साहित्य
५०० ग्रॅम ब्रॉकोली
१ कप किसलेले चेडार चीज
१ कप किसलेले प्रोसेसड चीज (अमुल)
१०० ग्रॅम फ्रेश क्रीम
६ ते ८ वेलदोडे
१५ ते २० काळेमिरे
२ मोठे चमचे लसूण पेस्ट
१ मोठा चमचा आलं पेस्ट
४ ते ६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमी जास्त करा)
कृती
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. ब्रोकोलीचे मोठे तुकडे करून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात १ मोठा चमचा मीठ घालून, ब्रोकोली २ ते ३ मिनिटे गरम पाण्यात ब्लाँच करून घ्या. गरम पाण्यातून काढून, लगेच गार पाण्यात किंवा नळाखाली गार करून घ्या. ब्रोकोली निथळत ठेवा, तो पर्येंत इतर तयारी करून घ्या.

मिक्सर मधून, मिरच्या, आलं, लसूण, वेलदोड्याचे दाणे आणि काळीमिरी बारीक करून घ्या. एका भांड्यात, चीज, क्रीम आणि हि लसूण मिरची पेस्ट एकत्र करून घ्या. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून, ब्रोकोली ह्या मिश्रणात १ ते २ तास मॅरीनेट करायला ठेवा.
ओव्हन, १८० ला प्री-हीट करून, हि ब्रोकोली १५ ते २० मिनिटे भाजून घ्या. कांदा, टोमॅटो बरोबर हि तंदुरी मलई ब्रोकोली गरमागरम वाढा!
चीज आणि क्रीम मुळे एक छान richness येतो ह्या डिशला! मिरच्या कमी घातल्या तर मुले देखील आनंदाने खातील. ब्रोकोली ऐवजी, बोनलेस चिकन चे तुकडे वापरून ह्याच पद्धतीने केलेला मलई चिकन टिक्का सुद्धा सुंदर लागतो! क्रीम आणि चीज बेस्ड डिश असल्यामुळे, एखाद्या लाम्बरूस्को, जिनफन्डेल किंवा कॅबरने वाईन सोबत अजूनच मज्जा येईल!

प्रतिक्रिया
अत्याचार
सही
क्लास्स!!
पाकृ आवडली.
मस्तच.
लव्हली !
मॅरीनेट करायला ठेवलंय. रात्री
नं विसरता फोटो काढून इथे टाका
In reply to मॅरीनेट करायला ठेवलंय. रात्री by प्राची अश्विनी
फोटू
In reply to नं विसरता फोटो काढून इथे टाका by केडी
कॉर्न आणि कांद्याची आयडिया
In reply to फोटू by प्राची अश्विनी
छान झालेलं. ब्रोकोली कमी होता
In reply to नं विसरता फोटो काढून इथे टाका by केडी
दुष्ट. दुष्ट!
लै भारी!
अगं किटो डाएट मध्ये हेच खायचं
In reply to लै भारी! by पैसा
अगं किटो डाएट मध्ये हेच खायचं
In reply to लै भारी! by पैसा
उत्तम पाककृती !!!
डायटेशन....
In reply to उत्तम पाककृती !!! by सावत्या
पाकृ आवडली
अहो एकदाच करून बघा....चवीला
In reply to पाकृ आवडली by आषाढ_दर्द_गाणे
जाउदे
In reply to अहो एकदाच करून बघा....चवीला by केडी
तव्यावर (ग्रील पॅन) वर भाजून
In reply to जाउदे by सविता००१
मस्त, मस्त!मस्तच!
नक्की करून बघणार!
मस्त
व्वा मस्त !
आहाहा... भूक लागली ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty