कोणती बाईक आणि मोपेड घ्यावी?
मी जवानीत रॉयल एन्फिल्ड ३५० वापरली आहे. खरे तर माझी अत्यंत आवडती गाडी आहे.
सध्या मी महाराष्ट्राबाहेर आहे आणि जुलै मध्ये परतणार आहे. त्यावेळी मला अर्धांगिनीसाठी एक मोपेड आणि माझ्यासाठी एक नवीन बाईक घ्यायची आहे.
शहरात वापरण्यासाठी कोणती मोपेड सध्या चांगली आहे?
बुलेट ३५० तर मनात आहेच, पण मला एका मित्राची अव्हेंजर क्रूझ १८०, फक्त दीपावली २०१६ मधील व फार फार तर १००० किमी वापरलेली बाईक ५०००० पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा गोंधळ आहे मनात.
दुसरा एक मुद्दा म्हणजे तीन वर्षांनी चिरंजीव सुद्धा लायसेन्स काढण्याच्या वयाचे होतील, तेव्हा आता घेतलेली मोपेड किंवा बाईक त्याला देता आली तर बरेच.. त्यामुळे चांगली मोपेड आणि बाईक सुचवा हि विनंती. रॉयल एन्फिल्ड ३५० आणि अव्हेंजर क्रूझ १८०,चे ऍव्हरेज खूप कमी म्हणजे ३५-४० आहे हे मला माहित आहे, त्यामुळे कुणी दुसरी बाईक सुचवली तरी चालेल. मुख्य वापर हा शहरात रोज २० किमी एवढाच आहे.. धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
२० किमीसाठी मायलेज बघू नका...
२० किमीसाठी मायलेज बघू नका...
लिंक द्या प्लिज
मी ***सारखी स्वतःच्याच
टक्या, बजाज अॅव्हेन्जर
अता सगळे निर्णय अर्धांगाला
काहीतरी गडबड आहे
स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ
घ्या हो. मग नक्की घ्या! म्या
Avenger बद्दल अजून माहिती
रस्ते खराब असतील तर अ
१५००० हजारात गिअरची हलकी सायकल घ्या
+१