आम्ही दोघे बद्रीनाथ हुन चोपता कडे जायला निघालो,चोपता बद्दल वाचून होतो की तीथे वीज नाही,
बद्रीनाथ ते चोपता हा प्रवास तर आमच्या डोळ्यांसाठी एक पर्वणीच होती
शुष्क हिमालयाच्या रंगानं पासून गर्द दाट हिमालयाच्या झाडीतला तो प्रवास,आज ही त्याचा गारवा अंगावर जाणवतो,आमची गाडी त्या पर्वत रंगानं मधून जात होती आणि आम्ही निसर्गाच्या एक अद्भुत रचनेचा प्रवास करत होतो
ती जंगल जणू काही आम्हाला त्यांच्या कुशीत विसावा घेण्यासाठी आमंत्रण देत होती, आमचा प्रवास आता चोपता पाशी येऊन थांबला,आणि तेव्हा कळलं की दुपार चे अडीच झाले आहेत
फारशी भूक नव्हती पण तरी आम्ही जेवलो,आम्हाला वाटलं होतं की चोपता हे छोटेखानी गाव असेल,पण तिथे गेल्यावर कळलं की मोजून दहा घराची जंगलातली वस्ती होती ती,आणि त्या लोकांनीच यात्रेकरू साठी छोटी घर बांधली होती आम्ही हि एक रूम बुक केली,आणि पलंगावर यादव होऊन जरा श्रम परिहार केला,तिथे वीज नव्हती पण तिथल्या लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करून निदान रात्री तरी वीज असेल ह्याची व्यवस्था केली होती,हे पाहून त्या लोकांचं मला जरा कौतुकच वाटलं
चोपता ला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणतात ह्याचा प्रत्यय आम्हाला त्याची दिवशी संध्याकाळच्या भटकंती वेळी आला
तिथून सूर्य मावळताना चित्रकाराचे रूप घेतो कि काय असाच भास होत होता,मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तो परिसर असा काही न्हाऊन निघाला होता,कि प्रत्येक वेळी माझं मन त्या सुंदर चित्रात गुरफटून जायचं,ते सर्व चित्र मनात साठवायला दोन डोळे कमी पडतील कि काय असा वाटायची वेळ आली
असो ,मावळत्या सूर्या बरोबर चहा चा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रूम वर आलो,आता तयारी करायची होती उद्याच्या तुंगनाथ आणि चंद्राशीला ट्रेक ची
---- ओंकार जोशी
वाचने
5187
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
बद्रीनाथ ते चोपता रस्त्याचे
नमस्कार,आपण माझा लेख वाचलात
In reply to बद्रीनाथ ते चोपता रस्त्याचे by यशोधरा
छान लिहिताय
धन्यवाद मी फोटो अप लोड
In reply to छान लिहिताय by पैसा
वरील सगळ्यांच्या प्रतीसादाशी सहमत
वर्णन आवडलं.
वाह!!
(No subject)
मी मोबाईल वरून फोटो अपलोड
In reply to (No subject) by ओ