नाठाळाचे माथी हाणू काठी
कालच कन्हैय्या कुमारला चौकशी कमिटीने क्लीन चिट दिल्याची बातमी झळकली इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि तमाम डाव्यांना तो निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला.. आणि त्यांनी आनंदाने छाती पिटायला सुरुवात केली. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल हाती येत नाही, तोपर्यंत त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही कारण चौकशी अजून पूर्ण झालेली नाहीये. चौकशीत अजून काही धागेदोरे सापडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणारा काळ ह्या सगळ्याची उत्तरे देईलच.... पण ह्या संदर्भात जेंव्हा कन्हैय्याच्या प्रकरणानंतर वर्षभरात पुन्हा ज्यापद्धतीने रामजास कॉलेजमधले प्रकरण घडले आणि पुन्हा ज्यापद्धतीने मीडियामध्ये (सर्व प्रकारच्या) जो काही हल्लाबोल सुरु झाला आणि पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता ह्या गंज पडू पाहणाऱ्या मुद्दयांनी डोके वर काढले आहे.... त्यामध्ये काही मुद्दे मुद्दामून दुर्लक्षिले जात आहेत. त्याकडे प्रकाश टाकायचा मी माझ्याप्रकारे प्रयत्न करत आहे...
गेल्या वर्षी गोव्यामध्ये आयोजित इंडिया आयडीयाज कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना "बुद्धा इन ट्राफिक जाम"चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ह्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं, ते म्हणाले कि, 'एकदा एक माणूस चर्चमध्ये जातो आणि तिथल्या प्रिस्टला हातातली वाईन दाखवत विचारतो कि "हे येशूचे रक्त आहे का?" प्रिस्ट म्हणतो, "होय हे येशूचे रक्त आहे." मग तो माणूस पुन्हा विचारतो कि, "तुमचे हे उत्तर बुद्धिनिष्ठ आहे कि वस्तुस्थितीनिष्ठ?". प्रिस्ट म्हणतो कि, "वस्तुस्थितीनिष्ठ"... ते उत्तर ऐकून तो बाहेर येतो. बाहेर काही मुली, स्त्रिया असतात. त्यापैकी एकीने एक बाहुली हातात पकडलेली असते आणि बाकीच्यांना म्हणत असते कि, "बघा माझी मुलगी, बघा माझी मुलगी". तो गोंधळून जातो आणि तिला विचारतो, "तू जे काही म्हणत आहेस ते बुद्धिनिष्ठ आहे कि वस्तुस्थितीनिष्ठ?". ती त्याला म्हणते, "वस्तुस्थितीनिष्ठ". तो कपाळावर हात मारू घेतो आणि निघून जातो. एव्हढीच गोष्ट होती ती. आता त्या वाईनच्या आणि बाहुलीच्या जागी "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता" ठेवूया. आपल्याला आत्ताच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येईल.
सध्या जो काही वाद निर्माण केला जातोय तो पूर्ण वाद हा जुन्या आणि नव्या विचारसरणीतलं भांडण आहे. आत्तापर्यंतच्या "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता" ह्या संदर्भातल्या संकल्पना ह्या ठराविक लोकांच्याभोवतीच फिरत होत्या. त्यांची स्थाने सुरक्षित होती. आणि ते जे काही म्हणतील त्यांच्याविरोधात कोणीच काही बोलत नव्हतं. त्यामुळे वरच्या त्या मूर्ख प्रिस्ट आणि त्या मूर्ख महिलेसारखं त्यांच आस्तित्व झालं होतं. त्या वाईनला ते रक्त नाही ती वाईन आहे आणि त्या बाहुलीला ते मूल नाही ती बाहुली आहे असं कोणीसुद्धा म्हणत नव्हतं. त्यामुळे वर्षानुवर्षे त्या वाईनमध्ये नसलेल्या येशूचं रक्त आम्ही आहे असं समजत होतो आणि त्या बाहुलीमध्ये नसलेल्या मुलामध्ये आम्हाला मूल दिसत होतं. जेव्हापासून लोकं त्या वाईनला येशूचं रक्त नं म्हणता वाईन म्हणू लागले आणि त्या बाहुलीला मूल नं म्हणता बाहुली म्हणू लागले. तेंव्हापासून जे कोणी ह्या जुन्या धारणेचे मालक आणि धारक होते त्यांचे स्थान डळमळीत होऊ लागले. त्यांना आणि त्यांच्या धारणांना कोणी आव्हान जोपर्यंत देत नव्हतं तोपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. जेंव्हा त्यांना विरोध सुरु झाला तेंव्हापासून त्यांची ओरड सुरु झाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीची, जी अत्यंत तद्दन टाकाऊ आहे. आणि त्यामुळेच त्यांचा मोदीविरोध.
ह्या देशात स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनच डाव्या विचारसरणीच्या तावडीत इथली प्रसारमाध्यमे आहेत. आणि अगदी पद्धतशीरपणे त्यांना जे काही हवंय त्यापद्धतीने त्यांनी त्यांची धोरणे ठरवली आहेत. आणि आता त्यांना समाजवाद्यांची साथ मिळत आहे. ही कम्युनिस्ट मंडळी अगदी साधनशुचितेचा आव आणत आहेत त्यांच्या इतिहासावर एक नजर टाकू...
भारतात जेंव्हा सर्व जण ब्रिटिशांविरोधात उभे होते, रान पेटवत होते तेंव्हा काही कॉम्रेड लोकं ब्रिटिशांना पाठिंबा देण्यात मश्गुल होती. कारण संताप देणारं आहे. जर्मनीने रशियाविरोधात आघाडी उघडली होती आणि इंग्लंड जर्मनीविरोधात लढाईला उतरलं. रशिया कम्युनिस्ट. तेंव्हा कम्युनिस्ट विचारधारेला वाचवायला हवं म्हणून त्यांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला. म्हणजे स्वतःची विचारधारा वाचवायला ते देशसुद्धा पणाला लावायला मागेपुढे पाहात नाहीत. सध्याच्या कम्युनिस्टांकडे पाहिलं तर त्यांच्या विचारधारेमध्ये काहीच फरक पडलेला दिसत नाही. आज हे त्यांच्या विरोधात होऊ घातलेल्या हिंसेच्या विरोधात असे काही बोलतात कि ह्यांचा इतिहास अगदी अहिंसक आहे. हिटलरपेक्षाही भयानक हिंसा ह्यांच्या स्टॅलिनने केलीये. त्यांच्यच स्टॅलिनने १९३९, मध्ये, पोलंडवर अन्याय करणारा, हिटलर सोबत अनाक्रमणाचा करार केला होता. ज्याची परिणती दुसर्या विश्वयुद्धात झाली. चीनमधल्या माओ-त्से-तुंग ने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली केलेल्या कत्तली पाहिल्या तर अमानुषतासुद्धा कोपर्यात जाऊन ढसाढसा रडेल. वाचकांना जर इच्छा असेल तर चीनमधल्या तीआनमेन चौकातल्या घटनेबद्दल आंतरजालावर हुडकावं. रात्रभर झोप येणार नाही. आता रशियामध्ये बदल होत आहे. पण कधीकाळी ह्या रशिया आणि चीन मधल्या कम्युनिस्टांनि इतरधर्मियांवर प्रचंड अत्याचार केलेत, भारतातसुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही.
आज हिंदुत्ववादी लोकांविरोधात रान उठवणारी मीडिया काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल शांत का बसली? कम्युनिस्ट राज्यांमध्ये दिवसाढवळ्या होणाऱ्या हिंदूंच्या कत्तलीवर ते काहीच का बोलत नाहीत? एका रोहित वेमुलाने आत्महत्या केली तर एव्हढी बोंबलणारी मीडिया इतर आत्महत्येवर का शांत बसतिये? आतातर असं सिद्ध होतंय कि तो दलित नव्हताच. एक दादरी प्रकरण काय घडलं, ते असं दाखवलं गेलं कि प्रत्येक गावागावात तश्या घटना घटना घडत आहेत. तीच मीडिया कैरानाच्या घटनेवर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन का आहे? एखाद्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराच्या बातमीने त्यांच्या वर्तमानपत्राचा मथळा जातो आणि एखादा सैनिक जर शहिद झाला तर त्याला "killed" म्हणून बातमी दिली जाते कुठल्यातरी कोपर्यात. ह्या सर्वांच्या विरोधात कधीच अवॉर्डवापसी होत नाही? आज जे चॅनेल्स "असहिष्णुता आणि अभिव्यक्ती" स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत त्यांनी त्यांचे आधीचे व्हिडिओज बघावेत. एखाददुसऱ्या चला तिसर्या ठिकाणी जर काही घडलं तर सगळ्या देशात ते घडतंय हे असलं चित्र का बरं वाढवून दाखवलं जातंय? दिलं जात नाहीये? सगळ्या चॅनेल्सवर दिवसरात्र त्यांचा तमाशा चालू असतोच ना?
इतके दिवस एका मोठ्या समाजाचा आवाज इतके दिवस दाबला गेला तो आवाज आज बाहेर पडत आहे. विशेषकरून मोदी सत्तेत आले आणि ह्या सर्व प्रसारमाध्यमांच्या स्वैराचाराला वेसण घातली गेली. आणि इतके दिवस इतरांचा आवाज दाबणार्या प्रसारमाध्यमांना हे काही सहन होत नाही म्हणून त्यांनी हे "असहिष्णुतेचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" पिल्लू सोडले आहे. समस्त प्रसारमाध्यमांचा अर्णब-विरोध सुद्धा ह्याच मुळे."आत्तापर्यंत आम्हीच सारं काही ठरवायचो, आता तुम्ही कोण?" हाच विचार ह्यासगळ्यामागे आहे. परवा कन्हैय्या होता आणि आजकाल तो उमर आणि ती गुरमेहेर आहे ह्यांचा तात्पुरता चेहरा... उद्या अजून वेगळा असेल....
ह्या देशात सर्व प्रकारचे नमस्कार चांगले आहेत पण हा जो काही लाल सलाम घातला जातो. "We don't believe in the revolution by Ballet but by Bullet" हे जर ह्यांचे तत्वज्ञान असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. ह्यांना चर्चेची भाषा समजत नाही... चर्चा माणसांमध्ये होते. माणूस आणि पिसाळलेल्या जनावरामध्ये कधीच संवाद होऊ शकत नाही. आणि जर कोणी चर्चा करायला गेलं तर तर ती चर्चा त्यामाणसावरंच बेतू शकते. भारतातले डावे हे सध्या पिसाळलेले आहेत. कदाचित ही भाषा असभ्य वाटत असेल पण तेच सत्य आहे. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही, पण ती हिंसा कोणाविरुद्ध आणि का केली जातीये हे जर विचारात घेतलं तर नक्कीच त्या हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकतं... कारण ह्या देशात जर "भारत से आझादी" म्हणणार्या उमर खलिदचे समर्थन होऊ शकते तर हो... अश्यांना बुकलणार्या अभाविपचेपण समर्थन होऊच शकते...
ज्या दिल्ली उच्च न्यायालयाने कन्हैय्याला दिलं त्या जस्टीस प्रतीभा राणी ह्यांनी ती ऑर्डर देताना खालील मत नोंदवलंय...
The thoughts reflected in the slogans raised by some of the students of JNU who organized and participated in that programme cannot be claimed to be protected as fundamental right to freedom of speech and expression. I consider this as a kind of infection from which such students are suffering which needs to be controlled/cured before it becomes an epidemic.
Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure the same by giving antibiotics orally and if that does not work, by following second line of treatment. Sometimes it may require surgical intervention also. However, if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment.
(जेएनयू च्या विद्यार्थ्यांनी, ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात भागपण घेतला होता, दिलेल्या घोषणांतून जो काही विचार प्रकट होतो तो नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संरक्षित केला जाऊ शकत नाही. मला असं वाटतं, कि ह्या अश्या विचारांच्या संसर्गाचे रूपांतर साथीच्या रोगात होण्याच्या आधीच ह्यावर उपाय केला गेला पाहिजे.
जेंव्हा असा काही संसर्ग कोण्या अवयवात होतो, तेंव्हा आधी काही औषधे देऊन तो बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. नाहीतर, ऑपरेशन केलं जातं. आणि तरीही काही फरक पडला नाही तर तो अवयव कापून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक उरत नाही...)
थोडक्यात आपले तुकाराम महाराज म्हणतात अगदी तसंच,
भले त्यांसी देऊ, गांडीची लंगोटी
नाठाळांचे माथी, हाणू काठी....
संदर्भ:
१. सर्व समकालीन वर्तमानपत्रे
२. https://www.youtube.com/watch?v=5qMffeG-rv8
३. kanhaiyya kumar v. State of NCT of Delhi (MANU/DE/0498/2016)
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
वाचने
8003
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
लोकशाहीतल्या अधिकारात मत
In reply to लोकशाहीतल्या अधिकारात मत by कंजूस
कदाचित
In reply to लोकशाहीतल्या अधिकारात मत by कंजूस
अभ्यास वाढवा
लेख आवडला
मस्त लेख
In reply to मस्त लेख by ट्रेड मार्क
पेस्ट कंट्रोल
In reply to मस्त लेख by ट्रेड मार्क
ट्रुमन साहेब
In reply to ट्रुमन साहेब by आकाश कंदील
त्या मुलाची आई पण त्या ग्रुपचा भाग आहे
ख्मेर रूज
In reply to ख्मेर रूज by सचिन७३८
*वाचायला हवेत असं म्हणायचं
In reply to ख्मेर रूज by सचिन७३८
मिपावरील लेख
घटनादत्त अधिकार आणि भारताची एकात्मता
ह्या देशात स्वातंत्र्य
In reply to ह्या देशात स्वातंत्र्य by गुलाम
'तावडीत असणे' या
In reply to 'तावडीत असणे' या by माहितगार
आणि एक अर्थछटा 'प्रभाव असणे'
In reply to ह्या देशात स्वातंत्र्य by गुलाम
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
माझ्या म्हणण्याचा काय रोख
In reply to ह्या देशात स्वातंत्र्य by गुलाम
राम राम पाव्हनं
In reply to ह्या देशात स्वातंत्र्य by गुलाम
गुलाम साहेब
In reply to गुलाम साहेब by आकाश कंदील
काही हुकुमशहा कम्युनिस्ट
In reply to काही हुकुमशहा कम्युनिस्ट by गुलाम
पण आपल्याकडे अजुनपण काय
In reply to काही हुकुमशहा कम्युनिस्ट by गुलाम
कारण
आता नावच 'वटवट' आहे
लेख अतिशय पटला
धाग्याच्या शीर्षकात तुकाराम
लेख आवडला....
In reply to लेख आवडला.... by मुक्त विहारि
=))
Anybody has mobile number of