भारुडी प्रभुंचे भारुड झक्कास जमले आहे.
अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
आमचे राज्य
मराठी पालक संत्यस्त्र...
जालावर रडती विवस्त्र....
पण मुलांना धाडिती अन्यत्र....
फोक उठवाया जागा न्हायी...
मला शाळा नको गं बाई.....
+१०० सहमत
(मुलीला मराठी शाळेत पाठवून आप्तांच्या टवाळीस अंगावर घेणारा)
खराटा
इथे असलेल्या दिग्गजांकडे पाहुन वाटते की मराठी माध्यम व पाचवी किंवा आठवी पासुन गणित, शास्त्र इंग्रजी मधे हा उपाय चांगला आहे. उगाच इंग्रजी फक्त इंग्रजी डोक्यात घुसत आहे.
खाजगी शाळा, एडमीशनची मारामार व डोनेशनची डोके गरगरवणारी रक्कम ऐकुन म्युन्सीपाल्टीची शाळा हा पर्याय समोर येणार काहीच वर्षात. सरकारने बंद तर नाही ना केल्या त्या शाळा? मास्तर, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे याकरता काय करता येईल? अनिल अवचट यांनी बहुतेक आपल्या मुलींना सरकारी शाळेत घातले होते ना?
काही बंद पडल्या आहेत. काही वाटेवर आहेत. काही नावापुरता चालु आहेत. काळजी वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे काही जुन्या मराठी शाळा पण ह्याच वाटेवर मार्गक्रमण करत आहेत.
आवडली कविता. आजकालच्या शाळांचे योग्य वर्णन.
माझी शाळा पुण्यातील चांगली शाळा म्हणून ओळखली जायची.
दहावीनंतर बर्याच वर्षांनी कुठलीशी कागदपत्रे आणायच्या निमित्ताने शाळेत जाणं झालं आणि आश्चर्याचा धक्का बसला.
शाळेत शिकवणार्या बाईंची (साहजीकच) नवी टीम होती. साधी राहणी कुणाचीच नव्हती.
अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने.
त्यादिवशी कोणताही समारंभ नसताना असे वातावरण होते.
अशी राहणी असणार्या बाई मुलींना काय सांगणार?
मी शाळेत असताना नटण्यामुरडण्याला फारसे प्रोत्साहन कधीच नव्हते.
रेवती
>>अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने.
अहो ताई, भाषेच्या बाबतीत शुद्ध अशुद्ध असे काहीच नसते हो.
माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या -
आनि शुद्ध की आणि?
आणि ते कुनी ठरवले?
वा .. भारुड दमदार आहे..
सध्याच्या शाळा कशा आहेत माहित नाही..पण मी शाळा सोडताना भारुडातल्या स्थितीची चाहुल लागली होती.. त्यावरुन कल्पना करु शकतो..
मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि मातृभाषेतल्या शिक्षणाचा दर्जाही उंचावला पाहिजे.
-- लिखाळ.
प्रभु साहेब,
भारुड छान आहे. शहरी भागातील शाळांची अवस्था आता अशी होत आहे हे खरे पण गावातील शाळा आधी पासूनच अशा आहेत . शहरी पालक तरी जागरुक असतात, घरी अभ्यास करून घेतात. ग्रामीण मुलांची अवस्था पाहवत नाही.
बाकी भारुड छान आहे.
वा!
!!
:)
नाव
आयला
+१
आवडले !
मराठी पालक
पण मराठी
चिंताजनक
बंद
आवडली
>>अशुद्ध
हॅ हॅ हॅ
पुणे
वा .. भारुड
भारुड आवडले, पण... ग्रामीण भागचे काय ?
मस्त !