मराठी भाषा दिन २०१७: तांबडी माती (मालवणी)

समीर१२३४५६'s picture
समीर१२३४५६ in लेखमाला
16 Feb 2017 - 12:32 pm

1
तांबडी माती

संध्याकाळच्या टायमाक दाजी एकटोच आपलो शाळेत जाणार्‍या पोरांकडे बगीत व्हतो, तितक्यात थय जोश्यांकचो दामोदर इलो, आणि तेनी दाजीक हटकल्यातन. “अरे दाजी हय काय करतयं, थडे आवसं वाट बगता, जा जा बेगीन जा, नायतर परत भडाकतली.” तसो दाजी उठलो, आणि घराकडे परातलो. घराकडे आवस वाट बघतच व्हेती. तिने त्येाका इचारला, "खय रे तू दाजी कितको शोधलो तुका, पनं तु खयचं नाय, मगे दामोदराक पाठयलंय तुका बगूग, हयाबघ बेगीन शेतार जा, भाऊ वाट बगता तुजी." नाइलाजानं दाजी उठलो, आणि शेतार जावक लागलो, तेची आवसं तेच्या र बगून म्हणा होती, हाली हया पोराचा काय समाजना नाय, खेच्याबतच लक्ष दिसना नाय.

दाजी इचार करत जाय होतो, तितक्यात शेजारच्याक श्यामानं तेका हाक मारली, दाजीनं मागे वळानं बघितल्या्नं, श्यामा विचारुक लागलो, "खय रे दाजी घाईघाईत जातयं, माझयाबरोबर बोलाकयं सवड नाय." तसो दाजी थांबलो, श्यामाकडे वळानं तो सांगूक लागलो, "शेतार जातय भाऊ वाट बगत असतलो, आईनं जावक सांगलेला आसा.” शामा वळानं जावक लागलो तसो दाजीनं पटकन इचारलां, “श्यामा माका पण शाळेत येवचा आसा रे, पण आई तयारच नाय आसा. ती म्हणता, शाळा शिकान काय करतलंय? आम्ही बघ, काय शिकाक नाय, पनं काम करुन कमयतोय मा, शेतार रवशीत तर भाऊच्या कामाक तरी मदत होयत. शेतातली तांबडी माती म्हयणजेच आपली आई आसा. तूच सांग श्याामा, माका शिकानसारख्या दिसता तर मी काय करू?" श्यामाक हेच्यार उत्तार दिवक जमाक नाय, तो जसो इलो तसो वाटेक लागलो.

दाजी सरळ शेतात इलो. भाऊ तेची वाट बघत थयच उभो होतो. दाजी दिसताक्षणी त्येनी त्येका विचारुक सुरु केल्यान , ”दाजी, मगासपासून मरे तुझी वाट बघतयं. काय करी होतयं इतकोयेळ, आता एक काम कर, बांधार जा आणि शेताक पाणी लाय. जा, बेगीन जा.” तरी दाजी थयच घुटमळत होतो, तेका बघून भाऊ ओरडलो, ”दाजी ऐकलंस का नाय, काय सांगलय तां.” दाजीक जा बोलाचा होता, ता त्याा बिचार्‍याक सांगाक येवक नाय, तो तसोच आपलो मुकाट्यान पाणी लावक गेलो.

बरोच वेळ भाऊ दाजीची वाट बघत शेतार उभो होतो. दोघांका एकत्रच घराकडे परताचा होता, पण तास झालो, दीड तास झालो, दाजीचो पत्तो नाय, पाण्यायत पाय घसरान पडाक मिडाक नाय मा, असा भाऊक वाटाक लागला, तसो भियान भाऊ बांधार गेलो. “दाजी, दाजी” म्हणान भाऊ हाक मारीत होतो, आणि इतक्यात झुडुपापाठी लपलेलो दाजी तेका दिसलो. दाजीच्या हातात कसल्यातरी विषयाचा पुस्तक होता, तेका बघून भाऊ जो ओरडलो, दाजी थयच पुस्त्क टाकून उभो रवलो. “दाजी, इतको येळ झालो वाट बघतयं तुझी करी काय होतयं, आणि हता काय कोणाचा पुस्तक हता, तुका वाचुक येता” दाजी बावरल्यासारखो झालो, पण धीर करुन म्हणालो, ”भाऊ, माका शाळा शिकाची हाय हो, मी शेतातला कामय करतय, पन माका शिकानसारख्याह दिसता, तो दामोदर बगा मवो, आणि तेचो भाव तो तर शिकान आता साहेबावानी मिरयता, मग मी........” दाजीचा पुढचा बोलणा पुराच होवक नाय, भाऊची चार बोटा त्यातच्यान कानाखाली उमाटली, दाजी किंचाळलो, आणि तेका तसोच घेवन भाऊ घराकडे परातलो.

भाऊचा डोक्याद गरम झाला होता, हातीक धरून जो तो दाजीक ओढत घेवन इलो तो सरळ त्येच्या आईचया पुढयात टाकल्यान, “ माये, बग तुझो पोर कसले गोष्टीक करता, शाळा शिकाची आसा म्हणता, जा भितर जावन आरतीचा ताट घेवन ये आणि ओवाळ, अरे आजपावेस्तो शिकान कोणाचा बरा झालां, त्यात दामोदरच्या बापाशीकडे जमिन आहा, पैसो आसा, म्हाणान ती शिकतत, आमच्यारकडे नाय पैसो, तुझा शिक्षाण कसा पुरा होतला? अरे, शिक्शान पैसेवाल्यांनी घेवचा रे गरिबांका ता परवडना नाय.” तितक्याकत दाजी बोलाक लागलो, “पनं भाऊ, सरकारी शाळेत शिक्षण मोफत आसा, आनी पुढच्या शिक्षणाक स्कॉलरशिपय गावता, मगे. मीयापन शिकान साहेब जातलयं, आमच्याीकडे पण पैसो येतलो.” दाजी इतक्याी आत्मोविश्वासानं सांगू होतो, पण भाऊच्या आणि आईच्या मनार तेचो काय परिणाम जावक नाय. भाऊन तर कपळार हात मारुन कसलो मेल्याचो हटट या नजरेनं दाजीकडे बगल्याानं, दाजी तसोच उठान घरात गेलो.

दाजी रोज आपलो शेताच्या बांधार जावून नवीन नवीन पुस्तंक दामोदरकडसून घेवन ये, आणि दामोदरकडूनच वाचीक शिका होतो. भाऊक आणि दाजीच्या आईक तेचो पत्तोवच नाय होतो. दाजी आता शेतार खराच कामा करत असतलो, असाच ते समजा होते्, पनं एक दिवस भाऊ सहज म्हाणान शेताच्याा बांधार गेलो, बांधावरच्या लावलेल्या काजू कलमांच्यावर एक नजर टाकून तो परता होतो, इतक्यात त्येका दामोदरची सायकल दिसली. दामोदर काय करता, म्हणान सहज तेनी बघितल्यान, तर काय दाजी आणि दामोदर दोघय हातात पुस्तक घेऊन बसलेले, दामोदर तेका शिकव होतो, आणि दाजी शिका होतो, ता बघून मात्र भाऊ खराच शांत बसाक नाय, तेनी ताडकन दाजीक हाताक धरुन वर उचलल्यानं,” दाजी तुका सांगान पण कळना नाय मरे, अरे आम्हीन मर मर मरतो शेतार ता कोणासाठी, आणि तिया मात्र, अरे इतक्या वावर आसा तेच्यार लक्ष दी, तर तिया हय पुस्ततका घेवन बसलयं, आणि तिया रे दाम्याे तुकाय कळना नाय, बाबांका सांगू तुझया, दाजी असोच चल घराक.” म्हणान तेका नेता आणि घराच्याा खोलयेत बंद करता, दाजीच्या आईक सांगता, “दाजीक वायचं बरा शिकवचा म्हिटला तर तो आपला ताच खरा करुक चललो, नाय हयो जर असोच वागत असात, तर मी हयेचा तोंडपण बघूचय नाय, सांगून ठेवतय.”

दाजी त्यार दिवसाक खूप रडलो. भाऊनं त्या दिवशी दाजीच्या आईचापण ऐकाक नाय. पण दुपारी जेवच्यार वेळेक भाऊचो जीव मात्र कळवळलो. दाजीक तेनी खोलयेतसुन बाहेर काढल्यानं, आणि तेची समजूत घालत म्हणालो, ”हया बघ दाजी, अरे काय सांगतो ता ऐक, अरे शेतीभाती खूप आसा आमची, पण करणारा कोण नाय, शिवाय पदराक पैसो नाय, तेव्हाे तियाच आता तेच्यात लक्ष घालूक होयो, अरे ही तांबडी माती आपणांक पुढे पाठी उत्पन्न‍ मिळवोन देतली, हया ध्या नात ठेय, शिकान काय करुचा आसा, चल आता मुकाटयाने जेय, आनी माझयाबरोबर जोतार चल.” पण दाजी जेयलो, आणि तसोच उठानं पळत पळत बांधार गेलो, भाऊक कळाक नाय, काय झाला तां, तो त्येाच्या मागार जाय होतो, तर दाजीच्या आईनं तेका रोकला.

दाजी एकटोच बांधार बसान होतो, थयसून शाळेत जाणारी मुला तेका दिसा होती. तितक्यात थयसून शाळेचे मास्तर जाताना दिसले. ते तुकाराम मास्तार होते. दाजीक एकटोच थय बसलेलो बघून ते तेच्या्कडे इले, ”बाळ, नाव काय तुझं?”
“दाजी.”
"दाजी, अरे शाळेत जायच्यास वेळेला इथं का बसून आहेस?”
”मास्तर, मी शाळेत जात नाही.”
”शाळेत जात नाहीस? पण का? घरी कोण कोण आहे तुझ्या?”
”माझया घरात भाऊ आसंत, आणि माझी आई आसा, माका आणखी बहिण भाव वगैरे कोण नाय.”
"बरं, पण शाळेत का जात नाहीस ते सांगितलं नाहीस.”
”गुरुजी, भाऊ माका शाळेत पाठवक बघनत नाय. माकापण शिकाचा आसा हो, पण भाऊनी आणि आईनं सांगितल्याीनं शेतार कामाक जा, शिकान काय करुचा आसा.”
”अरे अरे अरे, दाजी काळजी करू नको, मी येतंय तुझया घराकडे तुझया आईला आणि भाऊंना समजावायला. जा, आता घरी जा.” मास्ततर घराकडे येवनं भाऊंका समजायतले म्हलणान दाजी खुश झालो, आणि घराकडे परातलो.

घराकडे भाऊ आणि दाजीची आई गोष्टी करत बसलेले होते. दाजी इलेलो बघताच भाऊन तेका इचारला, ”दाजी, पळत पळत खय रे गेल्लेय सांगाच्या आधी, जा आता खोलयेत जावन बस.” दाजी खोलयेत जावक वळलो, तसे भाऊ आणि आईचे गोष्टी दाजीच्याच कानार पडले. भाऊ सांगा होतो, ”सकाळी आना सुतार इल्लो, तेनी बातमी आणलेल्यान.”
दाजीची आई, ”कसली बातमी”
”अगो, तुझया चुलत काकाची गजाल. चेडवाक नाय होता बरां, डॉक्टरकडसून दाखवनं आणलेल्यानं, कसलातरी औषध सांगल्याानं ता तेनी घेतल्यानं, आणि चेडवाक दिल्यानं, ता घेतल्यानं, आणि पोरग्या कसातरीच करु लागला मगो.”
“अगो बाये, कसा हो?”
“अगो काय माहिती कसला औषध लिवनं दिला डॉक्टरांन ता, आधीच तेका काय लिवक वाचूक येना नाय.” दाजीच्यास ध्यानात हयो सगळो प्रकार इलो, पण तो काय बोलाक नाय चुपचाप खोलयेत जावन बसलो.

बरेच दिस गेले. उन्हााळो इलो, तशी शेतातली कामा परत सुरू झाली, भाऊनं आणि दाजीनं बरीच मेहनत घेवनं शेती फुलयली, पनं बांधावरचा पाणी आटला. आता पाणी कसा दिवचा हयेचो विचार भाऊ करूक लागलो, परत मागच्या वर्षासारखी परिस्थिती इली तर.... मागच्याय वर्षाक शेताक पाणीच गावाक नाय, आणि पाऊसपण चांगलो पडाक नाय, तेच्यासमुळे सोन्याासारखी पिका बावान गेली. भाऊक काय करूचा ता कळा नाय होता, पण दाजीनं खयसूनतरी बातमी काढली की, ग्रामपंचायतीत फॉर्म भरून दिलो काय पाण्यायची मशिन आणि पंपसेट वगैरे मिळता. दाजीनं ही बातमी भाऊक सांगितल्यान, तेव्हा भाऊ आणि दाजी ग्रामपंचायतीत गेले. ग्रामपंचायतीतसून फॉर्म घेतलो, पण फॉर्म भरूचो कसो तो कोणाक माहिती> भाऊन फॉर्म दिणार्‍याक इचारल्या्न, पण तेका काम होता, म्हणान तेनी दुसर्‍याकडसून भरून घेवक सांगल्यान.

भाऊ फॉर्म भरुच्यासाठी पुरो गाव फिरलो. गावात शिकलेला कोण तेका मदत करूक तयार नाय. प्रत्येयक जण कामात. जोश्यांच्या दामोदराक विचारला, तर तो शाळेत जावचो बहाणो करू लागलो. आता काय करूचा? भाऊक प्रश्न पडलो. भाऊक चिंतेत बघून दाजीन शेवटी तो फॉर्म आपल्याकडे घेतल्यायन. भाऊ चकित होवन दाजीकडे बघीत होतो, तितक्यांत दाजीनं पुरो फॉर्म भरल्यानसुद्धा. भाऊन दाजीक इचारला, ”दाजी, तुका बरो मरे फॉर्म भरूक इलो? खय शिकलंयं रे?” दाजी मनातल्या‍ मनात खूश झालो. शेवटी भाऊन एकदाचो तो फॉर्म भरून ग्रामपंचायतीकडे दिल्याान, आणि भाऊक मदत मिळाली.

भाऊक आता शिक्षणाचा महत्व हळूहळू कळाक लागलेला होता, पण पुरता उमागला नव्हता. असेच एके दिवशी तुकाराम मास्तर भाऊच्या घरी इले. भाऊक त्यांनी आपली ओळख करुन दिली. भाऊन त्येंका बसाक खूर्ची वगैरे दिली, इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर तुकाराम गुरुजींनी मूळ विषयार बोलाक सुरवात केली, “भाऊ, तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगण्यासाठी मी आलो होतो. भाऊ, तुमच्या मुलाला दाजीला तुम्ही शिकायला शाळेत का नाही पाठवत?”
”अवो गुरुजी, हया इतक्या वावर आसा, आणि शाळा शिकान काय करतलो पोरगो? हयच वायचं शेतात वावरलो, तर घरात अन्नपाण्याची तरी सोय होयतं.”
”चुकतायत तुम्हीे भाऊ. अहो, शिकूनच माणसं मोठमोठ्या पदावर आहेत, आणि दाजीलाही शिकण्याची खूप आवड आहे. असा गैरसमज करून घेऊ नका. अहो, उद्या दाजी शिकला, तर या तांबडया मातीत सोने उगवील, शिक्षणाचा उपयोग शेतीत करेल, म्हणून दाजीला शाळेत पाठवा, हेच सांगायला मी इथे आलो होतो.”
भाऊनं एकदा दाजीकडे बगल्यानं, दाजी आशेन भाऊकडे बघत होतो. शेवटाक भाऊ काय बोलना नाय तेच्यार दाजीनचं सांगाक सुरवात केली, “भाऊ, नाय म्हणू नका. ते दिवशी तुमचो फॉर्म भरूक कोण तयार नाय होतो, पण माका लिवक वाचूक इल्यामुळे तुमचो फॉर्म भरून दिलयं, आणि चुलत काकाच्याच चेडवाक काकान तारीख बघूच्या आधी औषध दिल्यान, म्हणान तेका त्रास झालो. ताच जर काकाक लिवक वाचूक येत असता तर........”

भाऊक आता पुरता कळान चुकला, आपल्यात तांबड्या मातीत सोना उगयणारो दाजीच आसा हयेची तेका खात्री पटली, आणि शेवटाक भाऊन दाजीच्याा शिक्षणाक होकार दिल्यानं, दाजी आनंदानं उड्या मारत मारत दामोदराकडे पळत सुटलो.

पुढे काय झाला, ता माहीत करुन घेवचा आसा मा, तर पुढे हयोच दाजी कृषी विभागात मोठ्या अधिकार्‍याच्या पदार काम करता, आणि तेनी शेतीक प्रगत करूच्यासाठी शासनाचे कितीतरी योजना गावागावात राबविल्यानं, आणि आता गावात तेका सगळे साहेब म्हणान हाक मारतत.
*************************
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 6:40 am | पैसा

कथा आवडली

प्राची अश्विनी's picture

25 Feb 2017 - 9:30 am | प्राची अश्विनी

+1

विनिता००२'s picture

25 Feb 2017 - 10:02 am | विनिता००२

छान . कथा आवडली

छान सकारात्मक कथा.भाषा गोड लागते वाचायला !

शलभ's picture

27 Feb 2017 - 10:13 pm | शलभ

+१

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 11:24 am | बबन ताम्बे

चांगले लिहिलेय .

छानच आहे, बाकिच्या भाषेपेक्षा मराठीला जवळची आहे.

नूतन सावंत's picture

27 Feb 2017 - 6:53 pm | नूतन सावंत

आवाडली हां माका तुमची गोष्ट.

अगदी शब्द न शब्द नाही समजला पण तरीही वाचायला मजा आली. :)

भिंगरी's picture

28 Feb 2017 - 12:19 am | भिंगरी

छान !

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2017 - 7:35 am | प्रीत-मोहर

सुंदर सांगल्यात हां काणी. आवाडली माका.

यशोधरा's picture

28 Feb 2017 - 7:42 am | यशोधरा

छान. आवडलां.

चांदणे संदीप's picture

2 Mar 2017 - 3:33 pm | चांदणे संदीप

चांगलं लिहिताय की समीरराव तुम्ही! :)

का ते खंड्याच्या मागे इतका टायम घालवला? असो, त्यानिमित्ताने... किलर खंड्याला एकदा भेट देऊन आलो. मस्त करमणूक झाली!

Sandy

चांदणे संदीप's picture

2 Mar 2017 - 3:35 pm | चांदणे संदीप

लिंक पण उडून चाललीये! =))