भेळ पुराण ...
मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा... बाय डिमांड वरून पुन्हा थोडी खजूर चिंचेची चटणी , सिझन असेल तर थोड्या कैरीच्या बारीक फोडी आणि हि स्वाहा करायला चमचा म्हणून दिलेली पाणीपुरीची कडक पुरी (खरा खवय्या हि पहिल्याच घासाला भेळे बरोबरच खाऊन टाकतो आणि भेळवाला मराठी असला तरी "भय्या ऑर एक पुरी देना" म्हणून हक्काची असल्या सारखी अजून एक पुरी मागून घेतो आणि मग ती सुद्धा कशी बशी दोन घासच टिकवतो आणि उर्वरित भेळ मुकाट्याने कागदी चमच्याने खातो ;) ) ... वाsss .... हि सुद्धा चविष्ट आणि अप्रतिम असते (च असे नाही पण ;) ) फक्त या गोष्टी योग्य ठिकाणी खायला हव्या ... पुण्यातील आजून एक भेळ म्हणजे मटकी भेळ ... जाड भाजके पोहे , १ नंबर शेव ,काळे मीठ ,खारेदाणे ,बुंदी , नायलॉन पोह्याचा चिवडा , कांदा कोथिंबीर ,झणझणीत मिरीचीचा ठेचा , ( काही ठिकाणी कांदा लसून चटणी सुद्धा ) फक्त जीरापुड ,धनापूड ,हळद मीठ घालून उकडलेली मटकी ,कुठे कुठे त्यात समाविष्ट असलेले हरबरे हे सगळे एकत्र करून ,लिबू पिळून छान कालवून घ्यायचे त्यावर वर पुन्हा प्रेमाची बारीक शेव आणि आनंदाचे चार खारे शेगदाणे आणि बुंदी , मग कोथिंबीर भूभूरून ग्राहकाच्या हातात द्यायचे आणि मग आपण ते कागदी चमच्याने मिटक्या मारत स्वाहा करायचे ... वाsss !! यात पुन्हा निवडीचा अधिकार म्हणजे फरसाण भेळ हवी का चिवडा भेळ ... सांगली ची भेळ आजून वेगळी म्हणजे भडंग भेळ हि पण जबऱ्याच आवर्जून आस्वाद घ्यावा अशीच ... प्रत्येक खाण्याच्या पदार्थाला चव आणण्यात भर घालते ते तिथले पाणी , प्रत्येक गावचे पाणी वेगळे त्यामुळे पदार्थाला चव हि वेगळी ... प्रत्येक गावाची एक वैशिष्ट्य असते , सांगलीला ची भेळ सांगलीतच छान वाटेल पुण्यातील पुण्यातच आणि कोल्हापूर ची कोल्हापुरातच . बनवणारी व्यक्ती वेगळी , हाताची चव वेगळी . त्यामुळे एकंदरीत खाणे या प्रकाराला च प्रांतवादात अडकवू नये असं मला वाटत
इति श्री भेळ पुराण अध्याय पहिला समाप्त !! :) :) -- सौरभ पारखे :)
वाचने
7732
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्या
+१११
In reply to श्या by फेदरवेट साहेब
लेखन आवडले. अध्याय दुसरा कधी
मुरमुरे ,त्यात चुरलेल्या
पत्ता द्या
चांगलं लिहिलंय
मटकी भेळ नुकतीच सरसला खाण्यात
एका मुंबई भेळेच्या
झटका भेळवाले काका आता नाहीत,
In reply to एका मुंबई भेळेच्या by गवि
तुम्ही कुठेही भेळ खा, कितीही
पुण्यातल्या काही...
विदर्भवाले
सोलापूर ची भेळ
आतापर्यंत विविध ठिकाणी
In reply to सोलापूर ची भेळ by मनिमौ
प्रिय गविकाका (असे मला एका
In reply to आतापर्यंत विविध ठिकाणी by गवि
बाब्बौ.. महिन्याभराचा बेत
In reply to प्रिय गविकाका (असे मला एका by अभ्या..
आमच्या एका सोलापुरी मित्राकडून ....
In reply to प्रिय गविकाका (असे मला एका by अभ्या..
सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची
In reply to आमच्या एका सोलापुरी मित्राकडून .... by तुषार काळभोर
आता तर फारच टेम्पटेशन झालं.
In reply to सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची by अभ्या..
तेर्,नळदुर्ग, कुडाळसंगम,
In reply to आता तर फारच टेम्पटेशन झालं. by गवि
ऑफकोर्स.
In reply to सोलापूर ची भेळ by मनिमौ
दिवेकर
दिवेकर राहिलेच. :(
In reply to दिवेकर by मनिमौ
छान वर्णने
फार फार पूर्वी पार्ल्यात
In reply to छान वर्णने by तिमा