.
काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का ?” मणूँ विचारली.
“ऑफ़कोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?”
“नाई, 1947 मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँटाकलं असंल की मणूँ मला वाटलं...”
तिज ते निरागस प्रश्न योच्ना करूँ मला हांसू आलं. “गाँधी जन्म देल्ते अहिंसाचं देशांत असंपणीं एक गडबड का ?” असं विचार केलों.
तजनंतरं मला सुचलं, असल्ते प्रश्न विचाराला चिम्मी येऊँ एक ल्हाँ पोरी नहो म्हणून... पांचवींत वाचते, इतिहासांत पाठ अस्ना का ? सुतंत्रम् मिळाला अमी ब्रिटिशांना माराचं आवश्य नाई, एवढं ल्हाँ विषय तिला कळ्लं पज्जे, नोहो का ?
चिम्मी कडे विचारलों.
“‘India's freedom struggle’ नांवांचं पाठंच वांचतोते बाप्पा, त्यांत्सूनंच हे डौट्ट आलं” मणाली.
“मण्जे? तुमचं मिस्स तुमाला आमी ब्रिटिशांना मारूँटाकूँ सुतंत्रम् मिळिवलो मणूँ शिकिवली काय ?”
“नाई बाप्पा...!” चिम्मी येऊँ डोकेंच बडिवूंगिट्ली.
“मग? तस्का विचारलीस?”
“मिस्स काय शिकविली तं येऊँ मला काईंच समजलं नाई, बाप्पा...! देशाला सुतंत्रम् मिळ्लं मणूँ समजलं. पण कसं मिळ्लं मंटल्त्रं, काय की समजेना...! मणूँ विचार केले, की बहुधा ब्रिटिशांना मारूँ सुतंत्रम् मिळिवले की काय की मणूँ...”
काहाणींत येणारं विल्लनाला, हीरो कसं मारूँ जिंत्तो की त्यास्कं ब्रिटिशांना मारूँ सुतंत्रम् मिळिवलो की काय की अमी, असं विचार करू लागली चिम्मी. तिचं विचाराला तिचं पुस्तकपणींईं तिचं शिकिवणारीपणींईं बदल्लं नाई.
आता हेजांतं कोणावर अपराध चूक सांगणे हाये?
.
--लेखक : श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन्
-------------------------------------- तंजावर मराठी बोलीतून काही लेखन वाचावयाची इच्छा असलेल्या, मिपावरील काही रसिकांच्या समक्ष वैयक्तिक विनंतीस मान देवून हैयो हैयैयो ह्यांनी लेखकाच्या मौखिक कथनाचे लेखन केले आहे. Dakshini Marathi या तंजावर मराठीला वाहिलेल्या यूट्यूब चॅनेलवर या लेखाचे अभिवाचन लवकरच उपलब्ध होईल. - ---------------------------------------
वाचने
35777
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुर्मिळ नमुना
+१
In reply to दुर्मिळ नमुना by पैसा
अग्गिदनांसींइनं म्हणजे
उच्चार असलेले रेकॉर्डिंग पाहिजे.
In reply to अग्गिदनांसींइनं म्हणजे by यशोधरा
मस्त!
अग्गिदनांसींइनं
धन्यवाद. :) मराठी कानडी
In reply to अग्गिदनांसींइनं by हैयो हैयैयो
पष्टक्लास ष्टोरी
वा !!!
+1
In reply to वा !!! by वरुण मोहिते
+१
In reply to वा !!! by वरुण मोहिते
+१११
In reply to +१ by अभिजीत अवलिया
काय सुरेख! ही लंपनची भाषा का?
नाही
In reply to काय सुरेख! ही लंपनची भाषा का? by प्राची अश्विनी
अतिशय सुंदर! फार छान वाटलं
फार मस्त
__/\__
मराठीची विविध रुपे पाहून भारी
तंजावर मराठी विषयी वाचावं अशी
खूप छान. अजून येउदे मणतो मी.
सुरेख!
सुरेख!
वेगळीच मराठी ! गोड वाटतेय
वेगळीच मराठी ! गोड वाटतेय
किती गोड भाषा आहे ही :)
सुंदर !! तंजावूर मराठीत लेख
माझ्यामते त्यावर लेख आला होता पहिले .
In reply to सुंदर !! तंजावूर मराठीत लेख by सूड
खुपच गोड वाटलं वाचताना. अजुन
छान!
मस्त गोष्ट
अगदी खरं आहे
In reply to मस्त गोष्ट by मित्रहो
अहाहाहा, कसलं सुंदर ते भासा,
मस्त भाषा..
मस्त वाटलं वाचायला.
आता दक्षिणी मराठी ऐकत बसलोय.
मागे ओक सरांनी तंजावुर मराठी पॉडकास्टबद्द्ल माहिती टाकली होती
धन्यवाद!
In reply to मागे ओक सरांनी तंजावुर मराठी पॉडकास्टबद्द्ल माहिती टाकली होती by धर्मराजमुटके
या पॉडकास्टचीच आठवण आली होती.
In reply to मागे ओक सरांनी तंजावुर मराठी पॉडकास्टबद्द्ल माहिती टाकली होती by धर्मराजमुटके
लेखन आवडलं
खुपच सुंदर.. अजुन वाचायला
खूपच छान !!!!
सर्व वाचकांना धन्यवाद!