हेवा, मत्सर, असूया.
च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!?
मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात!
माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं.
मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात!
कसलं भारी सरप्राईज गिफ्ट दिलं तिच्या नवऱ्यानं/ त्याच्या बायकोनं! कसलं रोमँटिक! इथं आमच्या वाढदिवसांना चॉकलेट आणि फुलांच्या पुढे मजल जात नाही!
काय अभ्यास करतात त्याची/तिची मुलं. आणि शिवाय प्रत्येक एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीत पुढे!आम्ही तिनही त्रिकाळ शंख केला तरी पालथ्या घड्यावर पाणी!
ओळखीचं वाटतंय का हे सर्व? कधी कधी जवळच्या कुणीतरी मनातलं बोलून दाखवलेलं तर कधी कधी आपल्याच मनातले हे आवाज. I want to have what you have! म्हटलं तर अगदी क्षणभराची ही भावना पण खोल आतवर टोचत जाणारी. कधी कधी असा विचार करायची सवय लागते मनाला. एखादा क्रोनिक आजार असावा तशी. लक्षात येईपर्यंत अनेक आनंदाच्या क्षणांना, अनेक आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणीना गमावलेलं असतं.
तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे विचार मनात येणं अगदी कॉमन आहे. फक्त आपल्या नकळत ते पोखरत जातात आपल्याला. तर ही वाळवी कशी थांबवायची? असा प्रश्न गुगलबाबाला विचारल्यावर उत्तर आलं, बी ग्रेटफूल! कृतद्न्य व्हा. तुमच्या आयुष्यात असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दलसुद्धा. तुमचं अगदी छोटंसं काम जरी कुणी केलं असेल, तुमच्याशी अगदी दोन शब्द प्रेमाचे बोलले असतील तर त्यांना धन्यवाद द्या. कुठलीही गोष्ट गृहीत धरू नका. आणि हे कधीतरी एखादा दिवस करू नका तर याची सवय लावा.
हे सगळं तत्वज्ञान वाचून एकदम छान वाटतं पण काही दिवस गेले की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात. तसं होऊ नये म्हणून हा धागाप्रपंच. थोडक्यात काय तर कुठलीही गोष्ट एकत्र केली, कुणाबरोबर केली तर उत्साह टिकून राहतो. इथं सगळे व्यायामाचे धागे काढत असतात, हाही एक मनाचा व्यायाम म्हणून करायला काय हरकत आहे? आपल्या दिवसातली कुठलीही गोष्ट/गोष्टी ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते त्या इथं लिहूया का? कधी कधी असं वाटेल की रोज रोज काय तेच तेच लिहिणार? किंवा एवढं काही घडत नसत माझ्या आयुष्यात? पण खरंच असा विचार करण्यापूर्वी एकदा लक्ष देऊन आजूबाजूला पहा. मला खात्री आहे एखादी तरी गोष्ट अशी असेल ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला कृतज्ञता नक्की वाटेल.
सुरवात मी माझ्यापासून करते,
आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की मला हा लेख लिहायचं सुचलं :)
आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की माझी तब्येत धडधाकट आहे. :)
आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की माझ्या सर्व आप्त स्वकीयांची आणि मित्र मैत्रिणींची तब्येत उत्तम आहे, कुणाच्याही मागे डॉक्टर, औषधपाणी नाही. :)
ह्या सगळ्या गोष्टी म्हणलं तर अगदीच लहानसहान पण खूप ताकत असलेल्या, त्या लिहून झाल्यावर खूप छान वाटलं. मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा शेयर करणार का इथे? दिवसातला अगदी थोडा वेळ द्या पण इथे येऊन काहीतरी जरूर शेयर करा. आंतरजालावर नकारात्मक काही वाचायला मिळायची अजिबात ददात नाही. आपण जाणीवपूर्वक चांगलं, सकारात्मक इथे या धाग्यावर लिहून कुठेतरी आशेची एक पणती तेवत ठेवूया का?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3941
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कमी शब्दात अर्थगर्भ
हाहा! तुम्ही मेगा/गिग
In reply to कमी शब्दात अर्थगर्भ by संदीप डांगे
गुगलबाबाला नेमका कसा प्रश्न
feeling envy help असा प्रश्न
In reply to गुगलबाबाला नेमका कसा प्रश्न by मराठी कथालेखक
गूगलला विचारलं नाही.
क्या बात है.
In reply to गूगलला विचारलं नाही. by पैसा
एका घडुन गेलेल्या घटनेबद्दल
संपादक झालात वाट्टं ?
In reply to एका घडुन गेलेल्या घटनेबद्दल by जेपी
श्वास चालू आहे
जन्माला येतांना आपण
माझं बोलणं रोखठोक आणि मन
हेवा, मत्सर, असूया.
ओह्ह मी envy या शब्दाला
In reply to हेवा, मत्सर, असूया. by आदूबाळ
हेवा, असूया, मत्सर
In reply to ओह्ह मी envy या शब्दाला by इना
असं कसं? असं कसं?
आज एका फ्युनरल ला जाऊन आले.
सुंदर प्रतिसाद!
In reply to आज एका फ्युनरल ला जाऊन आले. by स्रुजा
छान
+१ , अगदी हेच ऐकत होते आज
In reply to छान by आनंदयात्री
ज्यांच्या मनात जे चाल्लंय ते
छान.. लेखन आवडले.