पुडाची वडी
डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;)
२. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे.
३. नाही हो.. संपलं सगळं सांगून.
राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली.
नागपूर कडची पाककृती असल्याने मस्त झणझणीत करा
तुम्हीही पहा:
साहित्य: आवरणासाठी : १ कप बेसन, १ कप मैदा, मीठ, १ छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, २ चमचे तेल आणि पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला आणि १ तास झाकून ठेवला. हा असा.
सारण: २ १/२ (अडीच कप ) धुवून , कोरडी करून मग बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप सुके खोबरे किसून, १ मोठा चमचा खसखस, १ मोठा चमचा तीळ, ८-१० हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आलं, मीठ, साखर, १/२ छोटा चमचा तिखट, धने-जिरे पूड १ छोटा चमचा, १ लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
हे असं दिसत होतं.
पोळीवर लावण्यासाठी : २ टी -स्पून तेल आणि २ चमचे गोडा मसाला एकत्र करून.
तळण्यासाठी तेल.
कृती: नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात तीळ आणि खसखस घातली. मिरच्या, आलं-लसूण पेस्ट करून त्यात परतून घेतली. नंतर त्यात किसलेलं खोबरं घातलं. छान परतल्यावर त्यात थोडं तिखट, मीठ, साखर, धने-जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून एकत्र केलं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर घातली.
मग मळलेल्या पिठाचा लिम्बाएवढा गोळा घेऊन तांदळाच्या पिठीवर लंबगोल लाटला. त्यावर तेल आणि गोड्या मसाल्याचे मिश्रण लावले आणि सारण बाजूच्या थोड्या कडा सोडून पसरले. चारी बाजूंनी एखादा पुडा बांधतो त्याप्रमाणे एकावर एक घेऊन चिकटवली. (मी थोडा पाण्याचा हात घेतला होता. सगळ्या वड्या करून झाल्यावर तेल तापवून घेऊन मंदाग्नीवर तळल्या. आणि टोमेटो सॉस बरोबर मटकावल्या.

वर्गीकरण
मस्त !
क्या बात मस्तच!
मासवडी??
तळलेल्या वड्या... ह्म्म्म...
सव्या
मासवड्या?
In reply to मासवड्या? by राधी
नाही मासवड्या वेगळ्या.
आईग्गं! द्या बाबा या वड्या
वा, मस्त!
मस्तच ख मं ग!
अहाहा!!!!! आता हे पण सांग की
वॉटरमार्कसाठी कुठलं साहित्य
वॉटर मार्क
तळण्याला पर्याय
काहीतरी उपयोग आहे का इथे फोटो
एअर फ्रायर मध्ये तळता येतील
In reply to एअर फ्रायर मध्ये तळता येतील by रॉजरमूर
अगदी हाच विचार आला, मागच्या
In reply to अगदी हाच विचार आला, मागच्या by केडी
केदार..
In reply to केदार.. by सविता००१
हो, नागपुरात भर बाजारात एका
In reply to अगदी हाच विचार आला, मागच्या by केडी
रामभाऊ ???
In reply to रामभाऊ ??? by खादाड
@kd
In reply to रामभाऊ ??? by खादाड
@kd
In reply to रामभाऊ ??? by खादाड
बरोबर .....
मस्त मस्त.
घरगुती मेनू, घरगुती फोटो, चव
सहीच !
इतक्या थोर पदार्थाला त्या
In reply to इतक्या थोर पदार्थाला त्या by आदूबाळ
नाही हो
बघतेच करुन!
आता पुणे वारी करायलाच हवी..
यशो, मनिमौ, पिंगू
फोटो दिअसले नाहीत हे किती
तोंडाला पाणी सुटलं !!!!!
पुडाची वडी आणि कोल्हापूर
ओह माय माय !!!
तोंपासु!! मस्तचं दिसातायेत
मस्तच, मला फार आवडतात
व्वा मस्तच आहे.. काका हलवाई
In reply to व्वा मस्तच आहे.. काका हलवाई by सही रे सई
सिंहगड रोड वरच्या काका कडून
मस्त
रेसिपी मस्तच. मिरच्यांऐवजी