✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयर्न नन - सिस्टर मडोना ब्युडर

म
मोदक यांनी
गुरुवार, 01/19/2017 - 02:01  ·  लेख
लेख
. ८६ वर्षाची एक (तरूण!) आजीबाई आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भाग घेते आणि यशस्वीरीत्या "आयर्नमॅन" होते..!! हे वाचून डोक्याला झिणझिण्या आल्या ना..? बादवे, आयर्नमॅन ट्राएथलॉन म्हणजे ४ किमी पोहायचे, नंतर १८० किमी सायकल चालवायची आणि सर्वात शेवटी एक ४२ किमीची मॅरेथॉन धावायची. बस्स इतकेच, फक्त हे सगळे १७ तासात पूर्ण करायचेच..! ..तर या आज्जींनी८६ व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. अरे हो, आणखी एक. हे त्या आजीबाईंचे ४५ वे आयर्नमॅन विजेतेपद होते. म्हणजे या आधी ४४ वेळा "पोहणे + सायकलिंग + मॅरेथॉन" यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. तसेच यांनी आत्तापर्यंत तब्बल ३२५ वेगवेगळ्या ट्राएथलॉन स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. अशा जबरदस्त लोकांपुढे आपण फक्त साष्टांग नमस्कार घालायचा. बस्स..!! . या आहेत सिस्टर मडोना ब्युडर, वय वर्षे ८६. या एक कॅथलीक सिस्टर आहेत. शरीर, आत्मा आणि मनाशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे व्यायामप्रकार यांच्या दैनंदिन वेळापत्रकातला आनंदाचा भाग आहे. या सातत्याचाच परिपाक म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर यशस्वीरीत्या जिंकलेल्या ट्राएथलॉन स्पर्धा. वयाच्या ४८ व्या वर्षानंतर धावणे सुरू केले, त्या दिवसापासून आता ८६व्या वर्षापर्यंतचा हा प्रवास निव्वळ स्वप्नवत आहे. अर्थात हा प्रवासही सोपा नव्हता. एक दोनदा आयर्नमॅनसाठी वापरल्या जाणार्‍या खास सुटचा प्रॉब्लेम झाला व स्पर्धा सोडावी लागली. एकदा सेकंदातल्या शतांश भागाच्या फरकामुळे विजेतेपदाने हुलकावणी दिली. २०१३ साली बोस्टन मॅरेथॉन दरम्यान या फिनीश लाईन पासून दीडदोन किमी दूर असताना तेथे बाँबस्फोट झाला. वयाच्या ८२ व्या वर्षी ट्रेनिंग दरम्यान अपघात होवून खुबा फ्रॅक्चर झाला. (मात्र सहाच महिन्यात त्या पुन्हा पुढच्या ट्राएथलॉन साठी सज्ज झाल्या होत्या.) या सर्व अडचणींना यशस्वीपणे तोंड देवून आणि अडचणींवर मात करून आजीबाईंचा प्रवास सुरूच आहे..!! . . . अरे हो या आज्जीबाई सिनीयर ऑलिंपीयन सुद्धा आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये, विशेषतः आयर्नमॅनमध्ये यांच्या वाढत्या वयानुसार अनेक नवीन "एज-ग्रूप" वाढवावे लागले. तेंव्हापासून यांना सगळेजण "आयर्न-नन" म्हणून ओळखतात. यांनी स्वत:वर एक पुस्तकही लिहिले आहे. . आणखी एक मानाची गोष्ट म्हणजे २०१६ साली नाईके ने "अनलिमीटेड युथ" नामक एक जाहिरात यांच्यावर चित्रीत केली. अनलिमीटेड युथ - नाईके. आणखी एक व्हर्जन. आणखी थोडी माहिती. या ग्रेट आजीबाईंना आणखी एकदा शिसान. __/\__ ******************************** सर्व माहिती व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार..!! हा लेख मुद्दाम लहान ठेवला आहे. या आज्जीबाईंची एकंदर कामगिरी आणि त्याचा आवाका वगैरे गोष्टी शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करणे हे ही अवघडच आहे. ******************************** .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
5243 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

शिरसाष्टांग नमस्कार!

एस
गुरुवार, 01/19/2017 - 09:03 नवीन
शिरसाष्टांग नमस्कार!
  • Log in or register to post comments

भारीच !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/19/2017 - 09:50 नवीन
पोहोण्याची स्टाईल फार आवडली.
  • Log in or register to post comments

छान परिचय!

खेडूत
गुरुवार, 01/19/2017 - 09:58 नवीन
छान परिचय! आजीबाईंना मोठ्ठा नमस्कार! __/\__
  • Log in or register to post comments

माझाही शिरसाष्टांग नमस्कार!!

तुषार काळभोर
गुरुवार, 01/19/2017 - 11:07 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

निव्वळ प्रणिपात. आणखी काय

गवि
गुरुवार, 01/19/2017 - 11:51 नवीन
निव्वळ प्रणिपात. आणखी काय बोलावं?
  • Log in or register to post comments

__/\__

स्वराजित
गुरुवार, 01/19/2017 - 12:05 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

दंडवत!!

संजय पाटिल
गुरुवार, 01/19/2017 - 12:31 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

खतरनाक __/\__

शलभ
गुरुवार, 01/19/2017 - 13:47 नवीन
खतरनाक __/\__
  • Log in or register to post comments

शिरसाष्टांग नमस्कार!

नि३सोलपुरकर
गुरुवार, 01/19/2017 - 14:22 नवीन
नमस्कार! __/\__, मोदक राव ,आजीबाईंचा परिचय करून दिल्याबद्दल खूप आभारी आहे
  • Log in or register to post comments

ग्रेट आजीबाई

किरण कुमार
गुरुवार, 01/19/2017 - 15:21 नवीन
हे त्या आजीबाईंचे ४५ वे आयर्नमॅन विजेतेपद होते... ................/\................ छान माहिती
  • Log in or register to post comments

__/\__

दीपक११७७
गुरुवार, 01/19/2017 - 16:26 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

जबरदस्त __/|\__

अरिंजय
गुरुवार, 01/19/2017 - 20:52 नवीन
@ मोदक दादा - त्या आयर्न नन वरुन मला "पवार मामा"ची आठवण झाली. सातारा जिल्ह्यातील वल्ली म्हातारा, मॅरेथॉनपटू. मी साधारण ८ वर्षांपुर्वी त्यांना भेटलो तेंव्हा त्यांचे वय ८० वर्षे. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून मेडल्स जिंकलेली. मी त्यांना बघितले त्यावेळी त्यांच्याकडे ६४ मेडल्स होती & चार वेळा पासपोर्ट रिन्यु केलेला होता. मी दिवसभर त्यांचा फोटो शोधत होतो पण सापडला नाही. कदाचित दुसऱ्या मेमरीकार्ड मध्ये असावा. सर्व मिपाकरांना नम्र विनंती की कोणाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती असल्यास कृपया येथे द्यावी.
  • Log in or register to post comments

शंकर नाथा पवार

तुषार काळभोर
Sun, 01/22/2017 - 10:09 नवीन
फोटो नाही मिळाला,पण या बातम्या मिळाल्या : टाईम्स ऑफ इंडिया : At 89, this athlete’s on a winning spree सकाळ : नव्वदीतही धावणारे शंकर नाथा पवार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरिंजय

पवारमामांनाही शि. सा. न. _/\_

एस
Tue, 01/24/2017 - 23:01 नवीन
पवारमामांनाही शि. सा. न. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

शिसान __/\__

देशपांडेमामा
Fri, 01/20/2017 - 12:01 नवीन
_/\_ __/\__ _/\__ देश
  • Log in or register to post comments

हे सगळं खरंय ??

अत्रन्गि पाउस
Fri, 01/20/2017 - 12:43 नवीन
अशक्यप्राय वाटतंय
  • Log in or register to post comments

दंडवत !

वरुण मोहिते
Fri, 01/20/2017 - 12:51 नवीन
केवळ अविश्वसनीय
  • Log in or register to post comments

कडक

झेन
Fri, 01/20/2017 - 19:15 नवीन
मला आपलं मिलिंद सोमण च कौतूक वाटत होत वय वर्षे ५० असताना आयर्न मॅन. इथे तर सुरुवातच ४८ व्या वर्षी बाबो...!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 01/21/2017 - 18:35 नवीन
साष्टांग नमस्कार ...
  • Log in or register to post comments

ग्रेट!

कवितानागेश
Mon, 01/23/2017 - 01:20 नवीन
छान ओळख!
  • Log in or register to post comments

छान परिचय. तुमच्या लेखांमुळे

रुपी
Tue, 01/24/2017 - 01:17 नवीन
छान परिचय. तुमच्या लेखांमुळे वेगळ्याच घटना, व्यक्तींची माहिती मिळते. धन्यवाद! काही फोटो दिसत नाहीयेत..
  • Log in or register to post comments

क मा ल

लॉरी टांगटूंगकर
Tue, 01/24/2017 - 19:38 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मनिमौ
गुरुवार, 01/26/2017 - 20:59 नवीन
असे लोक पाहिले की स्वताचा फिटनेस वाढवायची गरज वाटते. छान जमला आहे लेख
  • Log in or register to post comments

साष्टांग

सुमीत भातखंडे
Fri, 01/27/2017 - 10:31 नवीन
_/\_ साष्टांग नमस्कार!
  • Log in or register to post comments

फोटोचा नक्की काय प्रॉब्लेम

मोदक
Tue, 01/31/2017 - 13:08 नवीन
फोटोचा नक्की काय प्रॉब्लेम होत आहे कळत नाहीये. अल्बमच्या परमिशन्स वगैरे बदलल्या नाहीयेत तरी ३ फोटो दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

भारी!

पैसा
Tue, 01/31/2017 - 13:11 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा