ब्लॉग्सची उल्लेखनीयता संदर्भाने काही प्रश्न पहिल्या धाग्यात उपस्थित केले आहेतच. भारतीय जीवनाच्या परिप्रेक्ष्यात वस्तुनिष्ठ नोंदी/दखल घेण्याच्या प्रथांचा सांस्कृतीक आणि माध्यमस्तरांवर बर्याचदा अभाव जाणवतो. त्याशिवाय माहितीस्रोतांची कमतरता भासते. याचा फटका बसणारा अजून एक गट म्हणजे माध्यम प्रसिद्धीचा झोत प्राप्त न होणारे लेखक, गायक, कवि आणि किर्तनकार इत्यादींचा .
मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या अशा स्वरुपाची चर्चा मागे मी मिपावर लावली होती. अर्थात अशा धाग्यांच्या स्वरुपातून चर्चा न होणार्या साहित्यिक आणि कलावंताची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता कशी निश्चित करावी हा प्रश्न शिल्लक राहतो. तुमचे मत काय ?
हि धागा चर्चा मराठी विकि संदर्भाने असल्यामुळे आपले प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त समजले जाईल. अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
याद्या
909
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिपेक्षात