Skip to main content

छापू का?

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/04/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा... बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना.. संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय? अब आन दो भाई एकेक. आता हेच बघा की अजरामर काही पंचेस. ऑ..अच्चं जालं तर.. संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय? व्हा फुडं बशिवला टेंपोत ब्वार्र.. तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं. प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;) . हाणताय न्हवं?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36833
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

लेट्स्ट काहि मोती. १) ऊस्मानाबादेतून कुणी आहे का इकडे? २) निव्वळ दांभिकता हो... ३) पेंगविनसेना ४) शुध्द माजुरडा ५) कुत्र्यांची बदनामी थांबवा

तद माताय!! (याचा श्रेयाव्हेर नक्की कोणाचा आहे हे लक्षात नाही..)

उत्तरदायित्वास नकार लागू


In reply to by कपिलमुनी

मुन्या, मेगाफ़ायटी रे. . फ्रैंचायजी देणे आहे एषयन पेंट डबे सांडले शेतीतले तुम्हाला काय कळते? एकदा या गावाकडे पला पला

मिपाच्या अधिकृत शब्दांचा कोलाजचा टी -शर्ट आवडेल. घोषणा सरपंच धोरण शशक साहित्य संपादक मिपा विशेषांक मिपा पुस्तकं खरडवही खरडफळा व्यक्तिगत संदेश

ह्या नितांतसुंदर धाग्याचा समावेश... ... खालच्या - "सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही." ह्या मेनू खाली झालाच पाहिजे! मी इथे काही पंच सुचवण्याइतका इतका जुना झालेलो नाही. तरी एक (वायफळ. पैशे थोडेच पडतायत) प्रयत्न - १. पाकृ ते काथ्याकूट व्हाया खफ आनि व्यनि २. आमचे येथे तडीपार नाही तीनशेपार करण्यात येईल! ३. चार दिस नवा आयडी, पूमिराना कॉम्प्लेक्स काढी

टीशर्टावर छापण्यासाठी यातले एक सोडून* सर्व पंचे अथवा उपरण्याच्या काठावर वेलबुट्टी म्हणून ठीक आहेत. * मयत्री कर्नार कं..? अर्थात हे पुरुषांच्या टीशर्टसाठी. स्त्रियांसाठीच्या टीशर्टला एवढंच पुरे ( मिनिमलिस्ट) युनिकोड: येणार का? जाऊ?

सुप्परभात.. हुर्र्र्र्र्र्र्र्र.. चला उठा.. कामाला सुटा! तांबीयपीठ.. डबडेमहासंम् मेलन बुळूक बुळूक बुळूक! अखिल जिल्बीपाडक म्हासंघ! दुष्ट दुष्ट.. . दुत्त दुत्त! ल्लूल्लूल्लूल्लूल्लू https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif .. मागे बघितलेल्या जीभकाढक स्मायली सह!

शंभर तरी करून टाकायचे ना राव! - आपणांस मुद्दा कळलेला नाही - झैरात! मोड सुरू> . . मोड संपला> - झाले की शंभर...हाकानाका! - मिसळपाव.कॉम माहीत नाय? हात्तुझी! - मंडळ आभारी आहे..

"नासाने जगातील सर्वात सुंदर टी-शर्ट म्हणून मान दिलेला"

१) डब्बल बॅरल २) नंदु सबका बंधु ३) ३ %

In reply to by अभ्या..

१. बघतोस काय रागाने फाट्यावर मारलंय मिपाने.. २. चान चान.. पुड्राशु ... आणखी सुचवा...

"हा पदार्थ अंडं न घालता करता येईल का?" !! आणि जमल्यास त्यापुढे, "हो. आधी करा आणि मग अंडं घालायला बसा" कींवा "कशात घालायचंय त्यावर अवलंबून आहे" वगैरे अफाट विचारमौक्तिकं पण छापता आल्यास उत्तम :-)

In reply to by एस

मी अजून कधी अंड घातलेलं नाही, अनुभवी लोकांना विचारा.

In reply to by मिसळपाव

"हा पदार्थ अंडं न घालता करता येईल का?" !!
हाहाहा, अगदी अगदी! शिवाय एखाद्या निरर्थक, चोथा झालेल्या चर्चेसाठी [डावे वि. उजवे, अलीकडले वि. पलीकडले, हे वि. ह्या(:), मुं/प/ना वि. बबन]: 'मस्त पाककृती. याच वीकांताला करुन बघेन' हा प्रतिसाद!

In reply to by नंदन

....आणि यावरनं पाककॄतीला मिळणारा अजून एक शेलका आठवला - "चला, म्हणजे आता ह्या विकांताला मायाळू / शेवटे / ताजे कोळसे / क्वांत्रो / काहीतरी अनवट साहित्य> शोधणे आले" :-P अवांतरः हा सोत्र्या कुठे उलथलाय देव जाणे....

पंच असे काही तरी असु द्या जे चार चौघात वाचले तर अर्थ समजण्यची उत्सुकता असावी नाहीतर इज्जत जाऊ नये एवढीच यपेक्शा... "धोतरास हात घाला" "शेतीतले तुम्हाला काय कळते" अशाने एखादा नडला म्हंजे अवघड आहे..