बरेच दिवस मूगडाळ हलवा खायची इच्छा होत होती .
पण घरातली मुगाची डाळ संपली होती आणि नेमकी तेव्हाच मित्राला 'भारतीय वाण्याकडून मसूर आण' सांगितल्यावर त्याने अख्ख्या मसूराच्या जागी (उसळ करायला. हो, फार छान लागते) चुकून ढीगभर मसुरीची डाळ आणून गळ्यात मारली.
मग तिची विल्हेवाट लावायला 'मूग मसूर भाई भाई' म्हणत मसूरडाळीचा हलवा करायचे ठरवले.
श्रीमती तरला दलाल यांच्या मूगडाळ हलव्याच्या पाककृतीतल्या डाळ भिजवणे, वाटणे आणि त्यापायी सत्राशेसाठ भांडी खराब करणे वगैरे गोष्टींना फाटा देऊन साधी सोपी कृती अमलात आणली
साहित्य
एक वाटी मुगाची डाळ
एक वाटी साखर
एक वाटी तूप
एक वाटी चिकाटी/सहनशीलता (पेशन्स)
अर्धा वाटी दूध
शंभर ग्राम बदाम
सात आठ वेलच्या (पूड करून)
अर्धे जायफळ (किसून. मूळ कृतीत केशर सांगितले आहे. पण ते घरी नव्हते. नसायचेच)
टीप: चित्रात तूप आणि साखर वर नोंदवलेल्या प्रमाणापेक्षा कमी घेतलेले दाखवले आहे. पण हलवा बनवायला लागल्यावर तो माझा भाबडेपणा होता हे लक्षात आले. तदुपरांत, प्रसरणशील कमरेला 'नक्की कार्डीओ करेन पुढच्या आठवड्यात' वगैरे (भोळी) वचने दिली आणि झक्कत अख्खी एक-एक वाटी तूप आणि साखर घातली.
कृती
मूळ कृतीत सांगितल्याप्रमाणे डाळ तीन-तीन तास भिजवायला वेळ नसल्याने, अगदी थोड्या पाण्यासह डाळ कुकर मध्ये घेतली आणि अतिशय कमी आचेवर शिटीसकट गरम करायला ठेवली
पाणी कमी असणे महत्वाचे आहे कारण हलवा बनवताना ह्याच पाण्याचे बाष्पीभवन करायचे आहे.
एक शिटी होईल ना होईल इतपत वाफ देऊन गॅस बंद केला. साधारण दहाएक मिनिटे.
डाळ छान खुलून पिवळी, फडफडीत झाली.
थोडी कच्ची राहिली तरी हरकत नाही.
नंतर त्याच कुकर मध्ये तूप घेऊन डाळ परतायला सुरवात केली.
ह्याच वेळी वाटीभर चिकाटी गरजेची आहे. कारण हे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम आहे.
पण कठीण मुळीच नाही.
डाळ भांड्याच्या बुडाशी चिकटणार नाहीशी झाल्यावर दूध घातले, जे पटकन मिसळून गेले.
पुढे त्यात वेलचीची पूड आणि किसलेले जायफळ घातले आणि सरतेशेवटी साखर घातली
साखर आधी घालू नये कारण ती जळण्याचा संभव आहे.
मग डाळ परतत ठेवली नि हवा तसा रंग आणि ढवळायचा कंटाळा आल्यावर गॅस बंद केला.
हलवा भांड्याला चिकटेनासा झाला पाहिजे.
फोडलेल्या (चिरलेल्या नव्हे) बदामांनी सजवून पेश है - मसूर दाल हलवा
दिसायला पुरणासारखा 'वेष बावळा' असला तरी चवीला अगदी मुगाच्या डाळीच्या हलव्यासारखाच!
दोन खवय्ये/ चार आम आदमींना सहज पुरेल.
ता. क:
बदाम फोडायची सोपी कृती -
एक दणकट मग घ्या.
नाजूक वा पाहुणे आल्यावर काढायचा असतो त्यापैकी कप नको.
'जुम्मा चुम्मा दे दे' मध्ये अमिताभने धरला होता तसा मजबूत हवा.
बशीत/ कापफळ्यावर (चॉपिंग बोर्ड) बदाम पसरून ठेवा.
मग मग आडवा (त्याचे तोंड समोर होईल असा) धरून एका बदामावर मोहर (निळ्या शाईचा स्टॅम्प) उमटवायला वापरतो तितुका जोर लावून फटका मारा.
जास्त जोर नको मग,बदाम,बशी ह्या पैकी काहीही तुटेल.
उचितजोर फटका मारलात कि बदाम तुटून त्याचे छोटे तुकडे होतील.
मग काय, मग उचला आणि सुरु व्हा - एक बदाम, एक फटका
शंभरेक ग्राम बदामांना पंधराएक फटके पुरेत.
सजावटीसाठी बदाम तुकडे एका मिनिटाच्या आत तयार!

वाचने
11742
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे !!!
पहिल्यांदाच पाहतिये ही पाकृ.
दर्दी पाक क्रुती
साहित्य
आमचापण सूड. कवितेवर.
In reply to साहित्य by सूड
अंगत पंगत वरच्या सुरंगा दातार
In reply to आमचापण सूड. कवितेवर. by आषाढ_दर्द_गाणे
(No subject)
In reply to अंगत पंगत वरच्या सुरंगा दातार by सूड
अंगत्पंगत नामक पेज आहे चेपुवर
In reply to (No subject) by आषाढ_दर्द_गाणे
आमचापण सूड. कवितेवर.
In reply to आमचापण सूड. कवितेवर. by आषाढ_दर्द_गाणे
पाककृती मस्तय... पण
मस्त लिहिता ओ तुम्ही!
पण मधेच हिट्विकेट होता
In reply to मस्त लिहिता ओ तुम्ही! by पैसा
मुगाचीमसुरीची असे लिहायचे होते. रिव्हर्स स्वीप मारताना हिटविकेट! तरी नशीब फोटो नीट दिसतायत ह्या वेळी. समाधीचे माहित नाही, पण निद्रादेवी नक्की प्रसन्न होते! तूप, साखर आणि जायफळ एकत्र खाल्ल्यावर अजून काय होणार म्हणा...आषाढ, थंडी गेली आणि हलवा आता
मुग डाळीचा हलवा....
मसूर डाळ खुश झाली असेल कुणी
काही कळले नाही
In reply to मसूर डाळ खुश झाली असेल कुणी by नूतन सावंत
मायक्रोवेव्ह रे. मावा नाय..
In reply to काही कळले नाही by आषाढ_दर्द_गाणे
आयला जबरीच! कभी करके देखता
छान