अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले,
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली..
स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली ..
ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली ..
रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली
जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळयात आसवांची दाटी घडून आली
कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली ..
मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1484
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
लयीची समज ठीके
अर्थात?
In reply to लयीची समज ठीके by संजय क्षीरसागर
अप्रतिम..
वा!
वाह!! क्या बात है !
छान आहे, आवडली कविता!
उत्तम शब्दरचना