टीप :-हा धागा एका बोक्याची गोष्ट ह्या धाग्यांवरून स्फूर्ती घेऊन लिहिला आहे.
तस मार्जार कुळाशी माझ काही वैर नाही. मार्जार मुळाशी माझा पहिला संबंध माझ्या बालपणीच आला. आमच्या बिल्डिंग मध्ये खाली राहणाऱ्या एकांनी घरी मांजरे पाळली होती.
सोनू आणि मोनू मांजर ह्यांनी माझ्या लहानपणीच्या आठवणींचा बराच मोठा भाग व्यापला आहे. शाळेतून आल्यावर त्यांना दूध देणे हा मी आणि माझ्या चुलत भावाचा एक-कलमी कार्यक्रम असायचा.
ते पायात पायात घोटाळणं, म्याव म्याव अशी लाडिक आर्जव करणं , जिन्यावरून थेट घरापर्यंत येणं अशी लाडीगोडी तर रोजचीच होती. बशीत दूध घालून खाली अंगणात जाई पर्यंतही त्यांना सवड नसायची.
लहानपणची अजून एक आठवण म्हणजे सोनू-मोनू चे केलेले बारसे. मी माझा भाऊ आणि बहिणींनी त्याचे बारसे अगदी थाटात ( ५ पेढे खाऊन) केले बरका!
सोनू मांजर त्यातल्या त्यात विशेष आवडीच. त्याची आवडती जागा म्हणजे जिन्याखालच इलेक्ट्रिक बॉक्स असलेल कपाट. भाऊ आला कि त्याच्या पायात पायात फिरेल , लाडीगोडी लावेल पण माझ्या वाट्याला कधी गेला नाही.
मी पहिल्या पासूनच मांजरांच्या बाबतीत Neutral आहे. मला मांजर आवडतात पण आणि नाही पण आवडत.
दुसरे मांजर म्हणजे मोनू मांजर. हे मांजर म्हणजे एकदम स्थितप्रज्ञ! दूध द्या , जवळ घ्या,गोंजारा त्याला काहीही फरक पडत नसे. हा पण सोनू ला दूध दिल आणि मोनू ला दिल नाही तर मात्र तो बारीक म्याव करून तक्रार मात्र नक्की करी. पण पुढे जाऊन लाडीगोडी वगरे लावेल तर शप्पथ!
मोनू ची अजून एक आठवण म्हणजे आमच्या बिल्डिंग खाली एक मद्रासी कुटुंब राहायच कौलारू घरात. त्यांच्या कडे एक एमएटी होती. त्याचा मागच्या सीट वर हा शहाणा नेहेमी बसलेला असायचा. कोणी कितीही हाकलू दे मोनू तिथून अजिबात हलायचा नाही.
तुमच्या काही मांजराच्या आठवणी आहेत का? त्या प्रतिसादात नक्की लिहा.
वाचने
1952
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मांजर आमच्याकडे नव्हती पण
लिहा हो. आठवणी वाचायला
In reply to मांजर आमच्याकडे नव्हती पण by हेमंत८२
आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये
काय सांगता...!
In reply to आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये by टवाळ कार्टा
काय राव परदेशात जाउन
In reply to काय सांगता...! by प्रचेतस
अगदी रहावलंच नाही म्हणून
मांजर माझा सर्वात आवडता प्राणी आहे