Skip to main content

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 21/02/2017 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls… इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

वाचने 49426
प्रतिक्रिया 296

प्रतिक्रिया

तुम्ही सतत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन असता त्यामुळे तुमचे निकालपुर्व अंदाज वाचायला आवडतील.

In reply to by धर्मराजमुटके

माझे अंदाज या धाग्यात दिले आहेत. इथे पुनरावॄत्ती करीत नाही. ईंडिया टुडे - अ‍ॅक्सिस च्या अंदाजाप्रमाणेच झी-२४ तास ने देखील आपल्या मतदानोत्तर सर्वेक्षणावर आधारीत जागांचा अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार खालील परिस्थिती असेल. मुंबई - शिवसेना ९०-९६, भाजप ७८-८२, काँग्रेस २७-३०, राष्ट्रवादी ३-५, मनसे ७-९ ठाणे- शिवसेना ६०-६५, भाजप २०-२५, काँग्रेस ३-५, राष्ट्रवादी २८-३०, मनसे २-३ नागपूर - शिवसेना ४-६, भाजप ८४-८७, काँग्रेस ३४-३६, राष्ट्रवादी ४-६, मनसे ०-२ पुणे - शिवसेना १२-१७, भाजप ५५-६०, काँग्रेस १६-२१, राष्ट्रवादी ५५-६०, मनसे ६-११ दोन्ही वृत्तसस्थांचे अंदाज एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यात फारसा फरक नाही. माझे मत वेगळे आहे. महापालिका निवडणुकीचे यापूर्वी कधी सर्वेक्षण केले होते का याविषयी माहिती नाही. परंतु इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वक्षण करून अंदाज काढणे फारसे शक्य वाटत नाही. लोकसभा निवडणु़कीचा बराचसा अचूक अंदाज काढता येतो कारण त्या निवडणुकीत कोणताही एक मतदारसंघ घेतला तरी सॅम्पलमध्ये विविधता जास्त प्रमाणात असते. महापालिका निवडणु़कीत एखादा विशिष्ट प्रभाग म्हणजे काही जवळ्पासच्या गल्ल्या असू शकतात व तिथे राहणार्‍या नागरिकांमध्ये विविधता खूप कमी प्रमाणात असते. पुण्यात सदाशिव, शनिवार, नारायण इ. पेठांमधील प्रभागात सर्वेक्षण केले तर बहुतेक एकतर्फी अंदाज व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वेक्षण करणे हे एक धाडस आहे. वरील दोन्ही अंदाजावरून काही शंका येताहेत. नागपूरमध्ये जरी भाजपचे प्राबल्य असले तरी एखादी लाट असल्याप्रमाणे तिथे भाजपला संपूर्ण बहुमत किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त यश मिळेल असे वाटत नाही. मागील निवडणुकीत १५२ पैकी ६२ जागा भाजपकडे होत्या. त्यात फार तर १०-१२ जागांची भर पडू शकेल. परंतु ९० पेक्षा जास्त किंवा अगदी ११० जागा मिळतील यावर विश्वास बसणे कठीण आहे. मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसला तरी त्यांना तिथे २०१२ मध्ये १२ जागा होत्या. त्यात घट होऊन जेमतेम ३-६ जागा मिळणे इतकी अधोगती होईल असे वाटत नाही. ते पूर्वी इतकेच किंवा त्याच्या आसपास यश मिळवतील असे वाटते. पुण्यात सुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष नक्की होईल, परंतु पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही. अ‍ॅक्सिसच्या अंदाजानुसार जर भाजप व सेना या दोघांनाही ३२% मते मिळणार असतील तर अगदी अर्ध्या टक्क्याचा फरक सुद्धा किमान १०-१२ जागा इकडून तिकडे हलवू शकतो. त्यामुळे तिथे ठाम निष्कर्ष काढणे अवघड वाटते. बघूया उद्या काय होतंय ते.

प्रत्यक्ष निकाल येतात तेव्हा वेगळेच काहीतरी घडलेले असते. एका मित्राच्या फेसबुक वॉलवरून साभार -
ह्या # एक्झिट_पोल वर आधारित चर्चा म्हणजे, डिलीव्हरीसाठी बायकोला आत नेल्यावर हातात असलेल्या रिकाम्या वेळात मुलगा होईल का मुलगी हा अंदाज बांधून, बाळाचं नाव ठरवून.... त्या नावानी शाळेचा फॉर्म भरणाऱ्या अस्वस्थ बापासारखे उद्योग आहेत!! काढा की # कळ दोन दिवस....।।।।

In reply to by पैसा

=))

In reply to by अत्रुप्त आत्मा

अगदी अगदी! ह्या पोल्स चा जनतेला नक्की काय उपयोग आहे हे माहित नाही, पण उपयोगहीन कोणतीही गोष्ट माध्यमांकडून घडत नाही... शोधले पाहिजे

In reply to by संदीप डांगे

जनतेला उपयोग वगैरे काही नाही, ते पोल्सचे कार्यक्रम लोक बघतातकी मन लावून! मग टीआरपी मिळतो दुसरं काय? बहुतेक चॅनेल्स सेफ गेम खेळताना दिसतात. सगळ्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतात. चुकले तर सगळ्यांचेच चुकले त्यामुळे तुमच्यापेक्षा आमचं बरोबर वगैरे कोण बघत बसणार. राजकारणात इंटरेस्ट घेणाऱ्यांसाठी शुद्ध करमणुकीचा कार्यक्रम असतो असे मला वाटते.

In reply to by पैसा

=))

In reply to by पैसा

असं कसं, असं कसं ?! या दोन दिवसात घातला जाणारा धुमाकूळ जनता मोठ्या आवडीने पाहते आणि त्यामुळे वर गेलेल्या टीआरपीप्रमाणे टीव्हीवरील जाहिरातींचे दरही वर जातात... असे सुगीचे दिवस कोण चुकवेल ?! ;) =))

केवळ अंदाज - चुकू शकतात, बरोबर आल्यास अभ्यास करून अंदाज व्यक्त केल्याचा दावा केला जाणार नाही. पुण्यात भाजप – ६५ - ७०/ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ५०-६० / शिवसेना – २०-२५ /मनसे- ५-१० / अपक्ष-इतर - ०-५ पुण्यात मनसेला दहा हासुद्धा अगदी फारफेच्ड अंदाज आहे. मनसे पुण्यात नसल्यासारखीच होती. तुलनेत रिपाइं तरी भाजपसोबतच्या युतीमुळे नोटिस्ड झाली. यावेळी भाजप वि आघाडी अशीच निवडणूक झाली. शिवसेनेला केवळ पूर्वसंचितावर काही पारंपारिक जागा मिळतील. निवडणुकीनंतर शिवसेनेचा आधार महत्वाचा असू शकतो (भाजप-आघाडी दोघांसाठी) नाशकात मनसे इतक्या खाली जाईल असे वाटत नाही. (आबप-माझा चा अंदाज पत्रकारांच्य मतांवर ठरवलेला आहे). तिथला काहीच अंदाज नाही, पण मनसे तिथे असावी अशी इच्छा/ अपेक्षा आहे. मुंबईत भाजपा/शिवसेनेला परस्परांशी युती करण्यावाचून पर्याय नसेल.(नसलाच पाहिजे, मनसे/राष्ट्रवादी/कॉन्ग्रेसची साथ घेण्यापेक्षा त्यांनी परस्परांशी निवडणुकोत्तर युती करावी). ठाण्यात राष्ट्रवादीने भाजपला मागे टाकले तर आश्चर्य वाटेल. जिप/पंस मध्ये काँ-राकाँचा वरचष्मा राहील. नगरपालिकांप्रमाणे भाजपला तितकेसे स्पेक्टॅक्युलर यश मिळणार नाही. ** परत एकदा : हे सर्व अंदाज आहेत.

स्वतः केलेल्या कामांचा अहवाल दाखवून मते मागणाऱ्या मनसेला निवडणुकीत यश मिळाले असे वाटत राहते. विधानसभेला देखील राज ठाकरे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन डॉक्युमेंट दाखवत असतानाच भाजप-सेना यांचा काडीमोड झाला आणि सगळं फुटेज त्यांना मिळालं. निदान काहीतरी वेगळा विचार तरी त्यांनी मांडला आहे सातत्याने! मीडिया फक्त मारामारी भांडण यांनाच महत्व देतो असे वाटते. जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.

In reply to by शब्दबम्बाळ

जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.
याच्याशी प्रचंड सहमत! तसे होण्याची शक्यता कमी आहे तरी ते घडावेच असे वाटते. नाहीतर याचा अर्थ सरळ आहे, जनतेसाठी विकास आणि त्याची प्रचारातील मांडणी हा निवडणुकांच्या वेळी महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकांचा प्रचार आताच्या शिवसेना भाजपच्या प्रचारापेक्षा फार वेगळा नसेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

राज ठाकरे / मनसे पण निवडणूक लढवत आहेत हे खूप उशीरा कळाल्यासारखे झाले. त्यात त्यांची नाशकातली प्रतिमा म्हणजे "इतका दंगा करत होते तर नाशिक मिळवून काय दिवे लावले..?" अशीच होती. जर खरंच चांगले काम केले असेल तर सुरूवातीपासून तसा दंगा करणे आवश्यक होते. कितीही सॉलिड मुद्दे असले तरी, शेवटच्या चार दिवसात समोर आल्याने (आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड नुसार) ते चमकोगिरी वाटले असण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्यांचे मार्केटिंग कमी पडले.

माझ्या अंदाजाप्रमाणे... निवडणुक लढवलेल्या सर्व उमेदवारांमधून कोणी ना कोणी शंभर टक्के निवडून येणार आहे. लावा पैज! :-)

In reply to by संदीप डांगे

तुमचा अंदआहे१००% बरोबर आहे ! मात्र मी १०१% सांगतो की काही उमेदवार शिवसेनेचे, काही भाजपा, राकाँ, काँग्रेस आणि इतर पक्षांचे देखील निवडून येतील.

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अंदाज साफ चुकणार आहे ह्याची तुम्हाला अजिबात माहिती नाही, अभ्यास वाढवा आणि सुमडीत पारडे फिरवणार्‍या 'अपक्षां'नाही ध्यानात ठेवत चला...! =)) =))

In reply to by धर्मराजमुटके

पुढच्या प्रतिसादासाठी राखून ठेवला होता.. पण लहान मुलांसारखा उतावीळपणा करुन तुम्ही सर्व सोंगट्या उचलून खेळ बंद पाडला... 'मोठे व्हा' इतकंच म्हणेन! =)) =))

आत्ता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट व्हायला हरकत नाही. आता कोणता पक्ष कोठे बहुमतात येतो, कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर वैचारीक युती करतो आणि कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर चुंबाचुंबी आणि शय्यासोबत करतो ते पाहणे रोचक ठरेल.

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल लवकरच हाती येतील. "मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत" हे आज संध्याकाळी कोणकोण म्हणणार एवढेच बघायचे.

अमरावतीत भाजपच्या रिता पडोळे यांची बिनविरोध निवड, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे रवी लांडगे बिनविरोध

अगदी पहिले कल हाती आले आहेत. मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये तसेच सोलापूर जिल्हा परिषदेत प्रत्येकी एका जागेवर भाजप उमेदवार पुढे आहे.

पुण्यात भाजप २ जागांवर आघाडी. मुंबईत शिवसेना आणि भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे. अमरावती, सोलापूर, पिंचि मध्ये भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे. नाशिकमध्ये १ जागेवर राष्ट्रवादी आणि १ जागेवर अपक्ष पुढे नांदेड जिल्हा परीषदेत काँग्रेस पुढे. अशोक चव्हाणांचा प्रभाव चालत आहे असे दिसते.

मुंबई: शिवसेना ४ आणि भाजप २. माजी महापौर श्रध्दा जाधव आघाडीवर नागपूर, अमरावती, सोलापूर, पिंचि महापालिका: भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे नाशिक जिल्हा परिषदेत भाजप पुढे तर नांदेडमध्ये काँग्रेस पुढे.

पुण्यात राष्ट्रवादी ४ आणि भाजप ५ जागांवर तर काँग्रेस १ जागेवर पुढे. (एकूण १० ) पिंचि: शिवसेना ३ आणि भाजप १ मुंबई: शिवसेना ५ आणि भाजप २ (एकूण ७)

पुणे: भाजप ११, राष्ट्रवादी ५ आणि अपक्ष १ मुंबई: शिवसेना ६ भाजप २ ठाणे: शिवसेना १

मुंबई: शिवसेना ८ भाजप ३ काँग्रेस १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना २ भाजप १ पुणे: भाजप ११ राष्ट्रवादी ५ अपक्ष १

मुंबई: शिवसेना १२ भाजप ७ काँग्रेस २ इतर १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना २ भाजप १ पुणे: भाजप १२ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १

मुंबई: शिवसेना १५ भाजप १० काँग्रेस ३ राष्ट्रवादी १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप १३ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १ शिवसेना १ शिवसेनेने ठाण्यात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे. मुंबईत सध्या शिवसेना पुढे आहे पण एबीपीवर असे म्हणत आहेत की आतापर्यंतचे कल मध्य मुंबई (दादर, लालबाग इत्यादी) भागातून जास्त आले आहेत. अजून उपनगरांमधील तितके कल आलेले नाहीत. मनसेला फार प्रभाव दाखविता आलेला दिसत नाही.

मुंबई: शिवसेना १८ भाजप ११ काँग्रेस ५ राष्ट्रवादी १ इतर २ पिंचि: शिवसेना ४ भाजप ३ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप १९ राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १ नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २

मुंबई: शिवसेना ३१ भाजप २० काँग्रेस ६ राष्ट्रवादी २ मनसे २ इतर २ पिंचि: भाजप ५ शिवसेना ४ राष्ट्रवादी ४ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप २० राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १ इतर १ नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २ नागपूरः भाजप ७ आताचे चित्रः शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे. नागपूरमध्येही भाजप पुढे. नाशिकमध्ये मनसेला तितका प्रभाव दाखवता आलेला नाही.

राष्ट्रवादी ४ सेना ३ भाजप १ पुण्यात भाजप ने चांगली आघाडी घेतलीये

सध्याचे कल कायम राहिले तर अपेक्षेप्रमाणे मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष होणार. पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये भाजप पुढे. एकूणच चित्र असे दिसत आहे की जवळपास सर्व शहरी क्षेत्रांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता 'मार्जिनल प्लेअर' झाले आहेत. ठाण्यातील आणि नागपूरमधील कल का अडकले आहेत हे समजायला मार्ग नाही.

मुंबईत आता ४० जागांवर शिवसेना, २६ जागांवर भाजप, ९ जागांवर काँग्रेस, ३ जागांवर मनसे, २ जागांवर राष्ट्रवादी तर २ जागांवर इतर पुढे पुण्यात ४७ पैकी ३० ठिकाणी भाजप, नागपूरमध्ये १६ पैकी १५ ठिकाणी भाजप, नाशिकमध्ये २१ पैकी १२ ठिकाणी भाजप पुढे. विदर्भात भाजपने आपला गड राखला आहे असे म्हणायला हवे. मुंबईत मात्र शिवसेनेला मात देण्यात भाजपला यश येताना दिसत नाही.

मुंबईत शिवसेना आतापर्यंत अर्ध्यापेक्षा थोड्या कमी जागांवर पुढे आहे. दादर, वरळी या पारंपारीक बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे. पिंचिमध्ये आता राष्ट्रवादी पुढे गेला आहे. पुणे, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये भाजप आरामात पुढे आहे. ठाण्यात शिवसेना पुढे आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर येथे आतापर्यंतचे कल अगदीच एकतर्फी आहेत.

मुंबईत आता ११० पैकी ५६ जागांवर शिवसेना, ३२ जागांवर भाजप, १० वर काँग्रेस, ५ वर मनसे, ४ वर राष्ट्रवादी पुढे. शिवसेना निम्म्यापेक्षा जास्त जागांवर पुढे. पुण्यात ५७ पैकी ३० ठिकाणी भाजप पुढे ठाण्यात शिवसेनेहा जोर थोडा मंदावला आहे. ३३ पैकी १४ ठिकाणी शिवसेना पुढे नाशिकमध्ये २७ पैकी १७ ठिकाणी भाजप पुढे सोलापूरमध्ये १७ पैकी १० ठिकाणी भाजप पुढे नागपूरमध्ये २३ पैकी १९ ठिकाणी भाजप पुढे

आतापर्यंत मुंबईतील १४२ पैकी शिवसेना ७२ , भाजप ४०, काँग्रेस १४, मनसे ७, राष्ट्रवादी ५ आणि इतर ४ ठाण्यात ३६ पैकी शिवसेना १५, भाजप ८, राष्ट्रवादी ५ नाशिकमध्ये ३१ पैकी भाजप १८ नागपूरमध्ये २९ पैकी भाजप २० आणि काँग्रेस ९ पुण्यात ७१ पैकी भाजप ३८ आणि राष्ट्रवादी १५ मुंबईत शिवसेना स्वबळावर विजय मिळवायच्या मार्गावर आहे.

मुंबई महानगर पालिकेत, बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता असते?

In reply to by प्रसाद_१९८२

एबीपी माझा वर एकूण जागा २२७ दाखवल्या आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे.

नाशिक मध्ये मनसेची पिछाडी आश्चर्य कारक आहे . बहुधा माणसे चे बहुतेक नगरसेवक भाजपात गेल्याचा भाजप ला फायदा मिळाला असावा का ?

मुंबईत या क्षणी शिवसेनेला ८१ तर मनसेला १० जागांवर आघाडी आहे. काही जागांवर शिवसेना-मनसेमध्ये मतविभागणी झाल्यामुळे पिछाडी आली असेल ही शक्यता आहेच. मनसेला बरोबर घेतले असते तर कदाचित शिवसेनेने यापेक्षा अधिक नेत्रदीपक विजय मिळवला असता.

In reply to by गॅरी ट्रुमन

कारण प्रभाग छोटे असतात काही जागा लोक उमेदवार पाहून ठरवतात , आता मनसेला जागा सोडल्या असत्या आणि त्याच जागा निवडून आल्या असत्या मनसेच्या असं सांगता यात नाही . निश्चित आकडेवारी आली कि समजेल मतविभागणी कुठे झालीये .

ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर येथील निकाल अडकले आहेत गेल्या काही वेळापासून. समजत नाही काय चालू आहे ते.

In reply to by गॅरी ट्रुमन

गम्मत केली. बर्‍याच प्रभागांची मोजणी १:३० ला चालू होणार असे सांगितले आहे.

अत्यंत समाधानकारक निकाल येत आहेत. जवळपास 35 वर्षांनंतर सत्ता स्पष्ट पणे भाजप कडे जातेय. MIM ने 5 जागांवर विजय मिळवून चंचुप्रवेश केलाय. सुशीलकुमार शिंदे यांचा करिश्मा ओसरत आहे. भाजप 22 सेना 19 राकाँ 00 काँग्रेस 05 MIM 5

In reply to by मनिमौ

येस्स्स्स. प्रचंड आनंद झालाय. भाजपाच्या जवळपासच सेनेलाही जागा देऊन युतीची अपरिहार्यता दोन्ही पक्षांना लोकांनी जाणवून दिलीय. जास्त आनंद सुकुची एकाधिकारशाही अन सोलापूरकरांना गृहीत धरण्याची पध्दत संपल्याचा आहे. . सर्वाधिक आनंद मी अ‍ॅड आणि कॅम्पेनिंग डिझाईन केलेल्या पॅनेलला कम्प्लीट विजय मिळाल्याचा आहे. टोट्टल सगळे आले. . अजून एक चिल्लर आनंद आहे. सेनेच्या पराभवासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांचे थोबाड फुटल्याचा. बेटर लक नेक्श्ट टैम. ;)

कॉन्ग्रेस व राष्ट्रवादी कॉन्ग्रेस शहरी भागातून हळू हळू हद्दपार होतेय काय असा सूर हापिसकर्‍यांच्या बोलण्यात आहे. नाशिककर आहेत का कुणी? मनसेने प्रेजेन्टेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे खरोखर कामे केली होती का? असतील तर, मनसेचा दारूण पराभव दु:खद आहे.

In reply to by तुषार काळभोर

राजवर लोकांनी जो विश्वास दाखवला होता त्यात तो खरेच खरा उतरला नाही. अगदी पुण्यात सुधा मनसेने काही प्रभाव पाडला नाही २८ नगर सेवक असून. मगच्या वेळेला उत्साहाने मनसे ला मत दिले होते. पण नाणे खोटेच निघाले. आमच्या प्रभागात नगरसेवक मनसेचा पण कामे शेजारच्या वोर्डातला शिवसेनेचा नगरसेवक करायचा.

शिवसेनेचा बालेकिल्ला मुलुंडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! ६ पैकी ६ जागा भाजपला - नील सोमय्यासह!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आणि इस्ट ला २ पैकी सेने नंतर १ मनसे कडे .ह्या वेळी ईस्ट मध्ये मुलुंड मध्ये भाजप अली याच आश्चर्य आहे पण एक नगरसेवक जे १५ वर्ष सेनेचे होते ते भाजप कडे गेले त्यामुळे फायदा झाला . बाकी मुलुंड मध्ये सर्वपक्षीय समभाव आहे .तरी मुलुंड पूर्वेकडील जागा जाणे धक्कादायक आहे . त्याची कारणं वेगळी आहेत .

मुंबईत मतमोजणी सुरू होऊन आता जवळपास ६ तास पूर्ण होत आले तरी २२७ पैकी २०० जागांवरीलच कल उपलब्ध आहेत. उरलेले कल यायला इतका वेळ का लागत आहे हे समजत नाही. मुंबईत शिवसेनेला मात द्यायला भाजपला अपयश आले आहे. गेल्या अनेक मनपा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने जास्त जागा मिळवल्या आहेत. ठाण्याचा गडही शिवसेनेने राखला आहे. इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विदर्भात तीनही मनपा भाजप जिंकत आहे. नागपूरमध्ये तर स्वीपच आहे. अमरावतीमध्येही अर्ध्यापेक्षा जास्त आणि अकोल्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजपची आघाडी आहे. पिंपवडमध्ये पहिल्या क्रमांकासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस आहे. नाशिकमध्ये भाजपने अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त जागांवर भाजप पुढे आहे. तर पुण्यात आणि उल्हासनगरमध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजप पुढे आहे. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गजाचा गड ढासळताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीने पिंपवडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भाजपने मुंबईत मागच्यावेळेपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या असल्या तरी विजय मात्र मिळू शकलेला नाही. विधानसभा आणि आताच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एक गोष्ट नक्कीच जाणवते. युती तुटणे हे विशेषतः शिवसेनेला थोडे अधिक प्रगल्भतेने घेता आले असते. ठिक आहे युती होत नाही ना, आम्ही स्वतंत्र लढतो. ज्याला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री (किंवा महापौर) असे म्हणत एकमेकांवर टिका करण्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढविला असता तर आताची कटूता आली नसती. काचेला तडा गेला आहे आता परत तो सांधला जाणे फारच कठिण.

'स्वबळावर सत्ता स्थापन करु' अश्या बाता मारणार्‍या किंव्हा दैनिक सामना मधून 'जिंकणार तर आम्हीच!' असे बिनबुडाचे लेख लिहिणार्‍या उद्वव ठाकरेंना साधी तिहेरी संख्या देखिल गाठता आली नाही शिवाय शिवसेनेला मिळालेल्या जागा (८८) आणि भाजपा ला मिळालेल्या जागा (८०) या दोन्ही मध्ये फार काही फरक नाही, तेंव्हा शिवसेनेने युती तोडून स्वतंत्र लढण्याचा घेतलेला त्यांचा निर्णय भाजपाच्या अगदिच पथ्यावर पडला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला स्वत:ची निदान लायकी तरी कळली. आता कुणाचा तरी पाठींबा घेतल्याशिवाय शिवसेनेला मुंमपा सत्ता स्थापन करताच येणार नाही, फक्त पुन्हा युती करायच्या निर्णयासाठी भाजपाने सेने समोर हात पूढे करु नये म्हणजे झाले.

In reply to by प्रसाद_१९८२

आता तर ८४ आणि ८१ इतकाच फरक राहिला आहे. भाजपला ६० पेक्षा कमी जागा द्यायला निघाले होते हे. इतकी वर्षे युती असताना नेमका हाच प्रकार शिवसेनेने केलेला होता. अन्य एका चर्चेत म्हटल्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकसंग्रह जास्त उपयोगी पडतो आणि या दोन गोष्टींमध्ये शिवसेना इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पुढे आहे हे मुंबईतील कोणीही सांगू शकेल. शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनणार हे अपेक्षितच होते. पण फरक इतका कमी असेल असे वाटले नव्हते. वरच पोस्ट केलेल्या चित्रांमध्ये दोन पक्षांमधला फरक ३० पेक्षा जास्त होता. आणि शेवटी तो फरक ३ वर आला. शिवसेना पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे उधोजीराव डरकाळ्या फोडतीलच पण शिवसेनेची भाजपने पुरतीच दमछाक केली हे नक्कीच. तसेच इतर शहरांमधूनही भाजपची कामगिरी नक्कीच चांगली आहे. एकूणच भाजपसाठी हे निकाल नक्कीच उत्साहवर्धक आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

भाजप जश्या जागा मित्रपक्षांना देते तसेच आहे . सदाभाऊ खोतांचा मुलगा हरला . रिपब्लिकन कोण नाही, शेट्टी सोडून गेले . त्यामुळे भाजप सोबत अशीच वागणूक हवी. बाकी इतर शहरात अर्धे तर बाकीच्या पक्षातून आणि बाकी यश केंद्रात आणि राज्यात सत्तेत म्हणून त्यात नवीन काय . त्यात प्रचंड फायदा म्हणजे प्रस्थापित विरोधी राजकारण लाट .काँग्रेस ची मत मिळाली मुंबईत कित्येक ठिकाणी . बाकी २०-३० वर्ष सत्तेत असलं कि जागांचा कमी अधिक फरक पडतोच . पण भाजप च्या बाता ऐकून आज १ जागा जरी कमी मिळाली असती भाजप ला तरी मी आनंद साजरा करणार होतो . वाईन प्यावी म्हणतो:))

In reply to by गॅरी ट्रुमन

मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसेनेचा बालेकील्ला असलेल्या कोथरुड गावठाणात गेली २५ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या व चांगल्या कामांमुळे लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या शशिकांत सुतार यांच्या पुत्राची (पृथ्वीराज उर्फ दादा) भाजपच्या नवख्या उमेदवाराने पुरती दम्छाक केली. अ‍ॅड मिहीर (मनोज) प्रभुदेसाई हा राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला संघाचा कोथरुड भागातला स्वयंसेवक सुतांरांविरुद्ध उभा राहीला. सुतारांना ८००० मताधिक्य अपेक्शित होते तिथे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मनोज मागे पडलेला असूनही फरक काही केल्या २-३०० मतांपेक्षा वाढेना. दादा टेन्शन मधे आले पण अखेर ६०० मतांनी निवडून आले. त्या प्रभागात उर्वरीत सर्व जागा भाजपला मिळाल्या. सेनेचे खंदे कार्यकर्ते असलेले नवनाथ जाधव यांच्या सौ सेनेने तिकीट कापल्याने उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपकडे आल्या आणि तिकीट मिळाले. केवळ आणि केवळ भाजपची हवा असल्याने सेनेचा म्हणून परिचित असला तरीही आपलाच आहे म्हणून नवनाथच्या सौं ना लोकांनी मत दिले

इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे. ट्रुमन साहेब, मी मिपावरच एका चर्चेत म्हटले होते की अनेक पक्षांमधले अनेक लोक सध्या भाजपमध्ये जात आहेत. निवडून आल्यावर मात्र भाजपची टक्केवारी कशी वाढली ह्यावर भाजप-समर्थकांचा सगळा जोर असेल.. आपले वरिल वाक्य माझ्या म्हणण्याला दुजोराच देत आहे. सद्यस्थितीत कोणता पक्ष निवडून आला हे तांत्रिकदॄष्ट्या बघितले तर ओके .. पण पक्षांची लेबलं लावलेली माणसं बघून निष्कर्ष काढणे महत्त्वाचे. जे कोणी भाजप्च्या बॅनर खाली जिंकले त्याम्ची पूर्वजन्माची कुंडली काढणे आवश्यक आहे..

In reply to by संदीप डांगे

संदीप भाऊ... राजकारणाविषयी तुमच्या आणि ट्रुमन साहेबांइतका माझा अभ्यास नाही. पण "मासे गळाला लावणे" हा राजकारणाचाच एक भाग नाहीये का? भाजप ने साठ-सत्तर टक्के उमेदवार बाहेरून आयात केले असतील असं समजू पण त्यांचा ओरिजिनल पक्ष त्यांना थांबवू शकला नाही हे अपयश कोणाचे? उदाहरणार्थ :- नाशिकात माणसे ने उत्तम काम केले असं सगळे म्हणतात. मग राज ठाकरे आपल्या लोकांना सोबत घेऊन का राहू शकले नाही ? त्याचा फायदा जर भाजप ने घेतला तर राजकीय आणि संवैधानिक दृष्ट्या त्यात गैर काय ? भाजपचा हा विजय राजकीय पातळीवर आहे असे जेंव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्यात राजकारण हा भाग येतोच. राजकारणात कोणी कोणाचे नाही (जनतेचे तर मुळीच नाही !) हे वाक्य निरंतन सत्य आहे. आता भाजप/काँग्रेस/शिवसेना/राष्ट्रवादी आणि इतर सगळेच, ह्यांच्या नीतिमूल्यांवर चर्चा होऊ शकते. पण आजचा विजय हा भाजपच्या राजकारणाचा आणि त्यातील डावपेचांचा आहे हे तर मान्य करावेच लागेल.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब, भाजपच्या धोरणांना विरोध समजू शकतो. भाजप जिंकले हे दिलदार पणे मान्य करायलापेवढी अडचण का होते.

In reply to by अप्पा जोगळेकर

चिनार, आप्पा, तुमच्या दोघांच्याही प्रतिसादाला थोड्या वेळाने उत्तर देतो... माझ्याकडे आत्ता पूर्ण आकडेवारी आणि नावे आलेली नाहीत. तूर्तास, जर उद्या सगळे काँग्रेसी अगदी सोन्या-राहूल-सकट भाजपात दाखल झाले आणि शहा-मोदी जोडीला हाकलून (जसे आडवाणी-जोशींना हाकलले) स्वतःचे बस्तान बसवले (अर्थातच कायदेशीर, घटनात्मक राजकारणाचा वापर करुन) तर तेव्हा आपले विचार याबद्दल काय असतील?

In reply to by संदीप डांगे

जर तरचे माहीत नाही. तूर्तास फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले हे मान्य नसेल तर काय बोलायचे. नावडतीचे मीठ सुद्धा अळणीच असते ना.

In reply to by अप्पा जोगळेकर

जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला ब्रॉड व्ह्यू मध्ये उदाहरण दिले... नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो. लेबल बदलून फसवले तरी कोणाला आनंद मिळत असेल तर असो बापडा... कोणाला कशात आनंद मिळेल आपण कोण ठरवणार...

In reply to by संदीप डांगे

नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो. नावे देऊन काय होणार ? या निवडणुकीचे पडसाद मायक्रो लेव्हल ला उमटणार नव्हतेच. कोण नगरसेवक निवडून आला हे तितके महत्वाचे नाही. सगळ्याच पक्षांचे नगरसेवक गणंगच आहेत. या निवडणुकीचे पडसादच अधिक महत्वाचे आहेत. काहीसे 'वॉर इज लॉस्ट ऑर वन बाय जनरल्स नॉत बाय सोल्जर्स' तसे.