मला आवडणारे काही podcasts.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ऑफिस मधून घरी येताना फोनवर podcasts ऐकणे हा माझा आवडता छंद आहे . दोन वर्षाआधी अचानक मला podcasts चा आंतरजालावर शोध लागला आणि तेव्हापासून मी नियमित podcasts ऐकत आहे. गेल्या दोन वर्षात मला गवसलेले आणि माझ्या आवडीचे काही podcasts खाली देत आहे . आपणही आपल्या आवडीचे podcasts सुचवू शकता.
• Dan carlin's Hardcore History
जर आपणास इतिहासाची आवड असेल तर आपणास हा podcast आवडेल. जागतिक इतिहासातील महत्त्वाचे विषय घेऊन त्यावर ४ ते ५ तासांचा एक एपिसोड असतो. जगातील सर्वात जास्त लोकप्रिय podcasts पैकी हा एक आहे.
• History of Rome
Mike Duncan चा आणखी एक लोकप्रिय podcast. रोमन इतिहासाचे १५ ते ३० मिनिटांत सुंदर विवेचन ह्यात केलेले आहे.
• Welcome to Night Vale
Nightvale ह्या काल्पनिक गावातील लोकांसाठी हा रेडीओ शो आहे. ह्या गावातील होणार्या चमत्कारीत घटना ह्या शो द्वारे आपल्यास सांगितल्या जातात. आपणास काल्पनिक रहस्यकथा मध्ये रुची असल्यास नक्की ऐका.
• Freakonomics radio:
Freakonomics ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या सह लेखकाचा हा शो. दैनंदिन जीवनातील गोष्टींच्या मागील अर्थशास्त्र उलगडून सांगणारा हा कार्यक्रम.
• Lore
आपल्या आयुष्यातील भूतखेतांच्या कथा, चालीरीती, अंधश्रद्धा मागच्या इतिहासाचा मागोवा घेणारा भन्नाट शो.
• Bill Burr’s Monday Morning Podcast:
बिल बर ह्या माझ्या सर्वात आवडीच्या विनोदवीराचा शो. त्याच्या आसपास घडणार्या गोष्टींच्या हसून हसून पोट दुखावणार्या कथा.
• The bugle Podcast:
Andy zaltzman ह्या विनोदवीराचा जगप्रसिद्ध शो.
वरील सर्व podcasts आपण Pocket casts किंवा Stitcher ह्या app वर ऐकू शकता.
प्रतिक्रिया
माजा मराठी असा तंजावर मराठीचा
दुरुस्ती व अधिक माहिती
पॉडकास्ट म्हणजे रेडिओ सारखं
पॉडकास्ट म्हणजे रेडिओ सारखं
पॉडकास्ट स्टेशन
धन्यवाद
ईकॉनटॉक्स
इतिहासाच्या पाउलखुणा बद्दल
झकास ! छान लिस्ट तयार होईल.
मी पोकेट कास्ट चे अॅप
डॅन कार्लिनबद्दलच लिहायला आलो
Planet Money
मला कल्पनाच नव्हती हे इतकं
धन्यवाद
माझ्या कलियुग कथेचे हे वाचन.... ष्री. देव यांनी केलेले.
अमेरिकास्थित मराठी माणसांनी चालू केलेले उपक्रम पॉडकास्टवर
धन्यवाद, सुधांशु नूलकर!
मस्तच संकलन.. या धाग्यावर
माझे आवडते: