नेतृत्वाशी आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे."

वाचने 31083
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by विकास

>>आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता? सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही. हे तरी मान्य आहे का? मग इथल्या मुसलमानांना ही पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करण्यासाठी कोण पेटवत आहे? त्यांच्या मनात असुरक्षीततेची आणि सुडाची भावना कुणामुळे धिक जोपासलि जात आहे? >>आजतागायत सुडोसेक्युलर्स नावाचे काही प्रकरण अस्तित्वात असते हेच मान्य न करणे अथवा त्याकडे दुर्लक्ष करणारे मी पाहीलेत. आपण मला पहीलेच असे म्हणणारे भेटला आहात. मग मी काय करू? हे मला कशाल सांगताय? >>सेक्युलर आणि हिंदुत्ववादी हे धर्माच्या चौकटीतून कोणाकडे बघणार नाहीत. हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी??

In reply to by कौंतेय

नेहमी प्रमाणे शब्दबंबाळ एकांगी प्रतिक्रिया तरी वाचाविशी वाटली सर्व काही पावले... :-) >>> आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता? विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही. जे हल्ले ते जगभर करत आहेत त्याच हल्ल्यातील हा एक भाग आहे. मग ते अमेरिका असोत अथवा लंडन/माद्रीद आणि इतरत्र फसलेले हल्ले असोत. >>>सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही. तुमचे म्हणणे मान्य नाही. त्यांना पाठींबा केवळ मुसलमानांचा मिळाला असे मला वाटत नाही तो कुठल्याही लाचखोर भारतीयाचा मिळाला ज्यात केवळ मुसलमानच नाही तर हिंदूंसकट इतर कुठल्याही धर्माचे असू शकतात. थोडक्यात यातील पाठींबा हा धर्माधारीत नसून "अर्था"धारीत होता आणि काही बाबतीत पोलीसांच्या निष्का़ळजीपणाचा पण होता. आठवते, डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीने ऑक्टॉबरच्या सुमारास पोलीसांना तिच्या मित्राकडून जिहाद संदर्भात आलेला एसएमएस दाखवून काळजी व्यक्त केली होती आणि दुर्लक्ष झाले होते ते? >>>हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी?? विनोद नाही वास्तव असायला हवे. सेक्युलर जर निधर्मी असतात तर त्यांनी त्यापद्धतीनेच विचार करायला हवा आणि हिंदुत्ववाद हा राष्ट्रवाद आहे धर्मवाद नाही, हे आपण तो काय होता हे मुळातून वाचल्यास कळेल. दुर्दैव असे आहे की आंधळे हिंदुत्ववादी आणि त्याचे आंधळे विरोधक दोघेही ते वाचत नाहीत आणि सोयीस्कर अर्थ काढत मुक्ताफळे उधळतात. असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा. धन्यवाद.

In reply to by विकास

विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही. ज्यांनी गोळीबार केला त्या अतिरेक्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वत: गुजरात मध्ये केलेल्या हिंसाचाराच बदला अस उल्लेख केलेला आहे. आणि तुम्ही काय म्हणता प्रतिक्रिया म्हणून केलेल नाही?

In reply to by कौंतेय

हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही. ह्याबद्दल मी अगोदरच बरेच काही येथे लिहीले आहे. त्यावर तुमचे काहीही भाष्य नाही. तरी परत आपण 'बाबरी', 'गुजरातेतील हिंसाचार' ह्यात गुंतून पडला आहात. कारण तसे करणे सोपे आहे. विकास ह्यांना: " ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्‍या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना? तेव्हा ह्या फुटकळ प्रतिसादांना ह्यापुढे उत्तरे न देणे हेच उत्तम. चर्चा खरोखरीच सुरू ठेवायची असेल, तर जे काही मांडले गेले आहे, त्याविषयी दुसर्‍या व्यक्तिचेही ठोस भाष्य हवे. नुसती पळापळ नको.

In reply to by प्रदीप

" ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्‍या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना? प्रदीप इथे येउन असलं काहितरी बरळेल ह्याचा अंदाज होताच. पण विकास तू देखिल लगेच सहमतीचा होकार टाकून अंग काढून घेतलेस ते अनपेक्षीत होते. असो, असले ऍटीट्यूड दाखवल्यावर मलाही चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही. धन्यवाद!

In reply to by कौंतेय

असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा.

In reply to by कौंतेय

यायची काय जरूर होती? संयम सुटला? माझा इथला वावर पहाता कुणालाही मी 'असे काही बरळत' असेन असे वाटले ह्याचेही आश्चर्य वाटते!! मी जे सविस्तर मुद्दे (उदाहरणासकट) लिहीले त्याला तुमचा काहीही प्रतिवाद नाही. का तेही 'बरळणे' वाटले? आणी आता तर तुम्ही कमालच करत आहात. बाहेरील कुणी अतिरेकी आले, निरपराध्यांना सरसकट मारू लागले व मीडियाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच (हेच त्यांना अपेक्षितही असावे) त्यांनी नेहमीची 'गुजरात' वगैरे रेकॉर्ड लावली. त्याला तुम्ही किती क्रेडन्स देता आहात? हे असे करणे तुम्हाला सोप्पे आहे, कारण आजूबाजूस बघण्याची, एक मोठे चित्र पहाण्याची तुमची तयारी नाही, अथवा कुवत नाही.

In reply to by प्रदीप

संयम कुणाचा सुटला हे दिसतेच आहे. विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असली शेरेबाजी करणे ह्याला बरळणे म्हणत नाहीत काय? आणि राहता राहिलं वादा विषयी तर माझं वाक्य/भुमिका अशी आहे; पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. असे पुन्हा पुन्हा सांगुनही, "हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही." हे तुमचे पालुपद आणि वर माझी कुवत काढता? मी गुजरातचा उल्लेख केला तो विकासच्या ह्या "विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही." ह्या वाक्याला. त्यावरुन सोयीस्करपणे मी फक्त हिंदूंवरच खापर फोडतो आहे असले अर्थ काढणारे धर्मांधच म्हणायचे. कौंतेय

In reply to by कौंतेय

विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून... हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे आणि चर्चा पण सार्वजनीक आहे. कोणीही कुठेही लिहू शकतो. नाहीतर तुम्ही देखील माझ्या आणि विकीच्या चर्चेत तोंड घातले असे म्हणता येईल...अनलेस तुम्हीच विकी असाल तर गोष्ट वेगळी... पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. १००% असहमत. म्हणूनच कुठल्याही आंतर्राष्ट्रीय दहशतवादी दुष्कृत्यांनंतर "कडव्या धर्मांध हिंदूंनी" एकही दंगल चालू केली नाही की स्थानीक मुसलमानांना दोष दिलेला नाही. तसेच तुमच्या सारखे सुडोसेक्युलर्स सोडल्यास मुस्लीमांनी पण असे म्हणत झालेल्या दुष्कृत्यांचे समर्थन केलेले नाही, फक्त निषेधच केला आहे... असो हा येथील शेवटचा प्रतिसाद. आता आपण जर चालू केलीत तर नवीन चर्चेत प्रतिसाद देण्यासाठी उत्सुक!

In reply to by कौंतेय

सर्वप्रथम मी ते जे लिहीले ते माझे स्वतःचे नव्हते तर ते ह्या 'टंग- इन-चीक' लिखाणावरून घेतलेले होते. विकास ह्यांना ते समजले व ते आपल्याला माहिती असेल असे वाटले होते. तसे नसल्याने आपण दुखावले गेला असाल, तर माफ करावे. दुसरे, अशा चर्चा सर्वांनाच खुल्या आहेत, तेव्हा कुणीही 'नाक खुपसू' शकतात. तसे नको असेल तर व्य. नि. तून पत्रव्यवहार करावा. आता माझ्या 'पालुपदा'बद्दल. ते पालुपद मूळ चर्चाप्रस्तावाशी निगडीतच आहे. आपला रोख 'भारतातच इतके दहशतवादी हल्ले होतात, ह्याचे कारण इथे मुस्लिमांना असुरक्षित वाटत रहाते, त्यांच्यात एक वैफल्याची भावना आहे' असा दिसतो. तेव्हा मी जे प्रतिपादन करत आहे ते थोडक्यात असे: १. जगात अनेक ठिकाणी मुस्लिम धर्मांधांची तेथील समाजांशी भांडणे सुरू आहेत. २. तरीही त्यातील किमान एका ठिकाणी (चीन) दहशतवादाचे प्रयोग अत्यंत अल्प झाले,कारण तेथे सरकारचा प्रचंड वचक आहे, आणि राजकिय परस्पर संबंध गुंतल्याने बाहेरील दहशतवादी तिकडे काणाडोळा करतात. ३. इतरस्त्र जिथे असे हल्ले झाले, (रशिया,. स्पेन, ब्रिटन, नेदरर्लँड, अमेरिका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया) ते आपल्या येथल्याप्रमाणे पुन्हापुन्हा होत राहिले नाहीत ह्याचे कारण सुरूवातीच्या हल्ल्यानंतर तेथील सरकारांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला आणि कायद्यात व न्यायनिवाड्याच्या तातडीत जरूर ते बदल केले. ४. जिथे सरकारे खंबीर पावले टाकावयास निष्प्रभ ठरली आहेत (भारत, थायलंड, फिलीपाईन्स), तेथे हे हल्ले परत परत होतच राहिले आहेत. हे सर्व पहाता, ह्या तीन ठिकाणीच असे हल्ले सुरूच आहेत व तसेच रहाण्याची शक्यता आहे, तेथे एका धर्मियांवर तेथील बहुधर्मिय इतर जगाच्या मानाने जास्त अन्याय व जुलूम करता आहेत, असे मानणे चुकिचे आहे. (भारताचे एक वेळ जाऊ द्या, पण बौद्धधर्मिय व अगदी मवाळ प्रकृतिचे थाई तसे करतात असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.२००४ सालापासून तेथे सुमारे ३,००० बळी गेले आहेत).

लेख चांगला झाला आहे. बर्‍याच गोष्टिंवर प्रकाश टाकणारा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केवळ मार्गदर्शनासाठी आपण ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट पाहा.

अर्धा तास वाचली ही चर्चा. टिपिकल हि॑दू/मराठी पद्धत आहे...किस काढत बसणे..

विकासजी, उत्तम लेख आणि प्रतिसादही. अनिताताई, अर्धा तास वाचल्यावर तुम्हाला ही चर्चा वाफ आहे याचा साक्षात्कार झाला?? आवडत नसेल, तर चर्चा वाचण्याची बळजबरी नाही आहे मिपावर. :)

In reply to by यशोधरा

अहो, आवडत नसेल, तर तसं सांगायची मुभाही आहे मिपावर :) नाहीतर गांधीवादाला सर्वांनीच छान छान म्हटले असते आणि एक "विक्रम" स्थापन केला असता ना!