आज आपण आमच्या घरातली माझी आजची बक्षिसपात्र पाककृती पाहू बरं का.
नेहमी आपण मैद्याची नान खातो. पण ती थंड झाली की चिवट होते. मग घरातल्या मोठ्यांची नाराजी. त्यावर उपाय म्हणून ही संपूर्ण कणीक वापरून केलेली नान. पहा कशी वाटते. थंड झाली तरी चिवट होत नाहीच पण चविष्ट ही लागते.
साहित्यः २ वाट्या कणीक, २ चमचे दही, १ चमचा तेल, मीठ, १/२ चमचा यीस्ट, १ चमचा साखर, ३ टी स्पून बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टी-स्पून कलोंजी/काळे तीळ, कणीक मळायला कोमट पाणी, बटर.
कृती: यीस्ट अर्धा कप कोमट पाण्यात साखर घालून अर्धा तास ठेवले. नंतर कणकेत मीठ, एक चमचा तेल, १ टी-स्पून लसूण , दही आणि हे यीस्ट च मिश्रण घातले. कोमट पाण्याच्या सहाय्याने कणीक नेहमी पोळीसाठी भिजवतो तशीच पण खूप मळून घेतली आणि तेलाचा हात लावून २ तास झाकून ठेवली.
२ तासांनंतर तो कणकेचा गोळा चांगला दुप्पट झालेला असतो. मग ज्या कुणाचा आपल्याला खूप राग आला असेल त्यालाच आपण भरपूर गुद्दे मारतोय अशी रम्य कल्पना करून त्या गोळ्याला छानपैकी गुद्दे मारायचे आणि त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे. या प्रमाणात माझे ७ गोळे झाले.
नान करण्याआधी एका ताटलीत तीळ्/कलोंजी, लसूण, कोथिंबीर असं काढून ठेवायचं. त्या गोळ्याला हे सगळं थोडंथोडं लावायचं आणि थेंबाच्या आकारात लाटायचं.हे काही एवढं खास जमलं नाहीये मला. पण तरी केलंच. :) मग तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजून घ्यायची.
ही नान तुम्ही कोणत्याही उत्तर भारतीय भाजीबरोबर वाढा. मी आपलं घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार ऑल टाईम फेव्हरेट आलू-मटर केलं होतं.
वाचने
10541
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुभानल्लाह!
मस्त ग... तो नान लाटला कि एका
अरे वा
In reply to मस्त ग... तो नान लाटला कि एका by केडी
करून बघ...मी म्हणतोय ते असं
In reply to अरे वा by सविता००१
हो
In reply to करून बघ...मी म्हणतोय ते असं by केडी
भेट गं, भेट तू एकदा. पळवूनच
छान पाककृती .
अरे व्वा... भारी आयड्या आहे.
क्लास्स!
मस्त रेसिपी...
पाकृ आवडली
वा!
ह्या नानची पाककृती आणि तुमचं
छान पाकृ!
छानच आहे आणि सोपी पाकृ ! फोटो
हा बघ स्नेहाताई..
आता