Skip to main content

छापू का?

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/04/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा... बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना.. संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय? अब आन दो भाई एकेक. आता हेच बघा की अजरामर काही पंचेस. ऑ..अच्चं जालं तर.. संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय? व्हा फुडं बशिवला टेंपोत ब्वार्र.. तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं. प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;) . हाणताय न्हवं?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36940
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

तू मानाचा हानमान हैस. . अंजनीच्या सुताचा देऊ का शर्ट

In reply to by टवाळ कार्टा

हे तर तुला ५ शर्ट देतो टक्या. . . वाटून टाक बिन्धास्त.

In reply to by मोदक

माझ्या मनात पण अगदी हेच आलं... हा टी शर्ट बघितल्या बघितल्या ओळखू येईल (ज्याला माहिती असेल त्याला) की टी शर्ट मधला माणूस मिपाकर आहे. ज्यांना माहिती नसेल ते पण उत्सुकतेने विचारतील आणि त्यांना या निमित्ताने मिपा माहित होईल.. तेव्हढीच झाईरात.

हे बघ भावड्या... बाकी कोनाचे कर का नको करु टि-शर्ट... वीस लाख रुपये घेऊन सुस्साट चाललेला ट्रक आपल्याला पाहिजे.. ;-) =)) =))

झकास आयडिया! अजून काही येक बेश्ट सजेशन्सः १. 'अंमळ हळवा झालो.' २. मजकूर नाही. चित्रः कॉफी (सांडलेली), कीबोर्ड (कॉफीधारी) आणि काडीपैलवान (चष्माधारी); क्युबिकल आणि काँप्युटरवर मिपा बाकी भयानक पाठलाग, अंजीर केळे ही काही अन्य टारझनरत्ने बहुधा संदर्भांशिवाय समजणं अवघड आहे.

In reply to by नंदन

हेच हेच हेच! किंवा अंहंनं असंही चालू शकेल! ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by नंदन

भयानक पाठलाग आणि अंजीर केळे सारखाच 'पेप्सीकांत कोक' हा अजून एक तुरा टार्‍याने मिपाच्या शिरपेचात खोवलेला! ;)

In reply to by नंदन

हा हा हा. अगदी विसरलो होतो. (तसाच सेम लिखाळ यांच्यासाठी पण घ्यावा लागेल.)

०१. कंपूबाज ०२. कोण अभ्या? धन्यवाद. ०३. आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली ०४. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ०५. चपला (कोल्हापुरी चपलांचे चित्र) ०६. आजची खादाडी ०७. आजची बायडी ०८. सर्व्हर अ‍ॅडमिन ०९. ब्वॉर्र १०. दवणीय

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ड्वॉलेच असतात हल्ली सगळ्यांचे - ड्वॉले म्हंजी वट्टारलेले ड्वाले.

In reply to by खेडूत

  • (आमची पेर्णा)
  • भूछत्र, कोडाईकॅनाल, काणकोण, जिलबी, वाङमयशेती , अभय-गझल
  • किती करायचेत?

  • आणि अभ्यास वाढवा हे पण . मला हवेत टीशर्ट . अभ्यास वाढवा असा टीशर्ट घालून गेलो कि हाफिसात फिकीर नॉट

    १. मला संपादक व्हायचंय २. मी मी मी मीमीमी... मी मी मी ३. इथे घाऊक जिलब्या मिळतील ४. घेई छंद .. स्वच्छन्द ५. धाव धाव रे नीलकांता... ६. माय फ्रेंड ~ सायकल ७. मज्याशी मयतरी कर्नर कं ८. सारवासारव अजून सुचले की येते परत

    आपली पसंती: ०१. लुल्ल्ल्य्ल्य्ल्य्ल्लूऊऊऊऊलूल्ल्लू ०२. ओह आय सी. ०३. ए प्पांडु ०४. माझीचं लाल ०५. अभ्यास वाढवा. ०६. सूद्दलेकण सुध्रा. ०७. बशिवला ट्यांपुत ०८. फार आधी एक ट्रक धीना धीन नावची शिर्यल लागायची तिच्यावर एक बनवा. ट्रक लालचं असु द्या. ०९. आमचा पत्ता पौड फाटा. १०. चल नीघ बे... ११. गोग्गोड. १२. काडीलाव्या/ सारु/ मारु/ मोडु इ.इ.इ. १३. आम्मी इक्कडचं तिक्कडं कद्धी सांगत नै ब्रं का. १४. अनाहिता १५. अनाहितांचा लाडोबा इ.इ.

    छ्या! पूर्वीच मिपा राहील नाही! साचलेपणा आलाय?! धोतराला हात घातला! (हल्ली याला लय डिमांड हाय वाटत!) गणेशा झाला... लाल डबा सांडला आणि माझं आवडत... खंड्याचा किल्लर लुक!

    १) फाट्यावर मारतो ! २) नका लोड घ्यू ! आणि तुझ्यासाठी हा लेटेस्ट : ३) आजची बिपीची गोळी विसरली वाट्टं !

    (..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ..............................