कचोरी (पाककृती सह फोटो.. )
मी स्वत: बनवलेली कचोरी आणि चिन्चेची चटणी :-)


पाककृती:
साहित्यः
१ वाटी मैदा , २ चमचे तेल, मीठ, पाणी
१/२ वाटी उडीद डाळ, १ चमचा मिरचिपूड, १/२ चमचा धणेपूड,
१/२ चमचा आमचूर पावडर, १/२ चमचा हळद,१चमचा साखर, मीठ
मोहरी, जिरे, हिंग,१ चमचा बडिशेप आणि १/४ चमचा धणे
तळणासाठी तेल.
कृती:
१ वाटी मैद्या मधे २ चमचे तेल आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घ्या.
पाणी घालून मऊसर पीठ मला. हे पीठ पोळीच्या कणके पे़क्षा मऊ (लोण्यासारख..)
असायला हव. जर हाताला चिकटत असेल तर थोडे अजुन तेल घाला.
सारणसाठी, अर्धी वाटी उडीद डाळ घेऊन ती 4-5 तास भिजत ठेवा. नंतर डाळीतील
पाणी पूर्णपणे काढून टाका. डाळी मधे १ चमचा मिरचिपूड, १/२ चमचा धणेपूड,
१/२ चमचा आमचूर पावडर, १/२ चमचा हळद,१चमचा साखर आणि चवीनुसार मीठ
टाकून हे कोरडेच मिश्रण मिक्सर मधुन रवाळ वाटून घ्या. जास्त पेस्ट बनऊ नका.
एका नॉनस्टिक कढईत मोहरी, जिरे, हिंगची फोडणी तयार करा, त्यात १ चमचा बडिशेप
आणि १/४ चमचा धणे टाका. या फोडणीमधे डाळीचे मिश्रण मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे
परतून घ्या. सुरुवातीला हे मिश्रण चमच्याला चिकटेल.. पण जस जसे भाजले जाईल तस
तसे ते चमच्या पासुन सुटत जाईल. सारण नीट कोरडे व्हायला हवे नाहीतर काचोर्या मऊ
पडतील. दाण्याच्या कोरडया चटणी प्रमाणे दिसेल तयार झाले की.
सारण थंड झाले की काचोरी बनवायला घ्या. मैद्याचा लिंबाच्या आकारचा गोळा घेऊन
त्यात सारण भरा. मोदक जसे बनवतो त्या प्रमाणे. आता हा गोळा पोळपाटा वर ठेवा आणि
तळ हाताने दाब देऊन पुरीचा आकार द्या. जास्ता पातळ नका करू. साधारण १/२ सेंटिमीटर
जाडीची ही पुरी बनेल.पीठ मऊ असल्याने अगदी सहजतेने बनत जातील..
(लाटणी नाही वापरायची.. तिचे इतरही उपयोग असतात.. )
कढई मधे तळण्यसाठी तेल तापवा. तेल जास्त गरम किवा जास्ता थंड असता नये. मंद आचेवर
काचोर्या सोनेरी रंगावर तळुन घ्या.
चिन्चेची चटणी :
साहित्यः साखर, चिन्च, मिरचिपुड
कृती: साखरेत थोडे पाणी घालुन उकळ्त ठेवा. जरासा चिकट पाक बनला की त्यात १/४ चमचा
मिरचिपुड आणि चिन्चेचा कोळ घाला. आवश्यक असल्यास पाणी घाला. थोडा वेळ शिजवा.
झाली तयार चिन्चेची चटणी ....
;;)


वाचने
21323
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
ज ळ वा आ
आज आता
In reply to आज आता by मितालि
ये जले पें
खल्लास!
In reply to खल्लास! by ब्रिटिश टिंग्या
अरे चारजणं
In reply to खल्लास! by ब्रिटिश टिंग्या
मेलो!
In reply to मेलो! by विसोबा खेचर
+१
(विषय दिलेला नाही)
कचोरीचा
In reply to कचोरीचा by विसोबा खेचर
हाच
सगळे का
In reply to सगळे का by मितालि
हे सगळे
धन्यवाद...
सुंदर अप्रतिमच
रेसिपी हवी आहे
In reply to रेसिपी हवी आहे by गीत
दोन दिवस
तुमचि
In reply to तुमचि by मितालि
बायको?
In reply to बायको? by गीत
बायको???? ही प्रतिक्रिया माझ्यासाठी असावी
In reply to तुमचि by मितालि
खरे आहे मितालीजी ....
अग गीता ते
अग गीता ते
फोटू छानच
फोटो पण
(विषय दिलेला नाही)
का त्रास देता?
अगं..
या या.. सगळे
In reply to या या.. सगळे by मितालि
पत्ता द्या
In reply to या या.. सगळे by मितालि
:)
रूप महल
In reply to रूप महल by मितालि
सागरभौ,
In reply to सागरभौ, by ब्रिटिश टिंग्या
पार्सल चा बेत रद्द केला आहे....
In reply to सागरभौ, by ब्रिटिश टिंग्या
हा हा हा
फक्त ६
In reply to फक्त ६ by मितालि
रेसिपी परवडेन ....
ठिक आहे..
फोटोतील
कचोरी छानच्...आणि
भारी
पहिल्या
In reply to पहिल्या by सुचेल तसं
नाही...
आजचा मेनू काय?
In reply to आजचा मेनू काय? by किरण जोशी
खरवस...
In reply to खरवस... by मितालि
फोटो
ग्रेट आहे
मस्त
मस्तच..
खुप लाळ टपकते...