ख्ररी गुडीशेव डाळीचे (बेसन)पिठ आणि गुळापासून बनवतात.
पण आजकालच्या भेसळीच्या दिवसांत त्यातही साखर (व / किंवा) मक्याचे पिठही मिसळतात.
अवांतरः कोणि (कोणी) मला सांगु(सांगू) शकेल का कि (की)'गुडिशेव ' (गुडीशेव )कशापासुन बनवतात? साखर कि(की)गुळ??
ताई, मला पाकक्रुती येत नाही. पण मी अनेक यात्रांमध्ये गुडीशेव खाल्ली आहे. मी ती भेसळ आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. भेसळीची गुडीशेव सध्या रू. १०/- पावशेर आहे आणि पिवर रू. १५ ला पाव आहे.
सटाण्याला (ता. बागलाण, जि. नाशिक) देव मामलेदार यशवंतराव चव्हाण महाराजांची मोठी यात्रा भरते. लहान असतांना तेथे खाल्लेली गुडीशेव अजुन आठवते. पुर्वी गुडीशेव आणि रेवडी हाच खाऊ असायचा. यात्रेत मोठ्या कुस्त्या लावण्याआधी आम्हा लहान मुलांच्या कुस्त्या खेळवीत. त्यात बक्षीस म्हणून गुडीशेवेचा पुडा देत. मजा येई.
जुन्या आठवणींना उजाळा देवू दिल्याबद्द्ल धन्यवाद.
-( ग्रामीण वातावरण प्रेमी सणकी )पाषाणभेद
" देव मामलेदार यशवंतराव चव्हाण""
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण की भोसेकर कि कुलकर्णी? यांचे एक वंशज माझे स्नेहि आहेत, आणि त्यांचे आडनाव भोसेकर आहे म्हणुन विचारले.. यांच गंगा घाटावर एक मंदीर आहे....
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण ???
आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण हे भोसेकर. इंग्रजांच्या काळात सटाणा प्रांती ते मामलेदार होते. दुष्काळात त्यांनी धान्याचे कोठार गरीबांसाठी खुले केले होते. नंतर सरकार ने चौकशी केल्यावर ते जसेच्या तसे भरलेले आढळले. ते सटाण्याचेच "उपासनी महाराज", साईबाबा, गजानन महाराज यांचे समकालीन होत. त्यांच्या गाठीभेटी होत असत हे उल्लेख येतात.
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण यांची समाधी नाशिक येथे गोदावरी घाटावर आहे. तेथे पण मंदिर आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध नाही.
जय हरी विठ्ठल !!
अवांतर : "जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात."
देवाची भरते ती यात्रा आणि तमाशाची जत्रा (मौज्-मजा). आम्ही यात्रेला जायचो. (उदा. पंढरपूरची यात्रा आदी.)
-( सणकी )पाषाणभेद
प्रतिक्रिया
ख्ररी गुडीशेव...
यात्रा की
असे पदार्थ
धन्यवाद..
" देव
संबंध?
गुडीशेव
ह्या वरुन
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण
हे देवमामलेदार प्रकरण काय आहे
Ghoti mde kadhihi yaa &
गुडीशेव