मराठी भाषा दिन २०१७: आठोन (वर्हाडी)
.
जवा जवा मायी आठोन यीन तुले
तवा या अक्शराईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
मायासंगचे दिवस कंदीमंदी
येतीन भरुन तुया डोयामंदी
तवा त्या आसवाईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
काई नाई मायाजोळ ठूलं म्या
सूक-दुक, चेन-भूक, बांधून तुले देलं म्या
गाठोड्यात त्या सांभाळून ठूजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
मायी नाई झाली, कोणाची तं होशीन
मले नाई ठिक, त्याले तं खुश ठूशीन
काम पळलं काई तं सांगजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
जवा जवा मायी आठोन यीन तुले
तवा या अक्शराईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
.

वाचने
21123
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
भले!
मस्त.. आवडली.
साधी सोपी थेट....आवडली :)
मस्त
मस्तच..
आवडली.
वर्हाडीतली गझल वाचल्यासारखं
छान कविता !
छान !!
मस्त कविता !
मस्तच.
मस्त
मस्त लिहिली आहे!!
मस्त लिहिली आहे!!
सुंदर
भारी लिहली आहे. आवडली
आहा!
काळजाच्या जखमाईले कोनी कविता
वाह
सुरेख कविता.
छान
आवडली ...
कसलं डेंजर लिहू लागला बे
'वर्हाडीतली गझल वाचल्यासारखं
झकास!!
भाषा अजिबात कळली नाही, पण एक
In reply to भाषा अजिबात कळली नाही, पण एक by फेदरवेट साहेब
भाषा अजिबात कळली नाही, पण एक
वाह वाह ! छान च आहे की हे
छान आहे. आवडली.