आपली कळकळ समजण्यसारखी आहे हे प्रथम नमूद करतो...
परंतु मत देऊ तर साला कुणाला देऊ? सगळेच सारखेच नालायक आहेत!
की तातल्या त्यात कमी नालायक असलेल्याला मत द्यावं असं आपल्याला म्हणायचं आहे?
अहो मत नक्की देऊ पण आज कोणता उमेदवार लायक आहे? देशाबिशाची कुणाला पडली आहे? प्रत्येक पक्ष हा पुढची ५ वर्ष आपल्याला खुर्ची कशी मिळेल आणि पुढील ४२ पिढ्यांची सोय कशी करता येईल याच चिंतेत मग्न आहे. अश्या परिस्थितीत या पैकी कुठल्याही पक्षाला मत देणं हा देशद्रोहच नव्हे काय?
आणि मिपा काय किंवा इतर पांढरेपेशा समाज काय, आपली संख्या मुठभरच आहे, आणि या राजकारण्यांना तुमच्याआमच्या सारख्या सुजाण, सुशिक्षित परंतु मुठभर लोकांच्या मतांची काहीही पडलेले नाहीये. आपण मत दिलं काय, न दिलं काय! त्यांना मत देणारे भरपूर आहेत. रातोरात लाख्खो रुपये वाटले जातात, साड्यावाटप होतं आणि मत मिळवली जातात..!
तात्या.
आहो तात्या आता पुण्याचेच उदाहरण घ्या ना. पुण्यात एकुण मतदार संख्येच्या ६५% टक्के मतदार सुशि़क्षित मध्यम वर्ग आहे. आणि मागे वाचनात आल्या प्रमाणे १५ लाख मतदारांपैकि जवळ्पास ८ लाख मतदारांनीच मतदान केले होते. मग अश्या परिशितीत आपण सुशिक्षित मतदार मुठ्भरच आहोत असे कसे बरे म्हणता येइल. पण आपल्या मतदान न करण्याच्या धोरणामुळे आपण मुठ्भर होत चाललो आहोत.
चांगला उमेदवार नसण्यावर मतदानच न करणे हा उपाय ठरु शकेल काय?
त्या पेक्शा खाली नमूद केल्या प्रमाणे "जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. हा पर्याय जास्त संयुक्तिक वाटतो. आपण काहीहि केले तरी खपते असा समज तरी रहाणार नाही ह्या साल्यांचा.
मिपा ही एक चळवळ आहे व ह्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक अभ्यासपूर्ण विशयान्ची मांड्णी व प्रबोधनाचा प्रयत्न आपल्या बहारदार लेखणीतून करत असतात. अनेक लेख वाचून तर सदस्यांच्या बुद्धिमत्तेचे आशर्य वाटते हेवा देखील वाट्तो.
इतकेच वाक्य आवडले !
बाकी, दर निवडणूकीला असे मुद्दे मतदात्यांच्या समोर येत असतात. आपणास नाउमेद करत नाही. किती पारखून घेतले, सद्सदविवेक बुद्धीने मतदान केले तरी निवडून आलेल्याचा रस्ता गटारीकडेच जातो असे वाटते. निवडून दिलेल्या उमेदवारास माघारी बोलावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
वर म्हटल्या प्रमाणे सगळेच नालायक आहेत मग कोणाला मत द्यायचे , तर जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. कारण जे नीवडुन येतात ते आपली तुंबडी भरण्या व्यतरीक्त काहीच करत नाहीत. जर परत नीवडुन यायचे असेल तर लोकांची योग्य कामे करावीच लागतात हा संदेश गेला पाहीजे.
अशाच प्रकारची एक योजना काही महिन्यांपूर्वी ऋषिकेश यांनी मांडली होती.
सुखवस्तू सोसायट्यांमधिल मतदार सुटीचा दिवस म्हणून तंगड्या पसरून आराम करीत असताना, शेजारील झोपडपट्टीतमात्र मतदानासाठी रांगा लागतात, हे दृश्य अपवादात्मक नक्कीच नाही!
"हे काय साले पैसे घेऊन एकगठ्ठा मतदान करतात", असे नकारात्मक विचार व्यक्त करण्यापेक्षा, आपण स्वतः मतदान करणे हे इष्ट. मुंबई परिसरातील अनेक भागांत मध्यमवर्गियांची संख्या लक्षणिय आहे. ह्या सर्वांनी जर का मतदानाकरिता रांगा लावल्या तर, उमेदवारांचे अंदाज/आराखडे आपोआप बदलून जातील.
तुम्हाला जर "त्यांचे" उमेदवार निवडून यायला नको असतील त्यासाठी "तुम्ही" मतदान करणे, हाच एकमेव उपाय आहे.
(मतदार) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असे नकारात्मक विचार व्यक्त करण्यापेक्षा, आपण स्वतः मतदान करणे हे इष्ट.
अहो पण कुणाला मतदान करणार? हल्ली सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेदवार नालायक आणि पैसेखाऊ असतात!
तात्या.
अहो पण कुणाला मतदान करणार? हल्ली सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेदवार नालायक आणि पैसेखाऊ असतात!
त्यातल्या त्यात जो बरा असेल (गुंडा ऐवजी चोराला, चोरा ऐवजी भुरट्या चोराला वगैरे) मत द्या. पुढच्या वेळेस त्याच्या विरुद्ध व्यक्तीस मत द्या. लोकशाही पेरायला सोपी असली तरी त्याचा वटवृक्ष होऊन फळे येयला वेळ लागतो. काही मतदानांनंतर राजकारण्यांच्या लक्षात येऊ लागेल की व्यावसायीक वर्ग पण मते देतो आणि त्यामुळे पंचाईत होऊ शकते. पण ते उद्याच होईल आणि ते ही आपण मत न देता असे म्हणायचे असेल तर ते शक्य नाही.
वरील पैकी कोणी ही नाही असे शेवटच बटन मशीनवर हवे. मागच्या वेळी ते नव्हते या वेळी ते हवे.
अगदी बरोबर पण नीवडणुका ह्या मतदारांच्या सोयी साठी नसुन भ्रष्टाचार करण्याचा परवाना मिळवण्यासाठी असतात त्यामुळेच कुठलाच पक्ष ही मागणी करत नाही.
हा पर्याय उपलब्ध आहे असे समजले तर निश्चीत पणे मतदानचे प्रमाण खुप वाढेल आणि ही वाढलेली मते ह्याच पर्यायासाठी असतील.
अगदी बरोबर पण नीवडणुका ह्या मतदारांच्या सोयी साठी नसुन भ्रष्टाचार करण्याचा परवाना मिळवण्यासाठी असतात त्यामुळेच कुठलाच पक्ष ही मागणी करत नाही.
हा पर्याय उपलब्ध आहे असे समजले तर निश्चीत पणे मतदानचे प्रमाण खुप वाढेल आणि ही वाढलेली मते ह्याच पर्यायासाठी असतील.
यू सेड इट! :)
पूर्णत: सहमत..
मतदान केलं पाहिजे, तो आपला हक्क आहे, ते आपलं कर्तव्य आहे, हे सगळं खरंच. पण लायक व्यक्ति तर हव्यात ना!
तात्या.
मतदानाला जाऊन 'मत रद्द करणे' /'ह्यापैकी कोणीही नाही' अशी काही (गुप्त) सोय अजुन नाहीय्ये का?
ते फॉर्म ४९ वगैरे खोटं आहे असंही मध्यंतरी वाचनात आलं होतं. आणि समजा, ते खरं असलं, तरी कोणता 'सुशिक्षित, पांढरपेशा' असा फॉर्म जाहीररित्या मागू शकेल? जरी मागितला, तरी मतदानाच्या ठिकाणी भिरभिरणार्या 'फुकटच्या बाजीराव' कार्यकर्त्यांना ही माहिती कळणार नाही का? कळाल्यास ते 'सुशिक्षित, पांढरपेशा' म्हणजेच त्यांच्या भाषेत 'डरपोक, बिनकण्याच्या' मतदारांना बदडल्याशिवाय राहतील का?
पुर्वीच्या शिक्के मारण्याच्या पध्दतीमध्ये एक फायदा तरी होता. सरळ दिसेल त्या प्रत्येक चित्रापुढं शिक्का मारुन मतपत्रिका बाद करुन टाकायची. ज्या वेगाने मतदानयंत्रांची उपलब्धता करुन देण्यात आली त्या वेगाकडे पाहता, ह्या पांढरपेशी बदललेल्या जनमताचा धोका उमजला म्हणुन ही चाल खेळली गेली की काय अशी शंका आल्यावाचून रहात नाही.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
सर्वानीच ह्यावर आत्मपरीक्शण करण्याची गरज आहे घरात बसण्यापेक्शा मतदान करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे हा मनाशी निश्चय केला पाहीजे . जोपर्यन्त ही जनजाग्रुती होत नाही तोपर्यन्त लायक व्यक्ती निवडुन येणारच नाहीत.
मतदान हे केलेच पाहिजे. जो घटनेनी दिलेला अधिकार आहे त्याचे पालन करणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य ठरते.
कोणाला करावे? हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. आत्ताच काश्मिर मधे ६५ % वर मतदान झाले. हा एक चांगला पायंडा आहे.जर काश्मिरला इतक मतदान होऊ शकतं तर रेस्ट ऑफ इंडियामधे त्याहुन जास्त व्हायला हवं...
महेंद्र
१. उमेदवाराची पार्श्व भूमी माहीत करुन घ्यवी.
अ] उमेद वाराचि पार्श्व भूमी माहित असणे गरजेचे..पण मत पक्षाला[पार्टी]
त्यांच्या ध्येय धोरणा कडे बघुन द्यावे..
ब] प्रादेशिक पार्ट्यांचे उमेदवार निवडुन आले तर घोडे बाजाराला उत येणार आहे
उमेद वार निवडि पासुन ते मतदार संघ, व एकुण निवडणुक प्रक्रीया हि जातिवर आधारीत आहे.. मतदार संघाचे विश्लेशण व रचना बघताना वर्तमान पत्रे सुध्धा आधि जात वार पहाणी करुन विजयाचे अंदाज बांधतात...उमेदवार जाहिर झाले कि अश्या वेळी रसवंति पाझरत असते.
गरीबि हटाओ..या मुद्यावर ४० वर्षे मतदान झाले..आता आतंक वाद हटाओ हा नारा आहे..व जो आतंक वाद हटवेल व मातृ भुमीवर होणारे अत्याचार थांबवेल अश्या पार्टीला मतदान करु यात..."अजुन हि मतदाराच्या नावासमोर खुण चिन्ह असते..याचा अर्थ मतदार साक्षर नाहि असा घ्यायचा का?..अविनाश"
"जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. हा पर्याय जास्त संयुक्तिक वाटतो. आपण काहीहि केले तरी खपते असा समज तरी रहाणार नाही ह्या साल्यांचा.
असे पुण्यात एकदा त्री होउन जाउदे
मी त्र व्र लिहिलेला म्ज्कुर फ्लेक्ष रुपात प्र्द्र्शित क्रावा असा विचार क्र्तोय.
प्रतिक्रिया
आपली कळकळ
आहो तात्या
हम्म
वर
पूर्वी...
असे
फॉर्म ४९ ओ?
अहो पण
वरील पैकी कोणीही नाही
वरील पैकी
अगदी बरोबर
वरील बर्याच जणांशी सहमत!
मतदान
मतदान हे
१.
पुर्ण्प्णे सह्म्त
हा मजकूर