या धाग्याबद्दल आभारी आहे. तुम्ही दिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके वाचली आहेत. त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे. या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ? प्रासादिकता हा गुण महत्त्वाचा आहेच ; पण आपला विचार लोकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचवताना , आपल्या विचारांच्याबाहेरही काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात असे ही पुस्तके फार खुलेपणी सांगत नाहीत.
पण , "सेल्फ्-हेल्प" अशा स्वरूपाच्या , प्रॅक्टीकल माहितीच्या पुस्तकांचे स्वतःचे असे एक स्थान आहे. पुन्हा एकदा , या धाग्याबाबत आभार.
>>त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे.
>>या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ?
मुसुरावांशी सहमत आहे. त्यांनी सेल्फ हेल्प पुस्तके म्हटले आहे.. आम्ही त्यांना अक्कल शिकवणारी पुस्तके म्हणतो. वाचवले जात नाहीत.
सुधा मुर्तींची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत,त्यातून नेहमीच काहितरी नवीन शिकायला मिळते.स्वतःला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी ही पुस्तके जरूर वाचावीत.सुधा मुर्तींनी त्यांना आलेले अनुभव छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात सांगितले आहेत.त्यांची काही पुस्तके:
1.The Magic Drum and Other Stories
2.Mahashweta
3.Dollar Bahu
4.Wise and Otherwise
5.The Old Man and His God
6.How I Taught My Grandmother to Read and Other Stories
7.Gently Falls The Bakula
8.अस्तित्त्व
वीणा गवाणकर यांचे 'एक होता कार्व्हर' हेसुद्धा प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे.
राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे.
पुस्तक वाचनिय (आणि संग्रहणीयही) आहे. पण बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून लिहीतात. त्यापेक्षा ना. स. इनामदारांची पुस्तके जास्त भावतात. बाबासाहेबांच्या पुस्तकात प्रत्येक घटनेचे पान न् पान वर्णन आणि तिथि, वार, वेळ ह्याचे अचुक वर्णन आपल्याला पुस्तकाला खिळवून ठेवते.
फॉर हिअर, ऑर टू गो. अपर्णा वेलणकर, मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तकही वाचनिय आहे.
दारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
मराठीतून इंग्रजी असा प्रवास कधी सुरु होणार आहे? मराठीतही अनेक नामांकित लेखक असताना मराठीतील पुस्तके इंग्रजीत असा प्रवास कधी सुरु होईल?
कमीत कमी इतर भारतीय भाषेततरी ही पुस्तके जावीत.
तेंडुलकरांसारख्या दिग्गजांची नाटके इतर भाषांमधे गेली आहेत की('सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल' आणि 'शांतता..' तर नक्कीच, 'गिधाडे' सांगता येत नाही).
झालंच तर, सावंतांच्या 'राधेय' ची पण अनेक भाषांतरे झाली आहेत.
इतरही काही असतील. पण दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच.
--
अक्षरास हासू नये
सी के प्रल्हाद ह्यांचे "द न्यु एज ऑफ इनोव्हेशन" हे मला अलिकडे आवडलेले एक पुस्तक.
मध्यंतरी सायकॉलजी वरची पुस्तके वाचायचा कल वाढला होता तेव्हा आवडलेले पण फारसे न समजलेले पुस्तक- "कॉग्निशन इन द वाइल्ड" हचिन्स.
प्रतिक्रिया
धन्यवाद
+१
मॅजीक ऑफ
हो . ह्याचा
ले़खकाचे नाव
Magic of Thinking Big -David
सुधा
सुधा
मराठी
पुस्तक हाच गुरु..
चांगला
आपण
मराठीतून इंग्रजी असा प्रवास कधी सुरु होणार आहे?
खरच चांगला
कलंत्री साहेब
पुरुष?
सी के प्रल्हाद
वाचनीय पुस्तके
ब्लिंक