'आपला अभिजित' यांच्या ह्या कवितेच्या प्रेरणेने खालच्या ओळी रखडल्या... जमल्याच असतील असे नाही. तसेच या ओळींना शिर्षक काय द्यावे ते पण कळले नाही... कुणीतरी सुचवले तर बरे!
वाटलं आपण पण पेताड होऊ
आणि चारदोन पेग पिऊ
चढली तर चढेल, नाही चढली तर दारुच फसेल
हसले लोक, तर हसतील; त्यांचेच दात दिसतील
हाती घेतला प्याला अन् बसलो प्यायला
तास लागला काय प्यावे, तेच ठरवायला
व्हिस्की की स्कॉच, सोड्या बरोबर की तशीच
पिताना विचारांची भलतीच झाली चोंदी
धाडस केलं शेवटी अन् प्यायली तशीच
मन म्हणालं, स्वःताला जरासं आवर
म्हटलं आजकाल कुणीही उठतं अन् पित बसतं
मलासुद्धा त्यासाठी खास सोबत कशाला हवी?
प्यावं काहीबाही अन् बसावं कुठेही
रिकामटेकड्यांच्या सोबतीची काही कमी नाही!
विचार करता करताच एक प्याला रिता झाला
म्हटलं अभिजितमूळे अनामिक विडंबक झाला
हे विडंबन वाचल्यावर आपला अभिजितच्या प्रतिभेला बाळंत झाल्यावर वेदना होतील असे वाटते.
-अनामिक
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1969
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करता
अरे व्वा!!!
अनामिक..
:-)
मस्त