तो वेडा आहे !
आजपर्यन्त जितक्या वेळा मी माझ नाव ऐकलं नसेल त्याहून जास्त वेळा मी हे वाक्य ऐकलं आहे. वेडा! वेडा! वेडा!. कधी कधी वाटतं हेच आपलं नाव आहे का? नाही..नसावं. आईने कधीच मला या नावाने हाक मारल्याच आठवत नाही. कधी कधी बाबा वैतागून म्हणतात.पण लगेच आई त्यांना रागावते. माझा दादा पण नावानेच हाक मारतो. पण मग बाकी सगळे मला वेडा का म्हणतात. लहानपणी वर्गातल्या बाईंनी वेडा म्हणून मला वर्गाबाहेर काढलं. नंतर मुख्याध्यापक बाईंनी शाळेबाहेर काढलं. म्हणाल्या की कोणत्याच विषयात याची प्रगती नाही. खरं म्हणजे चित्रं चांगले काढायचो मी...अजूनही काढतो. तर म्हणाल्या की चित्रकला हा काही विषय नाहीये. मग शाळेत शिकवतात कशाला ? मग चित्रकलेचे सर सुद्धा वेडे आहेत का ? काही कळत नाही. आता मी दिवसभर घरीच असतो. घरात बसून कंटाळा आला की मी आंगणातल्या जिन्यावर जाऊन बसतो. येणारे जाणारे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. त्यांच्या मुलांना सांगतात," ऐ तो वेडा आहे. जवळ जाऊ नको." माझ्या जवळ येण्याने काय होतं? कळत नाही. आई म्हणते तू त्यांना त्रास नको देऊ. म्हणजे ते असा करणार नाहीत. मी रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्यांकडे बघून हसतो. हसणं म्हणजे त्रास देणं होतं का ? काही मुले माझ्या दिशेने दगड फेकून मारतात. कधी कधी लागतो मला. कोण कोणाला त्रास देतंय? गल्लीतली मुलं क्रिकेट खेळत असतात. ते मला ब्याटिंग आणि बौलिंग काहीच देत नाहीत. तरीपण सगळे मला 'सचिन' म्हणतात. नालीत वैगेरे चेंडू गेला तर मला काढायला लावतात. मला सचिन म्हटलेलं माझ्या दादाला आवडत नाही. तो त्यांच्यासोबत खेळत नाही. मलापण खेळू नको म्हणतो. पण वेडा म्हणून घेण्यापेक्षा सचिन चांगलंय ना म्हणून मी खेळतो त्यांच्यासोबत.
दादा चांगला आहे. खूप गप्पा मारतो माझ्यासोबत. शाळेतल्या गोष्टी सांगतो.पाणीपुरी खायला घेऊन जातो. मला शाळेत न्यायची त्याची इच्छा असते. पण आई नाही म्हणते न्यायला. आई मला घरीच शिकवते. बेरीज, वजाबाकी करता येते मला. भागाकार,गुणाकार कठीण वाटतात. पण प्रयत्न करतो मी. मागे एकदा आईने साखर आणायला दुकानात पाठवलं मला.
दुकानातले काका म्हणाले," २२ रुपये किलो साखर आहे. चार किलोचे ९० रुपये झाले."
१० रुपये वापस केले १०० ची नोट दिल्यावर. मी गुणाकार केला तर ८८ येत होता.पण त्यांनी ऐकलं नाही.
म्हणाले, " तुला गुणाकार येत नाही."
घरी आल्यावर आईला विचारलं तर म्हणाली तुझा गुणाकार बरोबर आहे. पण मग ते काका असं का म्हणाले? संध्याकाळी दादा रागारागाने त्यांचाकडे गेला.
तर ते म्हणाले ," मी पूर्ण पैसे दिले होते. तुझ्या भावाने २ रुपयांचं काय केलं मला काय माहिती?"
मी कशाला काही करणार २ रुपयांचं ? आईच्या डोळ्यात पाणी आलं हे ऐकून.
मी म्हणालो,"आई रडू नकोस. मी २ रुपये आणून देईल तुला."
आई अजूनच रडायला लागली.
म्हणाली," २ रुपये नको आहेत रे बाळा मला." !!
खरं म्हणजे माझ्यासाठी पुरणपोळी करायलाच आईने साखर आणायला पाठवलं होतं. मी खाल्ली पुरणपोळी. छान झाली होती. पण का कोण जाणे आई ने खाल्लीच नाही !
क्रमश:
वाचने
6005
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सुंदर सुरूवात !
विदर्भाकडे साखर वापरून
In reply to सुंदर सुरूवात ! by डॉ सुहास म्हात्रे
आमच्याकडे गुळ वापरून
In reply to विदर्भाकडे साखर वापरून by चिनार
आमच्याकडे पुरण वापरून
In reply to आमच्याकडे गुळ वापरून by रामपुरी
म्हणून
आणि मी कधीच साखरेची पुरणपोळी
In reply to म्हणून by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
चिनार साहेब
मनोविकार तज्ञ
In reply to चिनार साहेब by सुबोध खरे
पण काय मस्त कमवतात हो ते.
In reply to मनोविकार तज्ञ by कपिलमुनी
खूप छान आणी भावस्पर्शी.. कधी
(No subject)
In reply to खूप छान आणी भावस्पर्शी.. कधी by खटपट्या
अतिशय सहमत
In reply to खूप छान आणी भावस्पर्शी.. कधी by खटपट्या
+१११११११११११११११११
In reply to खूप छान आणी भावस्पर्शी.. कधी by खटपट्या
भावस्पर्शी
सुरेख लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }अप्रतिम लेखन!
+१ असेच म्हणतो. पुभाप्र.
In reply to अप्रतिम लेखन! by बहुगुणी
भावली कथा..
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
सुंदर आहे कथा. पुढचे भाग सलग
सुंदर कथा
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
आह!
ह्या विषयाचा पुढील भाग मनात
In reply to आह! by पैसा
हम्म...
In reply to ह्या विषयाचा पुढील भाग मनात by चिनार
खूपच छान. आवडली.
सुरेख कथा. पु.भा.प्र.
मी गुळाची आणि साखरेची अशा
जीव गलबलतो वाचताना..
कथा आवडली.... लिहित राहा
:(