कामगार शक्तीचा.....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
२०१०... पाहिलंच पोस्टिंग होतं अंदमान ला . या आधी गेलो नव्हतो तिकडे . ४-५ महिने राहायचं जरा वैताग आलेला . आर एपी डी आर पी चा प्रोजेक्ट होता . त्सुनामी नंतर . जावं लागलं बाहेर असताना ,मी परदेशात होतो तेव्हा काही दिवस तरी अचानक जावं लागलं . ते पण आपण फिरतो ते अंदमान नाही रंगत पासून मायाबंदर ते दिगलीपूर पर्यंत . सुरवातीचे ५-६ दिवस मजेत गेले . मायाबंदर ला शासकीय विश्रामगृह होतं राहायला . फिरून वैगरे मजा आली पोर्टब्लेयर ला पण . काम अवघड होतं त्यात मला बाहेरून अचानक इथे पाठवलेलं. मुख्य कंपनी सरकारी पॉवरग्रीड आणि कंत्राट आमच्या कंपनीला मिळालेलं. आम्ही ज्यांना उपकंत्राट दिलेलं त्यांनी कामगार ओरिसा मधून आणलेले . मुळात कष्टाच्या कामाला आंध्र मधून कामगार आणतात . केबल हाय वोल्टेज साठी . तरी उपकंत्राटदार कंपनी ज्यांची होती ते ओरिसा चे होते . म्हटलं जाऊद्या ..त्यांचे २ इंजिनियर १ सुपरवायझर आणि ७० कामगार असे आधीच तिथे पोचलेले . मी एकटाच होतो आमच्या कंपनी कडून आणि एक सरकारी मुख्य अधिकारी . थोड्या दिवसांनी शासकीय विश्रामगृह सोडावं लागलं कारण कपंनीने सोय करून दिली . राहता येणार नव्हतंच तसं तिकडे म्हणा .तेव्हा थोडी गंभीरता जाणवू लागली काही असलं तरी एकदा साईट वर गेलं कि एक तासानंतर दुकान लागायचं . त्वरित काही नाही . कार निकोबार ला गेलो कि विषयच संपला . काही वेळा २ दिवस येता नाही यायचं . समुद्र खवळला कि . त्यात कधीपण पाऊस . सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आणि कधीतरी माझे वरिष्ठ यायचे पोर्ट ब्लेयर वरून तितकाच दिलासा . मिटिंग ला पोर्ट ब्लेयर ला जावं लागायचं. जंगलातून जाताना सगळ्या गाड्या एका लायनीत निघायच्या . पुढे पोलीस मग गाड्या आणि मागे पोलीस . कोणी अनुभवलं असेल तर लक्षात येईल मी जिथे राहायचो तिथे नेहमी हि परिस्थिती होती. तरी दिवस बरे चालले होते . म्हणजे फक्त कामगारांचं टेन्शन होतं. कारण माझ्या कंपनीतर्फे मीच होतो तिकडे . सरकारी अधिकारी होते ते विशेष लक्ष नाही द्यायचे ते त्यांच्या मूड मध्ये असायचे . विशेषतः अंदमान ला दुपारनंतर मस्त प्यावी खेकडे वैगरे खावे आणि आराम हा खाक्या असायचा . मी पण सामील व्हायचो पण कामानंतर कारण ७० कामगार अभियंते आणि काम हि जबाबदारी होती . ते माझ्या हातात त्यामुळे मला काही जमायचं नाही नेहमी . कारण केबल टाकताना पिसाळलेले हत्ती तसेच काही प्राणी तसेच काही मागास जमाती हे टेन्शन असायचं . अभियंते प्रामाणिक पणे काम करत होते तरी मला विशेष टेन्शन होतं त्या कामगारांचं . अगदी अंदमान म्हणजे बाहेर चालोय खूप कमवून येणार असं म्हणून ते गावातल्या सरपंचांना सांगून आले होते . काही दिवसात त्यांचा भ्रमनिरास व्हायला लागला . असं कुठे काम असतं का ? पैसे महत्वाचे नसतात ? असं एक कामगार रोज म्हणू लागला . आम्ही घाबरलो ७० लोकांना परत पाठवायचं काही सोपी गोष्ट नाही . अशातच एक दिवस एक गोष्ट घडली फार दुर्मिळ अश्या जारवा जमातीच्या संवर्धनासाठी त्या काळी आम्ही राहायचो त्या विभागात दारूचं दुकान बंद झालं . आम्हाला काहीच त्रास नव्हता गाडी हाताशी होती पण कामगारांमध्ये ह्याने असंतोष अजून वाढला, फसवून आणलं अशी ओरड चालू झाली .
क्रमशः
प्रतिक्रिया
उत्तम सुरुवात
मस्त सुरुवात
Anybody has mobile number of
वाचतोय
वाचतोय.. पुढील भाग लवकर टाका.
तुम्ही लेखमालेचे एक-दोन भाग
+१ आणि मोठे भाग पण येऊ द्या..
अगदी हेच म्हणणार होते.
दहा शिक्षित कामगारांना
भारीच!!!
वरूणराव, येउंद्या पटपटा,
वाचतोय.....
छान सुरुवात