Skip to main content

जिओच ठेवायचं की. . . .

लेखक उपयोजक यांनी रविवार, 26/03/2017 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे. आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्‍याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत. तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का? जिओमुळे बर्‍याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत. आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय. आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील. https://www.jio.com/ आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे. या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील. संभ्रमावस्था वाढेल. तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं? फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी! तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?

वाचने 37951
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

च्यामारी त्या जिओच्या, दोन तीन वर्षापूर्वी नेट मिळायची मारामार होती. बॅलन्स कसा उडला तेही कळायचे नाही. बीएसनेल ब्रॉबॅ तर नावालाच. महिन्याला एखादा जीबी पार व्हायचा. अ‍ॅटचमेंट पाठवण्यापेक्षा चक्क पेन ड्राईव्हवर कॉपी करुन हपिसचा मुलगा प्रेसना अ‍ॅड लवकर देऊन यायचा. आज जिओचे ३० जी बी असते. व्होडाफोनला ऑफरमध्ये ४ जीबी फोरजी आहे, एअरटेलात २० जीबी शिल्लक आहे, प्लस हपिसातल्या प्रायव्हेट ब्रॉबॅ ला ८० जीबी चा प्लान आहे. कुठे उधळू हे सगळे जीबी?

In reply to by कपिलमुनी

आयडिया सद्य वापरतोय मी आता आधी एअर टेल वापरायचो आयडियाला इंटरनेट लै जातंय असं वाटत मला

सध्या जिओशिवाय पर्याय नाही. सगळ्यात कमी रेटस जिओचेच आहेत. 1 तारखेपासून speed मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार. user कमी होतील. आणि commercial जिओला आपली रिसोर्सेस पूर्ण उघड करावी लागतील. आपली चंगळ असणार

In reply to by जव्हेरगंज

जिओची सेवा अजून सुधारेल असं वाटतंय, पण आयडिया आणि वोडाफोन एकत्र येऊन काय करतात त्याकडे लक्ष आहे.

In reply to by जव्हेरगंज

एमटीएनएलने ३१९/- रुपयात २जीबी (३जी)डेटा /दिवसाला जाहीर केला आहे. अधिक रोज थोडे कॅाल्स स्वस्तात. ( MTNL Mumbai :http://www.mtnlmumbai.in/index.php/3g-menu/prepaid-3g-packs )

"कुठे उधळू एवढे जीबी" हे बरोबर आहे. केवळ फास्ट नेट असणे आणि ते फक्त जिओच देत आहे असे काही नसेल. इतरही कंपन्या देतील. राहिला प्रश्न किंमतीचा. प्रिपेडमध्ये आपण महिन्याची अमुक रकमेला बांधलेलो नसतो. स्कीममध्ये राहातो.ते प्लान्स सतत बदलत असतात. आमचे RCOM ३जी 5Mbps download,4Mbps upload वेगाने चालते ते पुरेसे आहे. २२०/1GB/-prepaid मध्ये सर्व काम होते. जेव्हा अति स्पिड हवा असढो तेव्हा रेल्वे स्टेशनात फ्रि वाइफाइवाले देतात 50Mbps ते 20mbps नेहमीच असतो. कधीकधी 150 असतो.

माझ्याकडे जीओचे तीन सीमकार्ड आहेत. मी त्या नंबर वरुन कोणालाही कॉल केले नाहीत. लोकांना कॉल केले की लोक आलेला कॉल नंबर आपल्या नावाने सेव्ह करून ठेवतात. मला उद्या ही फुकट सिम योजना भविष्यात बांधून ठेवेल म्हणून मी हे केलं. मी या तीनही सिमचा उपयोग. मोबाइलचे कष्टम रोम डाऊनलोड करण्यासाठी वापरले. एक रोम जवळ जवळ ८०० एम् बी ते १ जीबी पर्यत असतो मला त्यांच्या स्पीडचा उपयोग झाला आणि वाट्सप फेसबुक मिपा यासाठी २४×७ ऑनलाइन राहता आलं. आता काय करायचं ? आता दोन सिम कार्ड फेकून देऊन एक सिम कार्ड ठेवावे असा विचार आहे. ९९ रूपये प्राइम यूजर आणि ३०० रूपये प्लानचा. रिलायंसवाले चतुर आहेत. ९९ रूपये प्लस कमीत कमी १५० रूपये असे २५० रूपयाला ते ग्राहकाला चावणार आहेतच. आता २५० रूपयात इतर कंपन्या किती डाटा, स्पीड, कॉल फ्री देतात यावर आपण ते निवडावे असे वाटते. तुर्तास इतकेच धाग्यावर लक्ष ठेवून असेन. -दिलीप बिरुटे

पोस्टपेड/ स्कीमवाले हेच खरे अकाउंट्सला गिह्राइक म्हणून कंपनी दाखवू शकते.सर, तुमच्याकडे जिओचा स्पीड तपासला का मोबाइलला? dnld/upld किती?

जीओ चे एक कार्ड १ वोडाफोन आणि एक आयडिया चे पोस्ट पेड आहे. आयडिया ३७५+टॅक्सेस मध्ये १.५ गब डेटा अँड ग्रुप कॉल + std देते. बिल साधारणतः ४३१ पर्यंत येते. आत्ता पहिले काम करतोय पोस्टपेड तो प्रीपेड मध्ये तो नो कॉन्व्हर्ट करतो आहे. जीओ घरी देणार आहे जेणेकरून श्रीरामपूर+कोल्हापूर ला स्पीड चांगली येते. नो प्रॉब्लेम फॉर मी फॉर कॉल ड्रॉप- जास्त करून व्हाट्सअप कॉल करण्यास परेफेरन्स आहे. वोडाफोन चे कुत्रे कुठे पण पाठीमागे येते त्यामुळे तो पर्सनल आणि लिमिटेड कॅल्लिंग साठी वापरतो नेट वापरात नाही.. पण त्याचे स्पीड आयडिया पेक्षा चांगले भेटते असा माझा अनुभव आहे. आयडियाचे दुसऱ्या नंबरचे बिल कंपनी पेड करते त्यामुळे फुल्ल नेट व कॅल्लिंग साठी वापरले जाते. नो प्रॉब्लेम. जीओ ९९ रुपयाचे prime साठी रिचार्जे केले आहे महिन्याला ३०३ चे रिचार्जे करून कॅल्लिंग आणि नेट जर फुकट मिळणार असेल तर चांगले आहे. सगळी कडे चेक केले पण त्या तोडीचा प्लॅन कुठेहि मिळाला नाही. जे काही नवीन ऑफर चालू आहेत ते नव काँनेक्टिव साठी आहेत.

In reply to by समाधान राऊत

आमच्या घरात नाय येत हे कुत्रं, कितीपण चुचकारलं तरी ! बाहेर येऊनच त्याला खेळवावे लागते.

In reply to by सस्नेह

आमच्यापण घरी नाही येत हे कुत्रं! पार मेल-बिल वरुन तक्रार केली.त्यांच्या हापिसात तक्रार केली.काय फरक नाय! बहुतेक आख्ख्या कोल्हापुरात या वोडाफोनचा प्रॉब्लेम असावा! मोठ्या शहरात मात्र याला चांगली कनेक्टीव्हिटी आहे.

आयडिया 4G चा स्पीड १ एमबी च्या पुढे भेटतोय .३४७ चा प्लॅन सुरु आहे .. अनलिमिटेड मोबाइलला कॉल फ्री आणि रोज १ GB डेटा फ्री आहे सो सध्या तरी मस्त चाललंय

In reply to by rain6100

हा जिओ इफेक्ट आहे हे विसरू नये :) जिओ नसतं तर हाच प्लान रू.१५०० च्या पुढे गेला असता.

In reply to by जव्हेरगंज

आयडिया वाल्यांना लै माज आला होता मी अक्षरक्ष २५० रुपये देऊन एक जीबी घेतलेले आहे. च्यायला त्याचयातही डाटा जायचा. जिओ ने या कंपन्यांचा माज उतरवला हे मात्र नक्की. डाटा आणि कॉल २८ दिवस हा फार्मुला आयडियानेच आणला. नाय तर ३१ दिवस ३० दिवस असं होतं पूर्वी. -दिलीप बिरुटे

In reply to by rain6100

रेन६१०० धन्स! माहितीबद्दल! ही योजना चांगली आहे.आयडियाचा स्पीड जबरी आहे.

आपलं पहिलं प्रेम.. वोडाफोन. कोठेही गेले तरी चांगली सर्विस. मुख्यतः अवाजवी दावे नाहीत. मात्र जिओचे डेटा नेटवर्क त्याच्यापेक्षा चांगले. एक व्यावसायिक म्हणून वोडफोन आणि जिओ दोन्ही गरजेचे वाटतात. त्यामुळे दोन्ही ठेवणार. प्लॅन आता जिओचे सरस असले तरी कालांतराने सगळे एकाच लेव्हलवर येतील. त्यामुळे सर्विस कोणाची चांगली हे महत्त्वाचे. फुकट काय मिळते, स्वस्त किती मिळते ते महत्त्वाचे नाही. चांगली सेवा जो देईल त्याला त्याला पैसे मोजायची तयारी आहे.

मला तर जीओ चा सध्या फक्त 1 MBPS स्पीड मिळतोय , त्यातून मी जीओ फाय घेतल , सध्या पश्चाताप चालू आहे 1 एप्रिल नंतर स्पेड बघणार मग बघू कोणास जीओ फाइ दुसर्या नेटवर्क साठी ओपन कस करायाच हे माहीत आहे का ?

९९ भरुन नोंदणीचा जो प्रकार आहे तो भुलावणीचा असावा अशा स्कीम नेहमीच येत रहातील असे वाटते

सध्या तरी gio चांगलं आहे मी 99 * 303 चा रिचार्ज केला आहे

In reply to by डोके.डी.डी.

मी पण ४०२ रुपये अक्कल खाते टाकले. बघू या पुढे काय होतं ते नाय तर मी आयडिया वाप्रेन. ३४७ अनलिमिटेड डाटा & कॉल. -दिलीप बिरुटे (जिओ प्राईम मेंबर)

जिओ इज द बेस्ट ........ जिओ निश्चितच वेगवान आहे .... फ्री स्कीम संपल्यानंतर अजून वेग वाढेल . सध्या दिवसाच्या वेळेस 7 ते 12 एम बी पी एस डाउनलोड चा वेग मिळतोय तर रात्रीच्या वेळेस १२ नंतर ३० ते ४५ एम बी पी एस च्या दरम्यान मिळतोय . कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण साधारण वीस टक्के आहे . बरेच कॉल होतात त्यावरून त्यामुळे तसा खूप काही प्रश्न नाही. ज्या ब्रॉडबँड साठी १ एम बी पी एस रडत खडत चालणाऱ्या प्लॅन ला महिन्याला मी ७००+ रु. द्यायचो तो आता जिओ फाय ने रिप्लेस केला आहे . परिणाम -कित्येक पट स्पीड जास्त आणि किंमत निम्म्या पेक्षा कमी त्यामुळे निदान माझ्यासाठी तरी जिओ घाट्याचा सौदा नाहीये.

सध्या चार महिन्यांपासून जिओ वापरत आहे, ९९ भरले आहेत. ४९९ चा प्लान घेणार आहे, आवडला, पटला तर तीन महिन्यानंतर कन्टीन्यू ठेवेन... नाहि जमलं तर आयडिया आहेच दुसर्‍या सीमस्लॉटमध्ये. फुकट युजर कमी झाल्याने कदाचित स्पीड वाढेल. आता प्रचंड ताण आहे नेटवर्कवर असे दिसते. प्रीपेड प्लान मध्ये असल्याने जास्त विचार करायची गरज नाही. चले तो चांदतक नही तो शामतक.

In reply to by संदीप डांगे

>>>>> फुकट युजर कमी झाल्याने कदाचित स्पीड वाढेल. आपण सर्वच फुकट युजर कमी झाल्यास स्पीड वाढेल म्हणतो, तशी अपेक्षा धरून आहोत. पण मला विश्वास नाय राव असं काही होईल म्हणून...! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युजर च्या संख्येचा उपलब्ध bandwidth वर ताण येतो. मी नाशिकला 2009-10 च्या वेळेस आलो होतो त्यावेळेस टाटा फोटोन 3 mbps चा अधिकृत मेन स्पीड असतांना down लोड ला 1 ते 2 mbps देत होते, तेव्हा नाशिकमध्ये फोटोन युजर अतिशय कमी होते, नंतर म्हणजे 2013-14 मध्ये speed 512 mbps मिळाला तरी मिळवली अशी वेळ आली. युजर भरमसाठ वाढले व त्या तुलनेत इन्फ्रा वाढवला नाही म्हणून. डेटा फ्लो हा नळाच्या पैपलाईन प्रमाणे असतो, जितक्या तोट्या जास्त चालू तितका सर्वांना फ्लो कमी मिळतो, सर्वांना जास्त व जोरात फ्लो हवा असेल तर पाणी वाढवावे लागते, अर्थात इन्फ्रा वाढवावा लागेल. माझ्या अंदाजाप्रमाणे रिलायन्स ने याचा विचार आधीच करून फुकट च्या तुलनेत 10-20 टक्के लोक कन्व्हर्ट होतील असा अभ्यास केला असावा, त्यानुसार इन्फ्रा उभारले असावं. कारण आजकाल गेल्या दोन महिन्यांपासून स्पीड कमी झालाय, आता जसे पेड मेम्बर वाढतील त्याप्रमाणे हळू हळू इन्फ्रा वाढवता येईल असं मला वाटतं, खरे खोटे मुकेसभाई ला मालूम...

In reply to by संदीप डांगे

आयडिया स्पीडच्या बाबतीत जिओ पेक्षा भारी आहे. आता मी जिओ डाऊनलोड स्पीड टेष्ट केलं तर दोन एमबीपीएस पेक्षा जास्त नाही. तेव्हाच आयडिया १५ एमबीपीएस स्पीड दाखवतेय. -दिलीप बिरुटे (चांगली स्पीड पकडलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ते मात्र खरं आहे. सध्या माझ्याकडे आयडिया, जिओ व टाटा इन्डिकॉम आहे. स्पीडच्या बाबतीत टाटाला जास्त स्पीड आहे, आयडिया सेकंड व जिओ थर्ड वर आहे. आता टाटाचे नाशिकमध्ये कस्टमर कमी आहेत त्यामुळे सुसाट स्पीड मिळतो

In reply to by संदीप डांगे

2013-14 मध्ये speed 512 mbps मिळाला तरी मिळवली अशी वेळ आली
बाब्बो , तुम्हाला बहुधा KBPS म्हणायाच आहे

In reply to by सतिश गावडे

सरसकट १५० रुपयात सबकुछ मिलेगा असं पाहिजे होतं. पण तेही नुकसान भरून काढायला आपला गळा दाबायला निघाले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सरसकट १५० रुपयात सबकुछ मिलेगा असं पाहिजे होतं. त्यांनी असं का करावं? जिथं जिओ यायच्या आधी २९९ रुपयात ७५० एम बी मिळायचे महिन्याला तिथे जिओ ३०३ रुपयात महिन्याला २८ जीबी देणार हे खूपच चांगलं झालं की. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिओने इतर केरीयर्सना ते वर्षानुवर्षे करत असलेली लूट थांबवण्यास भाग पाडले. सारे कसे आता सुतासारखे सरळ झालेत.

In reply to by सतिश गावडे

>>>>>जिओने इतर केरीयर्सना ते वर्षानुवर्षे करत असलेली लूट थांबवण्यास भाग पाडले. सारे कसे आता सुतासारखे सरळ झालेत. १००% सहमत...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे जिओला मस्त स्पीड आहे. झमझम डालो होतोय डाटा. जुग जुग जियो, जिओ !

४जी पाहिजेच अथवा ते नसेल तर कोणते काम अडते? यु ट्युब व्हिडिओ डाउनलोड करूनच पाहतो त्यामुळे बफरिंगचा संबंध नाही. ओनलाइन रेडिओसाठी ३जी चालते.

In reply to by कंजूस

असा का विचार करता काका? जेवढा जास्त स्पीड तेवढा कमी वेळ लागतो कामे होण्यात, online transactions, डेटा अपलोड download पटापट झाले तर बाजारात वेगाने कामे होतात, सात आठ एमबी चा स्पीड म्हणजे फक्त 700 kbps download स्पीड, online व्यवहार रिअल टाइम होण्यासाठी हा डाउनलोड स्पीड कमीत कमी 10 mbps हवा, ड्रॉप्स नको, डिस्टरबंस नको. 100 mpbs चा स्पीड असेल तर डिजिटल व्यवहार वाढतील, ते सोयीचे होईल. मला व्यक्तिशः 100 एमबी ची file अपलोड करायची तर पूर्वी अंगावर काटा यायचा, ते अभ्याने वरच सांगितले आहे ते शब्दशः खरे आहे. आता तेवढ्या वेळात अपलोड डाऊनलोड होऊन प्रिंटिंग होऊन कस्टमरच्या हाती डिलिव्हरी पोचते. बाकीच्यांच्या व्यवहारातही याचा फायदा होत असेलच. केवळ मनोरंजन जरी म्हटले तरी पूर्वी यूट्यूब वर व्हिडियो आधी येणाऱ्या जाहिराती लोड व्हायला वेळ लागून व्हिडियो टाळले जायचे, आता स्पीड चांगला असल्याने 30 सेकंदाची जाहिरात रिअल टाइम लोड होऊन जाते व पुढचा व्हिडीओ बफरशिवाय पाहता येतो त्यामुळे जाहिरात दारांचे काम होते. उपलब्ध वेळेत जास्त काम करता येत असल्याने सर्वांची वीनविन सिच्युएशन आहे.

संदीप ,पुर्वी फास्ट काम करायचे तर मोबाइल घरच्या ब्रॅाडबँड वाइफाइवर चालवून करायचे. आता मोबाइलमध्ये फास्झ प्रसेसर,रॅम येऊ लागल्याने विचार बदललाय लोकांचा. मोठे काम कोणी मोबाइलच्या किबोर्डने करणार नाहीत. २) जिओने अजून त्यांचे खरे पत्ते उघडे केले नाहीत. ओप्टिकल फाइबर केबल टाकत आहेत ते झाले की घरच्या ब्रॅाडबँडला १००एमबिपिएस स्पीड येईल आणि परत लोक ल्यापटॅापकडे वळतील.

अच्छा! तुमचा मुद्दा मोबाइलवर इतका स्पीड का हवा ह्याबद्दल आहे काय? तर त्याचे असे आहे की पूर्वी जी कामे लॅपटॉपवर केली जायची त्यासाठी आता बहुसंख्यलोक टॅब किंवा मोबाईल वापरतात. कारण जास्त सोयीचे पडते म्हणून. आमच्या सारख्या हार्डकोअर कम्प्युटर वाल्यांची कामे लॅपटॉप-डेस्कटॉपशिवाय होऊ शकत नाहीत, तो एक मुद्दा वगळला तर कम्युनिकेशनसाठी मोबाईलच योग्य आहे. मेल पाठवणे, व्हॉट्सप मेसेजेस करणे, तिकिटे बुक करणे, ओला-उबेर किंवा कोणतीही ऑनलाइन सेवा विकत घेण्यासाठी, अगदी अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या खरेदीसाठीही मोबाइल सोयीचा आहे. त्यासाठी फास्टेस्ट इन्टरनेट स्पीड असेल तर ग्राहकांचा कन्वर्जन रेशो वाढतो असा अनुभव आहे. शिवाय मोबाईल हा ऑन-द-गो प्रकार असल्याने लॅपटॉप च्या मर्यादा त्याला नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे डिसिजन मेकिन्ग फास्ट होतं. कमी वेळात, कमी श्रमात जास्तीत जास्त काम होते. हे ग्राहक व विक्रेते दोघांनाही उपयोगाचे आहेच. जास्ट क्षमतेची रॅम-प्रेसेसर हे डेटाप्रोसेसींगच्या दर्जावर परिणाम करतात, त्यामुले अधिक दर्जेदार कन्टेन्टचा अनुभव उपभोक्त्याला येतो. जसे एचडी विडिओ हे साधारण १ मिनिटाचा असेल तर २५-५० एमबी पर्यंत असू शकतो, हा एक मिनिटाचा विडियो एक मिनिटापेक्शा कमी वेळात डाऊनलोड व्हायला तितका स्पीड पाहिजे, तसेच त्या विडियोल प्रोसेस करायला (म्हणजे स्क्रीनवर दाखवायला) प्रोसेसर रॅमचा स्पीड चांगला हवा. हे सर्व काम चांगल्या कन्फिगुरेशनच्या मोबाइल्समध्ये उत्तम होतं, त्यामुळे त्यासाठी लॅपटॉप बाळगायची गरज नाही. माझा २००१० ला घेतलेला एचपी लॅपटॉप २ जीबी रॅम चा ड्युअल कोर ६४ बिट चा अजूनही कोरल-फोटोशॉपच्या हेवी फाइल्स प्रोसेस करत जीवंत आहे. आतातर बाजारात चार जीबी रॅमचे क्वाड्रा - ऑक्टा प्रोसेसर वाले मोबाइलच आले आहेत. त्यात गेमींग, सिनेमे बघणे, शॉपिंग व कम्युनिकेशन असे सर्व एका छताखाली होते. जे चांगलेच आहे. घरी फायबर ऑप्टिक आली तरी आता परत लॅपटॉपच्या कुशित बसायची गरज कुणाला पडणार नाही असे वाटते. मोबाईलला पर्याय नाही. मोबाइलमुळे लॅपटॉपच्या खपावर परिणाम झाल्याचे समजते. तसेही टेक्नॉलॉजी उलटी पावले चालेल असे मला वाटत नाही. जिओच्या पत्त्यांबद्दल काही सांगू शकत नाही. सध्या तरी माझ्यामते तो फार क्षुल्लक मुद्दा आहे. जोवर कोणी बिलिंग मध्ये मान अडकवून घेत नाही तोवर कोणत्याही कंपनीची सर्विस उत्तमच असते. पटले नाही तर पोर्ट-आउटही करण्याचा मार्ग असतो. ज्यां कोणी आपले दुसर्‍या कंपनीचे नंबर जिओ मध्ये आधीच पोर्टाऔट केले असतील तर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

मिपावरचे लांबलचक धागे आणि प्रतिसादसुध्दा मोबल्यावर आरामात टायपवता येतात!

क्रिएशनसाठी लोकांना मोठा कीबोर्ड लागतो. बाकी अॅक्सेससाठी मोबाइलमधल्या तीन ते दहा एमबीपीएसने फारसा फरक पडणार नाही. मुद्दा २) जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे?

In reply to by कंजूस

जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे?
नाही. तुम्ही जिओफाय वापरु शकता.

बाकी अॅक्सेससाठी मोबाइलमधल्या तीन ते दहा एमबीपीएसने फारसा फरक पडणार नाही. >> युजरच्या गरजेवर अवलंबून आहे. तसेच युजरच्या भोवतालच्या इन्फ्रावरही, व युजर्सच्या संख्येवरही. फ्लॉलेस सर्वीस साठी सतत वरची जनरेशन अपग्रेड करणे आवश्यक आहे. तुम्हाला स्टेशनवर गरजेपुरते मोफत वायफाय मिळते असे वाचले आहे. अशी सोय मिळणे प्रत्येकाला शक्य नाही. मुद्दा २) जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे? >> हेही युजरच्या गरजेवर अवलंबून आहे. बहुतेक लोक ४जी वर (सगळ्या कंपन्यांचे ४जी आलेत आता) गेल्याने ३जी वाल्याना, २जी वाल्यांना बर्यापैकी स्पीड मिळत आहे. तरी उच्च दर्जाच्या कन्टेन्ट मुळे कचरा(कॅश) जास्त साठते, त्यासाठी जास्त क्षमतेचे (साठवण) मोबाईल लागतात, साठवण प्रोसेस करायला प्रोसेसर अपग्रेड हवेत. २जी ३जी चे दोन-तीन वर्षापेक्षा जुने मोबाईल हॅन्ग होणे-स्लो होणे हा प्रकार सर्रास आहे. जिओसाठी नव्हे तर ४जी साठी मोबाईल बदलावे, अर्थात ज्याचीत्यची गरज. पुढचे भविष्य एलटीई+४जीचे असेल किमान अजून दोन-तीन वर्षे तरी... तुम्ही 'आम्ही कसे अपग्रेडेड आहोत बघा' वाल्या शोशायनिंग जनरेशनकडे, टाइप्स कडे निर्देश करत असाल तर आपला पास! :-)

पंचविस-तीस हजार कोटी गुंतवणूक केलेली कंपनी नंतर रेवन्युकडे लक्ष ठेवेलच. बिलिंगचेच गिह्राइक घेईल, प्रिपेड बाद. २) कचरा क्याश साठणे हे android चे अंगभूत लक्षण आहे. २/३/४ जीचा संबंध नाही. ३) मोबाइल सर्विस प्रवाइडर दर तीन महिन्याला कन्फ्युजन वाढवत आहेत. ४) जियोच्या विरोधात बोलत नसून एकूण स्पीड किती असणे खरोखर गरजेचे आहे हा मुद्दा आहे. २जी/Edge च्या तुलनेत ३जी चा स्पीड खूप होता पण आता ३ विरुद्ध ४ फारसे परिणामकारक वाटत नाही.

स्पीडच्या गरजेबद्दल वरच सांगितले आहे. आता जनरेशनवाईज फरक भासत नाही याचे कारण असे की ३जीचा स्पीड मिनिमम १४.४ एम्बीपीस तर ४जीचा (एचएसपीए) २१ एम्बीपीस आहे. सध्या सगळे सेवादार बहुतेक ४जी (एलटीई) च्या नावाखाली ४जी(एचएसपीए) देत आहेत. ४जी(एल्टीई) चा स्पीड मिनिमम १०० एम्बीपीएस आहे. कोणाला हा स्पीड मिळाला असल्यास कळवावे. मलातरी अजून नाही मिळाला. २जी(जीपीआरस) चा स्पीड ५१२ केबीपीएस होता, त्याच्या तुलनेत ३जी चा १४ एम्बीपीस खूपच वाटणार. जिओ सुरु होण्याआधी चारपाचमहिने आरकॉमच्या नंबरवर एकदोनदा अचानक मला ३० ते४० एमबीपीएसचा स्पीड मिळाला होता, ते काय भुताटकी होती ते कळले नाही.

ग्राहकांना फसवणे ही रिलायन्सची खासियत आहे. पहिल्या रिलायन्स फोनमधे "वायरलेस इन लोकल लूप" ही टेक्नॉलॉजी वापरून चोरी केली गेली होती. जिओमधे तुम्ही जो फोन करता, तो व्हॉट्सॅप कॉलसारखा असतो. इंटरनेट बंद केली, तर रिलायन्सची "रेंज" जाते. शिवाय तुमचं आधार कार्ड अन नको तो डेटा तुम्ही ऑलरेडी त्यांना दिलेला आहेच. तेव्हा, लवकरात लवकर ते जिओचं कार्ड तोडून फेकून द्या, हा प्रेमाचा फुकट सल्ला आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

ज्याप्रमाणे या डब्लूएलेलला कनेक्टिविटी द्यायला सुरुवातीला इतर कंपन्यांना भाग पाडले अन नंतर ते बारगळले, त्याचप्रमाणे जिओचे "व्हॉट्सॅप" कॉल्स इतर नेटवर्कशी (जीएसेम) जोडण्यास इतर कंपन्यांना भाग पाडण्यात येत आहे. याविरोधात कोर्टकचेर्‍या सुरू आहेत, अन जिओ नॅचरल जस्टिसच्या विरोधी काम करीत असल्याने ते बंद पडेल अशी अंधुकशी शक्यता आहे. नसल्यास, इतर कंपन्या आपले नाक कापून या नव्या शूर्पणखेस अपशकून करतील अशी दाट शक्यता आहे. अर्थात, मल्टीनॅशनल्सचे हात भरपूर लांब असतात, अन ते रिलायन्सला पुरून उरतील असेच (मॅगीच्या उदाहरणावरून) वाटते.

In reply to by आनंदी गोपाळ

साहेब, आता सगळेच मोबाईल कंपन्या आधार कार्डचा डेटा घेतात. रिलायन्स अपवाद नाही. शिवाय या पुढील काळात मोबाईल कनेक्शनला 'आधार' चा आधार लागणार आहे. इंटरनेट बंद केले तर जीओ ची रेंज जात नाही तर जे हँडसेट volte कंपॅटीबल नाहीत त्याच हँडसेट वर रेंज जाते. बाकी ते ग्राहकांना फसविण्याबाबत काही अंशी सहमत.

In reply to by धर्मराजमुटके

आधार ची झेरॉक्स घेणे, वि बोटांचे ठसे घेणे. काही फरक?

In reply to by आनंदी गोपाळ

नुकतेच वोडाफोन कार्ड घेतले. अंगठेबहाद्दर समजुन ठसाच घेतला. जुने लोक अंगठा का लावायचे ते आत्ता कळाले. खरच काळाच्या पुढं होती ही मंडळी !

In reply to by धर्मराजमुटके

रेंज सर्व हँडसेट वर जाते. नेट बंद करून पहा.

In reply to by आनंदी गोपाळ

रेडमी ३ एस प्राईम आणि लेनोवो के ४ नोट. दोन्ही वर ! दोन्ही VOLTE सपोर्टेड हँडसेटस आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

दोन्ही प्रतिक्रिया वाचून गोंधळ झाला आहे , डेटा बंद केला तर कनेक्शन बंद होत ना ? कारण ऑफ लाईन दाखवतो

In reply to by धर्मराजमुटके

माझादेखील लेनोवो के ४ नोटच आहे. माझ्याकडे तर बंद होतं सगळं, डेटा बंद केला की जिओ नंबर ऑफलाइन. तुमचं कसं काय राहतंय..?

In reply to by संदीप डांगे

माहित नाही पण मी डबल चेक केलं दोन्ही हँडसेटवर. कॉल होत आहेत. कदाचित सेटींगमधे VOLTE चा काही पर्याय आहे. नीट बघून सांगतो.

In reply to by धर्मराजमुटके

माझ्याकडे ओप्पो / रेडमी अ४ आहे तर काही प्रॉब्लेम नाही.. माझ्याकडे तर चालू राहते..

In reply to by संदीप डांगे

माझे पन झाले होते नविन घेतले तेव्हा पन सॉप्टवेअर अपडेट केले नि झाले चालु ......

In reply to by आनंदी गोपाळ

धर्मराज मुटके बरोबर बोलत आहेत. ,ज्यांच्या हॅन्डसेट मध्ये volte आहे त्यांना नेटची गरज पडत नाही. त्यांना जियोचं व्हाईस कॉलचं App टाकायची सुद्धा गरज नसते. -दिलीप बिरुटे

मूलभूत मुद्दा जिओ VOLTE वर चालते म्हणजे ते विवक्षित आहे उलट संदीप म्हणतात तसे इतर कंपन्याचे ४जी एचएसपिए म्हणजे सर्वांना लागू होणारे जिएसएम आहे. याचा स्पिड थोडा कमी असला तरी बय्राच मोबाइलला चालेल कॅाल आणि डेटासाठी.

काळ एक जिओ वाय फाय राऊटर घेतला रुपये १९९९/- ९९ रुपये जिओ प्राईम चे सदस्यत्व शुल्क आणि एक महिन्याचे ३०३/- असे रुपये २४०२/- भरून आलो. यात २८ एप्रिल पर्यंत ३३ GB डेटा मिळणार आहे. जिओ चा वेग साधारण ६-८ mbps एवढा मिळतो आहे. सध्या माझ्या आणि पत्नीच्या भ्रमणध्वनी वर एअरटेलने दरमहा १० GB अतिरिक्त डेटा तीन महिने पर्यंत फुकट दिला आहे. घरात हाथ वे चा वायफाय ९९९ रुपयात १०० GB १०० mbps वेगाने ( प्रत्यक्ष मिळणारा वेग १० mbps आहे) आणि त्यानंतर २ mbps या दराने आहे. घरच्या चौघात मिळून १५३ GB डेटा वापरता येईल. याचा सध्याचा खर्च फोनचे बिल लक्षात घेता साधारण रुपये १९००/- महिना होतो आहे. ( दोन फोनचे ३००/- प्रत्येकी३०३ जिओचे आणि ९९९ हॅथवेचे. सांगण्याचा मुद्दा एवढाच कि दोन हजार रुपयात कितीही वेळ ब्रॉड बँड वापरता येतो. लोकांना दाखवण्यासाठी अँपल घेऊन ५०,०००/- च्या वर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात चार वर्षे भरपूर नेट वापरता येते. जाणीव चार वर्षांनी फोन बदलला कि मीटर परत चालू. आमच्या चौघांचे फोन १५०००/- च्या आतले पण ४G VOLTE आहेत. माझा संगणक आणि दोन्ही मुलांचे लॅप टॉप एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्याला त्रास न होता सुरळीत पणे वापरता येतात. मी याची तुलना अतिद्रुतगती मार्गाच्या टोल शी करतो. एकदा टोल भरला कि सुखात सुरळीत प्रवास करता येतो. हि या सुविधेची किंमत आहे.