बन साठी ३ १/२ कप मैदा १ मोठा चमचा यीस्ट १/२ कप तेल (ऑलिव्ह असल्यास उत्तम) २ मोठे चमचे कोमट पाणी १/२ कप दूध २ चमचे साखर १ अंडं, फेटून मीठ, चवीनुसार पांढरे तीळ एग वॉश (१ अंड्याचे पांढरे, २ चमचे पाणी घालून फेटून) नॉन व्हेज सारणासाठी १ १/२ कप उकडलेल्या चिकन चे बारीक तुकडे (boneless cooked shredded chicken) २ कांदे, बारीक चिरून १ मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट १ चमचा गरम मसाला १ चमचा लाल तिखट १/२ चमचा हळद १ चिमूट चाट मसाला मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर व्हेज सारणासाठी १ १/२ कप पनीर चे छोटे तुकडे बाकी सगळे नॉन व्हेज सारणा सारखे कृती आधी बन ची तयारी करून घ्या. कोमट पाण्यात यीस्ट, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मैदा घालून ते नीट मिसळून घ्या. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. दुधाला एक उकळी काढून ते हातांना कोमट लागे इतपत गार करून घ्या. ह्यात उरलेली साखर, तेल आणि मीठ (साधारण एक ते दिड चमचा) घालून, साखर विरघळे पर्येंत ढवळून घ्या. आता ह्या मध्ये १ कप मैदा घालून पातळसर पेस्ट बनवून घ्या. अंडे फेटून, ते आणि यीस्ट, ह्या पेस्ट मध्ये घाला. उरलेला मैदा घालून मऊ गोळा मळून घ्या. हा गोळा ओल्या फडक्याने झाकून साधारण दोन ते अडीच तास बाजूला ठेवा. तो पर्येंत सारणाची तयारी करून घ्या. हा गोळा फुगून साधारण दुप्पट झाला कि हलक्या हातांनी दाबून त्याचे साधारण १२ गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा हाताने दाबून त्यात एक ते दिड चमचा सारण भरून घ्या. गोळ्याला बन सारखा आकार देऊन, वरून तीळ पेरून, सगळे बन अजून ३० मिनिटे ओल्या फडक्या खाली ठेवून द्या.
- बरेच लोक असे स्टुफ्ड बटाटे वडे करतात, आत मध्ये बटाटा वाड्याचे सारण भरून करू शकता
- अंडा भुर्जी, किंवा बॉईल्ड एग भुर्जी
- चिकन किंवा मटणाचा खिमा
- चीज चिल्ली टोस्ट सारखे चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर
- गोड हवे असल्यास फ्रेश स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी जॅम किंवा सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे तर मँगो जॅम आणि आंब्याचे काप वैगेरे
वाचने
7192
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा!
३ १/२ कप मैदा
बेकिंग करताना वापरतात तो
In reply to ३ १/२ कप मैदा by आनंदी गोपाळ
मस्त. शेवटचा फोटो पाहून पाणी
रसना खवळवून आत् म्यास
अहाहा
चविष्ट!
एकदम
स्वादिष्ट !
उन्हाळा सुरु होताच करून पाहीन
मस्त,मस्त.नॉनव्हेज बन्स
अगदी... गरम वाफाळलेल्या कॉफी
In reply to मस्त,मस्त.नॉनव्हेज बन्स by नूतन सावंत
क्या बात, मस्तच! ते तीळ